शहरं
Join us  
Trending Stories
1
"काश्मीर सुरक्षित नाही हे पहलगाम हल्ल्यानंतर समोर आलं"; जयंत पाटलांचा केंद्र सरकारवर निशाणा
2
भिवंडीत खासगी बसला अपघात; आठ वर्षांच्या मुलीचा मृत्यू, १० ते १२ जण जखमी
3
सुरक्षेत त्रुटी, गृहमंत्री राजीनामा देणार का? पहलगाम हल्ल्याबाबत काँग्रेसचे सरकारला 6 प्रश्न...
4
भारताच्या कारवाईनं पाकिस्तान घबरला; मित्र देशांकडे मदत मागायला गेला, मिळाला मोठा झटका!
5
२०८० पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री राहिले तरीही आम्हाला अडचण नाही- रामदास कदम
6
अखेर निर्णय झाला! सिंधू पाणी करार स्थगित, पाकिस्तानला एक थेंबही पाणी मिळणार नाही...
7
CSK च्या बालेकिल्ल्यात १७ वर्षांनी 'सूर्योदय'! SRH नं 'करो वा मरो' प्रवासातील पहिली लढाई जिंकली
8
'हिंसाचार पसरवण्यासाठी वारंवार धर्माचा वापर…'; पहलगाम हल्ल्यानं व्यथित बंगाली शिक्षकानं इस्लाम सोडला
9
वैष्णवीदेवीचे तिकीट न मिळाल्याने काही तास अधीच पहलगाम साेडले, पुण्यात पोहोचल्यावर हल्ल्याचे वृत्त धडकले...!
10
“२०३४ पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री असतील”; चंद्रशेखर बावनकुळे यांचे मोठे भाकित
11
पहलगाम हल्ला: २३२ प्रवाशांना घेऊन तिसरे विमान महाराष्ट्रात! आतापर्यंत ८०० प्रवासी सुखरूप परत
12
पहलगाम हल्ल्याचा राग काढला; लातूरची लेक ज्योती पवारने पाकिस्तानचा धुव्वा उडवला..!!
13
अमरावती: १५ वर्षीय मुलीची किडनी 'फेल', वडिलांनी लेकीसाठी केली किडनी दान; शस्त्रक्रिया यशस्वी!
14
देश दु:खात असताना सत्कार करून घ्यायला भाजप नेत्यांना लाज कशी वाटत नाही?- अतुल लोंढे
15
मासेमारीला कृषीचा दर्जा देण्याचा फार काही फायदा नाही, योजना फसवीच- काँग्रेसची टीका
16
पहलगाम हल्ला: अमेरिकेचा मोठा निर्णय, गुप्तचर यंत्रणेने दिली गॅरंटी; भारताला खंबीर समर्थन
17
पहलगाम हल्ल्यातील संशयित खेचरवाला ताब्यात; याने विचारलेला धर्म, महिला पर्यटकाचा दावा
18
“लाल संविधान घेऊन फिरणारे राहुल गांधी...”; सावरकरांवरील विधान प्रकरणी CM फडणवीसांचा पलटवार
19
जम्मू-काश्मीरच्या कठुआ जिल्ह्यात दिसले 4 संशयित, सुरक्षा दलांनी सुरू केली शोध मोहीम...
20
ज्याच्यासाठी लिंग परिवर्तन केलं, त्याचं दुसऱ्यावरच प्रेम जडलं...! सनीची मारिया बनलेली किन्नर पोहोचली पोलीस ठाण्यात, अन् मग...

राज्यात सत्ता बदल होताच शिवसेनेचे १० खासदार भाजपात येणार: प्रताप पाटील चिखलीकर

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 25, 2022 13:14 IST

आमदारांसोबतच खासदारांवर देखील आपल्या कंपूत ठेवण्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यासमोर आव्हान

नांदेड: शिवसेनेच्या तब्बल ४० आमदारांचा वेगळा गट स्थापन करून राज्यात सत्ताबदल करण्यास बंडखोर एकनाथ शिंदे सरसावले आहेत. आता याच पार्श्वभूमीवर नांदेडचे खासदार प्रताप पाटील चिखलीकर यांनी मोठे विधान करत त्यानंतर भाजपची रणनीती उघड केली आहे. राज्यात सत्ता बदल होताच शिवसेनेचे १० खासदार भाजपात दाखल होतील असा दावा चिखलीकर यांनी केला आहे. 

