शहरं
Join us  
Trending Stories
1
"युद्ध थांबवलं नाही तर…’’, भारत-पाकिस्तानमधील संघर्षाचा उल्लेख करत डोनाल्ड ट्रम्प यांचा थायलंड कंबोडियाला इशारा
2
"...मग आम्हाला जगभर कशाला पाठवलं?"; IND vs PAK क्रिकेट शेड्युलवर संतापल्या प्रियंका चतुर्वेदी
3
मुंबई-पुणे महामार्गावर भीषण अपघात! कंटेनरचे ब्रेक फेल, अनेक वाहने एकमेकांवर धडकली...
4
IND vs ENG 4th Test Day 4 Stumps : साडे चार तासांत ३७३ चेंडूंचा सामना; KL राहुल-गिल जोडी जमली; पण लढाई अजून नाही संपली!
5
"जर 6 महिन्यांत मर्सिडीज अथवा बीएमडब्ल्यू हवी असेल तर..." सरन्यायाधीश गवई यांचा नव्या वकीलांना सल्ला
6
Asia Cup 2025: 'असं' झालं तर तब्बल तीन वेळा रंगणार IND vs PAK क्रिकेट सामना, जाणून घ्या
7
Shubman Gill Record : गिलनं साधला मोठा डाव! इंग्लंडच्या मैदानात पाक दिग्गजाला 'धोबीपछाड'
8
तेव्हा लोक म्हणाले होते जणू दुसरी ऐश्वर्याच, सलमान खानची ही हिरोईन आता दिसते अशी 
9
एलियन्सचं रहस्यमय अंतराळ यान नोव्हेंबरमध्ये करणार पृथ्वीवर हल्ला, शास्त्रज्ञांना धक्कादायक दावा
10
नवरा बायकोमध्ये तुफान भांडण, पतीच्या डोक्यात घातला हातोडा, हत्येनंतर दार लावलं अन्...
11
Video: बंगळुरूच्या महिला प्रोफेसरचा मराठमोळ्या 'वाजले की बारा' लावणीवर भन्नाट डान्स
12
"आम्ही खूप दुःखी..."; दिराने वहिनीला कुंकू लावलं अन् धबधब्यात घेतली उडी, प्रेमाचा भयंकर शेवट
13
IND vs ENG : जसप्रीत बुमराहचं 'शतक'; मँचेस्टर कसोटीतील न पटण्याजोगी गोष्ट
14
Asia Cup 2025 चे वेळापत्रक जाहीर! भारत पाकिस्तान पुन्हा एकाच गटात, 'या' दिवशी सामना
15
१४,२९८ पुरुषांना 'लाडकी बहीण'चा लाभ; अजित पवार म्हणाले, 'वसूल करणार, नाही दिले तर...'
16
"सरकार ही निरुपयोगी यंत्रणा, चालत्या गाडीला पंक्चर करण्याचं काम..."; नितीन गडकरींनी सुनावलं
17
बिहार निवडणुकीसाठी काँग्रेसची मोर्चेबांधणी, महाराष्ट्रातील या महिला खासदाराकडे सोपवली मोठी जबाबदारी
18
"बंदुकीच्या धाकाने बांगलादेशात ढकलले जातेय...!" बांगली भाषिक मुस्लिमांवरील कारवाईवरून ओवेसी भडकले
19
IND vs ENG : यशस्वीच्या पदरी लाजिरवाणा 'भोपळा'! साई आला अन् तोही फक्त 'दर्शन' देऊन गेला
20
"राहुल गांधींच्या नशिबात कायम माफी मागणे लिहीले आहे"; केंद्रीय कृषीमंत्र्यांनी काँग्रेसला घेरलं, "१० वर्षांनी पुन्हा..."

