शहरं
Join us  
Trending Stories
1
US Israel Iran War : ४८ तासांत इराणचा विनाश होईल; होर्मुझच्या सामुद्रधुनीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
2
हिमाचलमध्ये भीषण अपघात! कुल्लूमध्ये १५ प्रवाशांना घेऊन जाणारी बस खड्ड्यात कोसळली; बचावकार्य युद्धपातळीवर
3
राधानगरीत आता 'रायबा' आणि 'सरदार'चा दरारा! दोन नर वाघांच्या अस्तित्वावर वनविभागाचे शिक्कामोर्तब
4
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
5
IPL 2026 : मामाची कृपा अन् IPL गाजवतोय भाचा! Sameer Rizvi इम्पॅक्टफुल क्रिकेटर कसा घडला?
6
गॅस सिलिंडर कुठे आहे? आता घरबसल्या फोनवर पाहा 'लाईव्ह लोकेशन'; ग्राहकांना मोठा दिलासा
7
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
8
माजी राष्ट्रपतींसह दोन बड्या नेत्यांवर अमेरिकेसाठी हेरगिरीचा आरोप, गद्दार म्हणून होतेय संभावना
9
Travel : मनालीत खूप गर्दी आहे? मग एप्रिलमध्ये फिरायला जा 'या' शांत ठिकाणी; स्वित्झर्लंडही विसराल!
10
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
11
डबल हेडरमध्ये कमालीचं ट्विस्ट! MI पाठोपाठ GT चा कॅप्टन शुभमन गिलही प्लेइंग इलेव्हनमधून 'गायब'
12
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
13
IPL 2026 : समीर रिझवीचा MI विरुद्धही 'धुरंधर' अवतार; DC ला एकतर्फी जिंकून दिली मॅच
14
दात दुखायला लागला अन् नंतर थेट हात-पाय कापण्याची आली वेळ; तरुणासोबत घडलं भयंकर
15
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
16
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
17
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित शर्माचा मोठा पराक्रम! MS धोनीचा विक्रम मोडत साधला 'नंबर वन'चा डाव
18
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
19
सावधान! तुमच्या आधार कार्डवर भलत्याच व्यक्तीचं सिम कार्ड? एक चूक आणि थेट पोलीस कोठडी
20
'दृश्यम' पाहून खतरनाक प्लॅनिंग; बायकोनेच घेतला नवऱ्याचा जीव, पण 'QR कोड'मुळे पर्दाफाश
Daily Top 2Weekly Top 5

अशोक चव्हाण-गोरठेकर यांच्यात मनोमिलन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 23, 2019 01:01 IST

काँग्रेस नेते खा़ अशोक चव्हाण आणि राष्ट्रवादीचे माजी आ़ बापूसाहेब गोरठेकर यांच्यातील राजकीय संघर्ष सर्वश्रुत आहे़ मात्र शुक्रवारी या दोन्ही नेत्यांत मनोमिलन झाले़

ठळक मुद्देसंयुक्त बैठक : राष्ट्रवादीची ताकद काँगे्रसच्या पाठीशी उभी करणार

नांदेड : काँग्रेस नेते खा़ अशोक चव्हाण आणि राष्ट्रवादीचे माजी आ़ बापूसाहेब गोरठेकर यांच्यातील राजकीय संघर्ष सर्वश्रुत आहे़ मात्र शुक्रवारी या दोन्ही नेत्यांत मनोमिलन झाले़ कलामंदिर येथील गोरठेकर यांच्या निवासस्थानी झालेल्या संयुक्त बैठकीत आगामी निवडणुकीच्या अनुषंगाने संवाद साधत जिल्ह्यातील राष्ट्रवादीची ताकद काँग्रेसच्या पाठीशी उभी करण्याचा शब्द गोरठेकर यांनी दिला़खा़ अशोक चव्हाण यांच्या पाठीशी काँग्रेस एकमुखाने उभी आहे़ दुसरीकडे मित्रपक्ष असलेल्या राष्ट्रवादीकडूनही काँग्रेसला मोठ्या अपेक्षा आहेत़ मात्र, राष्ट्रवादीचे नेते माजी आ़ बापूसाहेब गोरठेकर काँग्रेसला कितपत सहकार्य करतील याबाबत साशंकता होती़ शुक्रवारी या दोन्ही नेत्यांसह काँग्रेस-राष्ट्रवादीच्या पदाधिकाऱ्यांची संयुक्त बैठक झाली़ सुमारे ४० मिनिटे चाललेल्या या बैठकीत आगामी निवडणुकीच्या अनुषंगाने सकारात्मक चर्चा झाली़ बैठकीनंतर काळाची गरज ओळखून आगामी निवडणुकीत जिल्ह्यातील राष्ट्रवादीची संपूर्ण ताकद काँग्रेस उमेदवाराच्या पाठीशी लावण्याचा शब्द गोरठेकर यांनी दिल्याने काँग्रेसला मोठा दिलासा मिळाला आहे़यावेळी माजी पालकमंत्री आ़डी़पी़सावंत, आ़ अमरनाथ राजूरकर, श्याम दरक, राष्ट्रवादीचे जगन शेळके, वंगलवार सावकार, रमेश सरोदे, माधव कोलगणे, जीवन चव्हाण, बाळासाहेब देशमुख, दिलीप कदम आदींची उपस्थिती होती़दोन्ही पक्षांची समन्वय समिती स्थापणारआगामी निवडणुकीत काँग्रेस-राष्ट्रवादी एकजुटीने आघाडीचा धर्म पाळतील असा शब्द एकमेकांना देतानाच निवडणूक प्रचाराच्या अनुषंगाने दोन्ही पक्षांच्या पदाधिकाऱ्यांची समन्वय समिती स्थापन करण्याचा निर्णय या चर्चेवेळी घेण्यात आला़ दरम्यान, प्रचाराच्या अनुषंगाने राष्ट्रवादीचे नेते शरद पवार, अजित पवार, धनंजय मुंडे यांच्यासह छगन भुजबळ यांच्या प्रचारसभांचे नियोजनही यावेळी करण्यात आले़ याबरोबरच उमेदवार निश्चित झाल्यानंतर गोरठा येथे दोन्ही पक्षाची संयुक्त बैठक घेण्याचा निर्णयही झाला़

टॅग्स :NandedनांदेडAshok Chavanअशोक चव्हाणcongressकाँग्रेसNCPराष्ट्रवादी काँग्रेस