बँक हॅकिंग प्रकरणात आणखी एकाला उत्तर प्रदेशातून उचलले
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 6, 2021 04:30 IST2021-02-06T04:30:53+5:302021-02-06T04:30:53+5:30
शंकर नागरी सहकारी बँकेतील साडे चौदा कोटी रुपये आयडीबीआयच्या खात्यातून हॅक करून लंपास करण्यात आले होते. या गुन्ह्याच्या तपासासाठी ...

बँक हॅकिंग प्रकरणात आणखी एकाला उत्तर प्रदेशातून उचलले
शंकर नागरी सहकारी बँकेतील साडे चौदा कोटी रुपये आयडीबीआयच्या खात्यातून हॅक करून लंपास करण्यात आले होते. या गुन्ह्याच्या तपासासाठी पोलिसांनी सायबर सेलची मदत घेतली. यासाठी मुंबई येथून सायबरमधील तज्ज्ञाला पाचारण करण्यात आले होते. या प्रकरणाचा तपास स्थानिक गुन्हे शाखेमार्फत सुरू असून २९ जानेवारी रोजी पथकाने रुमानिका रोनाल्ड पी. किटासिबवा, आयव्ही मोनुके केनेडी नयबुतो, गलाबुजी मुकीसा रॉबर्ट फेड या तिघा विदेशींसह प्रिया गोविंदअप्पा सावनूर (हुबळी) या चौघांना धारवाड येथून अटक केली होती. त्यांच्याकडून गुन्ह्यात वापरलेल्या दोन लॅपटॉपसह आठ चेकबुक, पाच पासबुक आणि १३ डेबीट कार्ड जप्त करण्यात आले होते. त्यानंतर गुरुवारी याप्रकरणी उत्तर प्रदेशातील गाेरखपूर येथून मयंक मनोहरलाल शर्मा यास ताब्यात घेण्यात आले आहे. मयंक याच्या वेगवेगळ्या बँक खात्यावर १६ लाख रुपयांची रक्कम वळविल्याचा आरोप आहे.