शहरं
Join us  
Trending Stories
1
श्रेयस अय्यरचं अर्धशतक, पंजाबकडून चेन्नईचा ५ विकेट्सनं पराभव, आयुषच्या मेहनतीवर फेरलं पाणी!
2
अफगाणिस्तानला भूकंपाचा भीषण धक्का; जम्मू-काश्मीर आणि दिल्लीतही जमीन हादरली
3
"ही वृत्ती संपुष्टात आणण्याची शिवसेनेची भूमिका"; अशोक खरातचे एकनाथ शिंदेंना फोनच्या दाव्यावर उदय सामंतांची प्रतिक्रिया
4
इराणने आमचे लढाऊ विमान पाडले, वैमानिकही बेपत्ता; अमेरिकेने दिली कबुली
5
Mumbai Indias: मुंबई इंडियन्सची ताकद वाढली, स्टार ऑलराउंडरची संघात एन्ट्री, दिल्लीविरुद्ध खेळण्याची शक्यता!
6
Ashok Kharat Case : भोंदूबाबा खरातचा 'महाप्रताप'! भक्तांच्याच नावे उघडली १०० बोगस खाती; 'समता' आणि 'जयदंबा' पतसंस्था रडारवर
7
'फोनवर संभाषण झाले म्हणून वरिष्ठ मंत्र्यांवर आरोप करणे योग्य नाही';अंजली दमानियांच्या आरोपांवर दीपक केसरकरांचे प्रत्युत्तर
8
धुळे-सोलापूर महामार्गावर प्रचंड वाहतूक कोंडी; ७ तासांपासून वाहने खोळंबली, नागरिकांचे हाल
9
ज्याची भीती तेच घडलं, युद्ध आणखी पेटलं; इराणच्या सर्वात मोठ्या ब्रिजवर हल्ला, ८ मृत्यू ९५ जखमी
10
IPL 2026: ५ षटकार, ६ चौकार, १६९.७७ चा स्ट्राईक रेट; पंजाबविरुद्ध आयुष म्हात्रेची विस्फोटक इनिंग!
11
US Israel Iran War : इराणचा यू-टर्न! आधी म्हणालं 'वैमानिक ताब्यात', आता शोधण्यासाठी बक्षीस; अमेरिकेच्या पायलटबाबत सस्पेन्स
12
IPL 2026: रोहित शर्माचा फिटनेस तर बघा, चक्क एका हातानं पकडला झेल, व्हिडीओ व्हायरल
13
India Oil Supply News: भारतासाठी 'संजीवनी' ठरला हा छोटा देश; युद्ध असो की संकट, अविरत करतोय तेल अन् गॅस पुरवठा
14
"आणखी थोडा वेळ मिळाला, तर अमेरिका सहज होर्मुझ सामुद्रधुनी...", डोनाल्ड ट्रम्प यांचे इराणची चिंता वाढवणार विधान
15
म्हाडाचं घर घ्यायचा विचार? फॉर्म किती रुपयांना, अनामत रक्कम किती भरावी लागणार?
16
US Israel Iran War : डोनाल्ड ट्रम्प यांना विरोध केल्याचे फळ! इराणने उघडला फ्रान्ससाठी होर्मुझचा रस्ता; मॅक्रॉन यांना खास 'बक्षीस'
17
IPL 2026: चेन्नईच्या संघात एक मोठा बदल; कोण इन, कोण आउट? पाहा दोन्ही संघाची प्लेईंन इलेव्हन
18
MS Dhoni: सीएसकेच्या चाहत्यांसाठी गूड न्यूज? ट्रेनिंग सेशनसाठी धोनी मैदानात, पण खेळण्याबाबत सस्पेन्स कायम
19
फक्त एका दिवसासाठी अमेरिकेतून युवक भारतात आला; ताजमहाल पाहून निघून गेला, Video व्हायरल
20
Latest Marathi News LIVE Updates: अमेरिकेला पुन्हा झटका! इराणने दुसरे एफ-३५ लढाऊ विमान पाडले
Daily Top 2Weekly Top 5

तासिका तत्त्वावरील प्राध्यापकांचा कुलसचिवांच्या दालनात आत्मदहनाचा प्रयत्न; स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापीठातील घटना

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 28, 2024 20:57 IST

...परंतु त्यांच्याकडे दुर्लक्ष होत असल्याने त्या दोन प्राध्यापकांनी कुलसचिवांच्या कार्यालयात अंगावर पेट्रोल टाकून आत्मदहनाचा प्रयत्न केला.

नांदेड: स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापीठात तासिका तत्त्वावर काम करणाऱ्या दोन प्राध्यापकांनी मानधन न मिळाल्याच्या कारणावरून कुलसचिवाच्या दालनात अंगावर पेट्रोल टाकून आत्मदहन करण्याचा प्रयत्न केल्याची घटना २८ नोव्हेंबर रोजी सकाळी ११ वाजता घडली.

स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापीठातील स्त्री अध्ययन केंद्र येथे तासिका तत्वावर सहाय्यक प्राध्यापक म्हणून कार्यरत प्रा. गजानन इंगोले व प्रा.मेघनाथ खडके यांनी मागील चार महिने केलेल्या कामाचा आर्थिक मोबदला वेळोवेळी मिळावा यासाठी वरिष्ठाकडे मागणी केली होती. परंतु त्यांच्याकडे दुर्लक्ष होत असल्याने त्या दोन प्राध्यापकांनी कुलसचिवांच्या कार्यालयात अंगावर पेट्रोल टाकून आत्मदहनाचा प्रयत्न केला.त्यामुळे उचलावे लागले पाऊलमागील चार महिन्यापासून विद्यापीठाने आमच्याकडून प्रवेश प्रक्रिया याशिवाय अध्ययनाचे काम करून घेतले, कामाचा मोबदला आम्ही मागत होतो. परंतु स्त्री अध्ययन केंद्राच्या संचालिका यांनी जाणीवपूर्वक आम्हाला मानधन देण्यापासून टाळले. या अन्यायाला कंटाळून आत्मदहनाचा प्रयत्न केला....प्रा. गजानन इंगोले, सहाय्यक प्राध्यापक.जाणूनबुजून केले दुर्लक्ष -केलेल्या कामाचे मानधन मिळावे यासाठी वेळोवेळी कुलगुरू यांना भेटून मागणी केली. याशिवाय आमच्यावर होत असलेल्या अन्यायाबाबत व्यवस्थापन परिषदेकडे या विषयावर चर्चाही झाली. अध्ययन कक्षाच्या संचालिका डॉक्टर शालिनी कदम यांनी जाणीवपूर्वक आम्हाला डावलण्याचा प्रयत्न केला असल्याचा आरोप आरोप त्यांनी केला आहे. आर्थिक पिळवणूक करणाऱ्या संचालक यांच्याविरुद्ध पोलीस स्थानकात तक्रार करणार असल्याचे प्राध्यापकांनी सांगितले. 

टॅग्स :swami ramanand tirth marathawada univercity, nandedस्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापीठ, नांदेडProfessorप्राध्यापक