शहरं
Join us  
Trending Stories
1
"मी उद्या भाजपा कार्यालयात येतोय, तुम्हाला...", विभव कुमार यांच्या अटकेनंतर अरविंद केजरीवाल यांचे नरेंद्र मोदींना आव्हान
2
विराट कोहलीचा भीमपराक्रम! जमला नाही कोणालाच असा विक्रम, ख्रिस गेल याच्याशीही बरोबरी
3
मोदींना तिसऱ्यांदा पंतप्रधान होऊ द्या, सहा महिन्यांत पाकव्याप्त काश्मीरही भारताचा भाग झाल्याचे दिसेल- योगी आदित्यनाथ
4
विदर्भात विजांच्या कडकडाटासह पाऊस, मुंबईत कशी असणार स्थिती?; असा आहे हवामान अंदाज
5
एक चेंडू छतावर, दुसरा स्टँडवर! Virat Kohli चा नवा विक्रम, पण ज्याची भीती होती तेच झालं
6
विभव कुमार यांच्या अटकपूर्व जामीन याचिकेवर न्यायालयाचा आदेश; म्हणाले...
7
विमान प्रवास करताना कान दुखतो का? 'या' 5 सोप्या टिप्स फॉलो करा, नक्कीच वाटेल 'रिलॅक्स'!
8
धक्कादायक! पुणे-सोलापूर हायवेवर होर्डिंग कोसळून दोन जण जखमी 
9
परळीत लोकशाही नव्हे तर गुंडाराज?; व्हिडीओ पोस्ट करत रोहित पवारांचा सवाल
10
"मुंबई बॉम्बहल्ल्यातील आरोपी प्रचारात पाहून बाळासाहेबांच्या आत्म्यालाही वेदना होत असतील"
11
अजितचा स्वभाव मला माहीत आहे, तो कधीही...; निवडणुकीच्या अंतिम टप्प्यात पवारांचं मोठं वक्तव्य
12
Rohit Sharma अखेर व्यक्त झाला! मुंबई इंडियन्सच्या अपयशाचं खरं कारण सांगितलं, म्हणाला... 
13
निस्वार्थी सुरेश रैना! विराट कोहलीनं सांगितली जगाला माहीत नसलेली Mr. IPL ची गोष्ट, Video 
14
आधी पाया पडते, पदर पसरते म्हणणारे आता गुरगुरत आहेत; जरांगेंची मुंडे बहीण-भावावर टिका
15
MS Dhoniची फिल्ड प्लेसमेंट, रोहितचा पूल शॉट अन्....; विराटला हवी आहेत ६ खेळाडूंची कौशल्य
16
32000 रुपयांचा बँक बॅलन्स, 9 लाखांचे शेअर्स... स्वाती मालीवाल यांच्याकडे किती संपत्ती? जाणून घ्या...
17
Ashok Gehlot : "काँग्रेसचं सरकार असतानाही राम मंदिर बांधलं असतं कारण..."; अशोक गेहलोत यांचा मोठा दावा
18
दादा कोंडकेंच्या 'मुका घ्या मुका' चित्रपटाची अलका कुबल यांना होती ऑफर पण...
19
PM नरेंद्र मोदींची आज दिल्लीत सभा, १३ देशांचे राजदूत उपस्थित राहणार!
20
"भारतापेक्षा अधिक तेजस्वी, प्रखर लोकशाही जगात कुठेही नाही"; व्हाईट हाऊसने केली स्तुती

नांदेडमध्ये आणखी एक घोटाळा उघड; सरकारी नोकरीचे आमिष दाखवून शेकडो विद्यार्थ्यांना गंडविले

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 02, 2018 6:31 PM

राज्य शासनाचा बोगस अध्यादेश दाखवून संगणक शिक्षकाची जागा भरावयाची आहे असे म्हणून शेकडो विद्यार्थ्यांकडून प्रत्येकी २ ते ४ लाख रुपये स्विकारुन गंडा घालणाऱ्या अकरा जणांच्या टोळीविरुद्ध विमानतळ पोलिस ठाण्यात गुन्हा नोंदविण्यात आला आहे़

