शहरं
Join us  
Trending Stories
1
चारही बाजूंनी गोळीबार, मृत्यू समोर; तरी सुरक्षित पडला बाहेर; अमेरिकन पायलटचा थरारक अनुभव
2
विधान परिषदेसाठी शरद पवारांचा उद्धव ठाकरेंना पाठिंबा?; काँग्रेसने मात्र अंतर राखले! पुढे काय?
3
शेतकरी कर्जमाफी अहवाल लवकरच राज्य सरकारकडे; सदस्यांच्या अभिप्रायानंतर होणार शिक्कामोर्तब
4
"...तर नरकाचे दरवाजे उघडतील"; ट्रम्प यांच्या ४८ तासांच्या अल्टीमेटमवर इराणची थेट 'अणुयुद्धाची' धमकी!
5
पेट्रोल ७.४१ रुपयांनी महागले तर डिझेलमध्ये २५ रुपयांची वाढ; 'या' कंपनीने अचानक वाढवल्या किमती
6
रणबीर कपूरच्या 'रामायण'मध्ये अमिताभ बच्चन यांच्या जावयाची एन्ट्री, देवराज इंद्रची भूमिका साकारणार, कोण आहे तो?
7
"बायकोसोबत रेड कार्पेटवर चालताना भीती वाटते...", ऐश्वर्याबद्दल असं का म्हणाला अभिषेक बच्चन?
8
रात्री झोपूनही दिवसभर झोप - सुस्ती जाणवत राहते? पाहा काय आहे यामागचं कारण आणि उपाय
9
मतदान की स्वप्नभंग? फोंड्याचे भवितव्य अधांतरी; ९ रोजीच्या निवडणुकीबद्दल साशंकता
10
लोकल ट्रेनच्या दरवाजाजवळ उभे राहणे हा निष्काळजीपणा नव्हे; उच्च न्यायालयाचा निर्णय
11
आजचे राशीभविष्य, ०५ एप्रिल २०२६: चांगली बातमी, धनलाभ, नशिबाची साथ; हर्षोल्लासाचा दिवस
12
सुनेत्रा पवारांविरोधात शरद पवारांनी उमेदवार दिल्यास काँग्रेसचा पाठिंबा; प्रदेशाध्यक्षांचा नवा प्रस्ताव
13
'धुरंधर'नंतर हाच सिनेमा पाहणार, मृणाल ठाकुरच्या 'डकैत'वर प्रेक्षकांच्या कमेंट्स; ट्रेलर रिलीज
14
भोंदू अशोक खरातला मदत करणाऱ्या महसूल अधिकाऱ्यांना घरी जावे लागेल: चंद्रशेखर बावनकुळे
15
अमली पदार्थ जप्ती प्रकरणात दोघांची अखेर निर्दोष मुक्तता; नियम पालनात सरकारी पक्ष अपयशी
16
पश्चिम रेल्वेच्या ताफ्यात १५ डब्यांच्या २ नवीन लोकल; ३३ टक्के क्षमता वाढणार
17
विशेष लेख: आपल्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात नेमके चालले आहे तरी काय..?
18
साप्ताहिक राशीभविष्य: ७ राशींना मनासारखा काळ, पैशांचा ओघ राहील; यश-प्रगती चौफेर-चौपट लाभ!
19
राज्यातील कुपोषण घटतेय, पण धोका कायम! बालविकास योजनांना गती देण्याचे आव्हान
20
केरळातील डावे सरकार अखेरची घटका मोजतेय, राज्यात एनडीए सत्तेत येईल: पंतप्रधान मोदी
Daily Top 2Weekly Top 5

नांदेड अन् बारामतीच्या दादांमध्ये रात्री ‘चाय पे चर्चा’; राष्ट्रवादीत येण्याचे संकेत, वेळ कधीची?

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 1, 2025 20:06 IST

बंद दाराआड जवळपास अर्धा तास झालेल्या ‘चाय पे चर्चे’तून पक्षप्रवेशाचा मार्ग सुकर झाल्याचे बाेलले जात आहे. 

नांदेड:  माजी खासदार भास्करराव खतगावकर यांच्या निमंत्रणावरून उपमुख्यमंत्री अजित पवार हे त्यांच्याकडे दुपारी चहाला जाणार होते. मात्र, ऐनवेळी अजितदादांचे नियोजन बदलले अन् ते कंधारहून थेट परभणीला गेले. त्यामुळे खतगावकर समर्थकांचा हिरमोड झाला होता. मात्र, ‘दादां’नी दिलेला शब्द पाळत शुक्रवारी रात्री १० वाजेच्या सुमारास खतगावकर यांच्या निवासस्थानी भेट देत त्यांच्याशी चर्चा केली. बंद दाराआड जवळपास अर्धा तास झालेल्या ‘चाय पे चर्चे’तून पक्षप्रवेशाचा मार्ग सुकर झाल्याचे बाेलले जात आहे. 