शिवसेनेचे नेते एकनाथ शिंदे यांच्या बंडखोरीने राज्यात पुन्हा एकदा सत्तासंघर्ष सुरु झाला आहे. राज्यसभा आणि विधानपरिषद निवडणुकीत महाविकास आघाडीला पराभवाला सामोरे जावे लागले. त्यानंतर अचानक शिवसेनेचे प्रभावशाली नेते एकनाथ शिंदे यांनी बंडखोरी करत गुजरात गाठले. तेथून शिवसेनेच्या काही आमदारांसह त्यांनी आसाममधील गुवाहाटी गाठली आहे. शिंदे यांच्या बंडखोरीने सेनेत उभी फुट पडली आहे. तब्बल ४० आमदार आपल्यासोबत असल्याचा दावा शिंदे यांनी केला आहे. या आमदारांचा वेगळा गट स्थापन करून भाजपसोबत राज्यात सत्ता स्थापन करण्याचा शिंदे यांचा हेतू आहे. यासर्व राजकीय उलाढालीवर भाजपाकडून अद्याप कोणीही अधिकृत प्रतिक्रिया देण्यात आली नाही. कदाचित अजित पवार यांच्या सोबत फसलेल्या पहाटेच्या शपथविधीमुळे भाजपा काळजी घेत आहे. शिंदे यांचा वेगळा गट निर्माण झाल्यानंतर भाजपा आपली भूमिका स्पष्ट करेल असे दिसत आहे. दरम्यान, शिंदे यांच्या बंडानंतर माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या निवासस्थानावर सातत्याने होणाऱ्या बैठकातून त्यांची व्यूहरचना तयार असल्याचे संकेत मिळत आहेत.

राज्यात सत्ता बदल करणे यासोबतच सेनेला मोठे खिंडार पडण्याची तयारी शिंदे यांनी केलेली आहे. माजी खासदार-आमदार, पदाधिकारी यांचा त्यांच्या गटाला पाठिंबा वाढत आहे. त्यामुळे शिंदे गट आणि भाजपा यांची सत्ता स्थापन झाल्यानंतर राज्यात आणखी मोठी राजकीय उलाढाल होऊ शकते. तसे संकेत नांदेडचे भाजपा खासदार प्रताप पाटील चिखलीकर यांनी दिले आहेत. राज्यात सत्ता बदल झाल्यास शिवसेनेचे १० खासदार भाजपात प्रवेश करतील असा दावा खा. चिखलीकर यांनी केला आहे. या दाव्यामुळे आमदारांसोबतच खासदारांवर देखील आपल्या कंपूत ठेवण्याचे आव्हान मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यासमोर उभे राहिले आहे. 

बंडखोर कल्याणकरांच्या केसालाही धक्का लावू शकत नाही नांदेड येथील शिवसेनेचे बंडखोर आमदार बालाजी कल्याणकर हे एकनाथ शिंदे यांच्यासोबत गुवाहाटी येथे आहेत. दरम्यान,  कल्याणकर यांच्या कार्यालयावर संतप्त शिवसैनिक हल्ला करणार असल्याच्या चर्चा आहेत. त्यावर प्रतिक्रिया देताना खासदार चिखलीकर यांनी आमदार कल्याणकर यांची पाठराखण केली. कल्याणकर हे सेना भाजपचे उमेदवार होते. त्यांच्यासाठी भाजपाने ही मेहनत घेतली. हिंदुत्वाच्या मुद्यावर ते शिंदे सोबत गेले आहेत. त्यामुळे कल्याणकर यांच्या केसाला धक्का लागणार नाही याची हमी खासदार चिखलीकर यांनी घेऊन एकप्रकारे शिवसैनिकांना इशारा दिला आहे. 

टॅग्स :BJPभाजपाShiv SenaशिवसेनाPratap Patil Chikhalikarप्रताप पाटील चिखलीकरNandedनांदेडMaharashtra Political Crisisमहाराष्ट्राचे राजकीय अस्थिरतेचा गोंधळ