नांदेड लोकसभा पोटनिवडणुकीच्या मैदानात उतरणार?; चर्चा रंगल्यानंतर अशोक चव्हाणांचा खुलासा

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 19, 2024 15:11 IST

भाजपकडून जो कोणी उमेदवार दिला जाईल, त्याला आम्ही पूर्ण सहकार्य करू, असं चव्हाण यांनी स्पष्ट केलं आहे.

BJP Ashok Chavan ( Marathi News ) : काँग्रेस खासदार वसंत चव्हाण यांच्या निधनाच्या पार्श्वभूमीवर नांदेडमध्ये लोकसभा पोटनिवडणूक होत असून या निवडणुकीत भाजपकडून कोणाला मैदानात उतरवलं जाणार, याबाबतच्या चर्चांना उधाण आलं आहे. भाजपचे राज्यसभा खासदार अशोक चव्हाण यांचे नावही या पोटनिवडणुकीच्या उमेदवारीसाठी चर्चेत आले होते. मात्र मी ही निवडणूक लढवण्यास इच्छुक नसल्याचं चव्हाण यांनी स्पष्ट केलं आहे. तसंच भाजपकडून जो कोणी उमेदवार दिला जाईल, त्याला आम्ही पूर्ण सहकार्य करू, असंही त्यांनी स्पष्ट केलं आहे.

नांदेड लोकसभा पोटनिवडणुकीबद्दल बोलताना अशोक चव्हाण म्हणाले की, "मी राज्यसभेत खासदार आहे. त्यामुळे लोकसभा पोटनिवडणूक लढवण्याचा प्रश्नच नाही. माझ्या उमेदवारीच्या बातम्या पूर्णपणे कपोलकल्पित आहेत. भाजपचा उमेदवार ठरवण्याचं काम केंद्रीय पातळीवरून होईल. पक्षाकडून जो उमेदवार दिला जाईल, त्याला आम्ही सहकार्य करू," असं स्पष्टीकरण चव्हाण यांनी दिलं आहे.

नांदेड पोटनिवडणुकीत चुरस; काँग्रेस-एमआयएमकडून कोण मैदानात?

नांदेड लोकसभेच्या पोटनिवडणुकीत काँग्रेसने रवींद्र चव्हाण यांना उमेदवारी जाहीर केली असून ‘एमआयएम’नेदेखील ही पोटनिवडणूक लढविण्याची घोषणा केली. ‘एमआयएम’चे प्रदेशाध्यक्ष माजी खासदार इम्तियाज जलील हे पोटनिवडणुकीच्या आखाड्यात उतरणार आहेत. एमआयएमची उमेदवारी काँग्रेसचे टेन्शन वाढविणारी असून, आता तिरंगी लढत होण्याची शक्यता नाकारता येत नाही. माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण यांनी ऐन लोकसभा निवडणुकीच्या तोंडावर काँग्रेसचा हात सोडून भाजपचे कमळ हाती धरले. त्यानंतर जिल्ह्यातील काँग्रेस कार्यकर्ते सैरभैर झाले होते; परंतु काँग्रेसने माजी आमदार वसंतराव चव्हाण यांच्या रूपाने अनुभवी चेहरा पुढे करत त्यांना ताकद देण्याचे काम केले. २०२४ च्या लोकसभा निवडणुकीत चव्हाणांनी भाजपचे उमेदवार प्रतापराव चिखलीकर यांचा पराभव करत पन्नास हजारांपेक्षा अधिक मतांनी विजय मिळविला. त्यामुळे मरगळलेल्या काँग्रेस कार्यकर्त्यांना नवसंजीवनी मिळाली होती; मात्र दुर्दैवाने खासदार वसंतराव चव्हाण यांचे २६ ऑगस्ट रोजी निधन झाले. तद्नंतर आता नांदेड लोकसभेची पोटनिवडणूक जाहीर झाली.  

टॅग्स :Ashok Chavanअशोक चव्हाणnanded-pcनांदेडcongressकाँग्रेसBJPभाजपा