विधानसभा निवडणुकीनंतर राज्यात महायुतीचे सरकार स्थापन झाले. त्यानंतर स्थानिक पातळीवर सर्वच घटक पक्षांमध्ये पक्षप्रवेशावरून चढाओढ सुरू असल्याचे पहायला मिळत आहे. दरम्यान, नांदेडच्या राजकारणात दादा म्हणून ओळखले जाणारे भास्करराव खतगावकर हेदेखील काँग्रेसची साथ सोडून शिंदे सेनेत जाणार असल्याच्या वावड्या उठल्या होत्या. त्यात उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे नांदेड जिल्हा दौऱ्यावर आले असता, खतगावकरांच्या घरी चहापानाला जाणार होते. त्यानुसार बाबानगर येथे जय्यत तयारीदेखील करण्यात आली होती. मात्र, एकनाथ शिंदे यांनी जाहीर सभा आटोपून ‘शिवमळा’मार्गे थेट मुंबई गाठली. त्यावेळी खतगावकर यांचे समर्थक नाराज झाले होते. त्यानंतर दादा काय निर्णय घेणार? आता शिवसेनेत जाणार की नवा पर्याय शोधणार, अशा चर्चा राजकीय वर्तुळात रंगू लागल्या होत्या. 

दरम्यानच्या काळात राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे अन् खतगावकर यांच्यामध्ये फोनवर पक्ष प्रवेशाबाबत चर्चाही झाली होती. तटकरे यांनी दादांना दादासोबत येण्याचा आग्रह धरला होता. तद्नंतर शुक्रवारी राष्ट्रवादीचे अध्यक्ष तथा उपमुख्यमंत्री अजित पवार हे नांदेड जिल्हा दौऱ्यावर होते. त्यावेळी खतगावकर हे पक्षप्रवेश करतील, असा अंदाज बांधला जात होता. परंतु, तसे झाले नाही. मात्र, खतगावकर यांचे चहाचे निमंत्रण स्वीकारत अजितदादांनी बाबानगर येथील निवासस्थानी भेट दिली. त्यामुळे आता नांदेडचे दादा बारामतीच्या दादांसोबत जाणार असल्याचे बोलले जात आहे. या भेटीदरम्यान माजी मंत्री नवाब मलिक, आमदार विक्रम काळे, माजी आमदार ओमप्रकाश पोकर्णा, दीपक सूर्यवंशी, अशोक पाटील आदींची उपस्थिती होती.

‘दादां’चे घड्याळ, पण वेळ कधीची?रात्री उशिरा झालेल्या भेटीत नांदेडच्या अन् बारामतीच्या दादांमध्ये बंद दाराआड चर्चा झाली. भेटीनंतर अजित पवार यांनी माध्यमांना बोलणे टाळले. पण, भास्करराव खतगावकर यांनी व्यापक अन् सकारात्मक चर्चा झाल्याचे सूतोवाच करत घड्याळ हाती बांधणार असल्याचे संकेत दिले. तसेच चारही मतदार संघातील कार्यकर्त्यांची बैठक घेऊन चर्चा करू आणि त्यानंतरच निर्णय घेऊ, असे खतगावकर यांनी माध्यमांशी बोलताना सांगितले.

चिखलीकर, हंबर्डे अनुपस्थित!उपमुख्यमंत्री अजित पवार यांचा शुक्रवारचा दौरा आमदार प्रतापराव चिखलीकर यांनीच घडवून आणला. पूर्वनियोजित नसताना दुपारी भास्करराव खतगावकर यांच्याकडे चहा घेण्याचेही चिखलीकर यांच्या सल्ल्याने ठरले. पण, ऐनवेळी दुपारची भेट रद्द झाली अन् रात्री परभणीवरून परत येताना दादांनी नांदेडच्या दादांच्या निवासस्थानी भेट दिली. त्यावेळी आमदार प्रतापराव चिखलीकर, मोहन हंबर्डे हे अनुपस्थित होते. मात्र, उभय नेत्यांची दुसरी पिढी म्हणजेच प्रवीण चिखलीकर, राहुल हंबर्डे उपस्थित होते.

अन् दादा भडकले...!उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी रात्री खतगावकर यांच्या निवासस्थानी जाऊन त्यांची भेट घेतली. या भेटीत राजकीय चर्चा झाली नाही, असे खतगावकर म्हणाले. मात्र वारंवार राजकीय भूमिका बदलत आहात? असा प्रश्न पत्रकारांनी केला असता, खतगावकर भडकले. या जिल्ह्यात अनेकांनी पक्ष बदलले, त्यांची नावे सांगू का? मी ४० वर्षे काँग्रेसमध्ये राहिलो. माझ्या कार्यकर्त्यांची बैठक घेऊन मी निर्णय घेणार आहे, असे त्यांनी सांगितले. अजित पवार यांनी काही आश्वासन दिलं का? असं विचारल्यानंतर पुन्हा खतगावकर भडकले, मी सिनियर आहे, माझ्याकडे कुणीही येतं, अशोकरावदेखील येतात. तुम्ही पण येता, असे ते म्हणाले.

टॅग्स :Ajit Pawarअजित पवारNCPराष्ट्रवादी काँग्रेसNandedनांदेड