ठळक मुद्देबोगस अध्यादेश आणि शासन राजपत्राचा नमुना तयार करुन एका टोळीने २०१५ पासून जिल्ह्यात धुमाकुळ घातला आहे़ संगणक सहाय्यकाच्या जागा रिक्त असून त्या लवकर भरावयाच्या आहेत़ असे सांगून बेरोजगार विद्यार्थ्यांना आमिष दाखविण्यात आले़

नांदेड : राज्य शासनाचा बोगस अध्यादेश दाखवून संगणक शिक्षकाची जागा भरावयाची आहे असे म्हणून शेकडो विद्यार्थ्यांकडून प्रत्येकी २ ते ४ लाख रुपये स्विकारुन गंडा घालणाऱ्या अकरा जणांच्या टोळीविरुद्ध विमानतळ पोलिस ठाण्यात गुन्हा नोंदविण्यात आला आहे़. यातील सुधाकर किशन पवार या आरोपीला लोहा येथून अटक करण्यात आली आहे़

शहरातील चैतन्यनगर येथील श्रेया कॉम्प्युटर समोर मधुकर पतंगे यांच्या कार्यालयात या प्रकरणातील आरोपींनी हे सर्व कुभांड रचले़ शासनाचा बोगस अध्यादेश आणि शासन राजपत्राचा नमुना तयार करुन एका टोळीने २०१५ पासून जिल्ह्यात धुमाकुळ घातला आहे़ शासनाच्या विविध कार्यालयांमध्ये संगणक सहाय्यकाच्या जागा रिक्त असून त्या लवकर भरावयाच्या आहेत़ असे सांगून बेरोजगार विद्यार्थ्यांना आमिष दाखविण्यात आले़ त्यांच्याकडून नोकरीसाठी प्रत्येकी २ ते ३ लाख रुपये घेण्यात आले़ ही अग्रीम रक्कम असून प्रत्यक्षात नोकरी लागल्यानंतर उर्वरित रक्कम द्यावयाची आहे असेही विद्यार्थ्यांना सांगण्यात आले़ 

विद्यार्थ्यांना संशय येवू नये म्हणून चैतन्यनगर येथील श्रेया कॉम्प्युटर आणि लोहा येथील सायबर कॉम्प्युटर या दोन ठिकाणी या विद्यार्थ्यांना एक महिन्याचे प्रशिक्षणही देण्यात आले़ त्यासाठी नेमण्यात आलेल्या प्रशिक्षकाला अडीच हजार रुपये मानधनावर एक महिन्यासाठी नियुक्त करण्यात आले होते़ त्यानंतर अनेक विद्यार्थ्यांना शासकीय नोकरीची बनावट नियुक्तीपत्रेही देण्यात आली़ ही नियुक्तीपत्रे देताना शंभर रुपयांच्या बॉन्डवर विद्यार्थ्यांकडून करारनामा करण्यात आला़ परंतु पैसे दिल्यानंतरही नोकरी न लागल्यामुळे आपली फसवणुक झाल्याचे लक्षात आलेल्या विद्यार्थ्यांनी सुधाकर पवार व इतरांकडे रकमेची मागणी केली़ यावेळी पवार व त्याच्या साथीदारांनी या विद्यार्थ्यांना पैसे नसलेल्या बँक खात्याचे धनादेश दिले़ ते

धनादेशही वटले नाहीत़त्यानंतर जवळपास ७० विद्यार्थ्यांनी एमपीएस्सी भरती प्रकरणाचे रॅकेट उघड करणाऱ्या योगेश जाधव यांची भेट घेतली़ या प्रकरणी योगेश जाधव यांनी विमानतळ पोलिस ठाण्यात तक्रार दिली असून त्यानुसार ११ जणांविरुद्ध गुन्हा नोंदविण्यात आला आहे़ आतापर्यंत या आरोपींनी ७० जणांकडून अशाप्रकारे लाखो रुपये उकळले असल्याची माहिती हाती आली आहे. हा आकडा मोठा असल्याची शक्यता पोलिसांनी वर्तविली़ या प्रकरणात पोलिसांची दोन पथके आरोपींच्या शोधासाठी रवाना झाली आहेत़ यातील सुधाकर किशन पवार याला लोह्यातून अटक केल्यानंतर बुधवारी न्यायालयाने त्याला पाच दिवसांची पोलिस कोठडी सुनावली़ 

टॅग्स :fraudधोकेबाजीNanded policeनांदेड पोलीसStudentविद्यार्थीState Governmentराज्य सरकार