सिलिंडर देणाऱ्यास विचारा, लस घेतली का? शहरातील २२ जणांचेच लसीकरण
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 30, 2021 04:16 IST2021-05-30T04:16:19+5:302021-05-30T04:16:19+5:30
सॅनिटाईझ न करताच सिलिंडर घरात गॅस घेऊन येणारा दादा, मामा थेट खांद्यावर सिलिंडर घेऊन घरात येतो. काेणालाही ओझे उचलावे ...

सिलिंडर देणाऱ्यास विचारा, लस घेतली का? शहरातील २२ जणांचेच लसीकरण
सॅनिटाईझ न करताच सिलिंडर घरात
गॅस घेऊन येणारा दादा, मामा थेट खांद्यावर सिलिंडर घेऊन घरात येतो. काेणालाही ओझे उचलावे वाटत नाही, त्यामुळे घरातील मंडळी किचनमध्ये सिलिंडर ठेवण्याची त्याला विनंती करतात. नेहमीचेच संबंध असल्यामुळे डिलिव्हरी बाॅयदेखील किचनपर्यंत सिलिंडर नेऊन देतो. परंतु, सदर सिलिंडर सॅनिटाईझ करून घेण्याची कोणीही तसदी घेत नाही. यात काही जण अपवादही असतील. परंतु, प्रत्येकाने सिलिंडर दरवाजामध्ये ठेवून सॅनिटाईज करून घेणे गरजेचे आहे.
१८ डिलिव्हरी बाॅय पॉझिटीव्ह
नांदेड शहरात घरपोच गॅस पोहोचती करणाऱ्यांची संख्या जवळपास तीनशेच्या घरात आहे. त्यापैकी केवळ १६ जणांनाच कोरोना होऊन गेल्याची माहिती आहे. परंतु, आजपर्यंत अनेकांना लस उपलब्ध झाली नाही. घरोघरी सेवा देणाऱ्या या वितरकांसह गॅस एजन्सीमध्ये काम करणाऱ्या प्रत्येक कर्मचाऱ्याचे लसीकरण करून घेणे गरजेचे आहे.
आजपर्यंत आम्हाला कोणीही लस घेण्याबाबत बोलले नाही. लस घेण्याची इच्छा आहे, परंतु, भीती वाटते. त्यात लस घेतल्यानंतर आजारी पडून सुट्ट्या टाकायचे काम पडू नये. लाॅकडाऊनमध्ये सेवा दिली; परंतु आजपर्यंत संसर्ग झाला नाही. स्वत:ची काळजी घेऊनच सेवा देतो.
- शिवाजी देवणे, वितरक.
गॅस घरापर्यंत पोहोचविण्याचे काम जिकिरीचे आहे. परंतु, आम्ही सर्वजण अखंडपणे सेवा देत आहोत. शासन अथवा इतर कोणाकडूनही आम्हाला कोणत्याही सुविधा देण्यात आलेल्या नाहीत. शासनाने प्रत्येक डिलिव्हरी बॉय तसेच घरपोच सेवा देणाऱ्या प्रत्येकास लस उपलब्ध करून देणे गरजेचे आहे.