नांदेड शहरात आणखी १४ बाधित आढळले
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 5, 2021 06:09 IST2021-02-05T06:09:00+5:302021-02-05T06:09:00+5:30
दरम्यान, सोमवारी आणखी २८ जणांनी कोरोनावर यशस्वीपणे मात केली. यामध्ये नांदेड मनपांतर्गत एनआरआय भवन व गृहविलगीकरणातील १५ जणांसह शासकीय ...

नांदेड शहरात आणखी १४ बाधित आढळले
दरम्यान, सोमवारी आणखी २८ जणांनी कोरोनावर यशस्वीपणे मात केली. यामध्ये नांदेड मनपांतर्गत एनआरआय भवन व गृहविलगीकरणातील १५ जणांसह शासकीय वैद्यकीय महाविद्यालय, गोकुंदा आणि जिल्हा रुग्णालयातील प्रत्येकी एकाचा समावेश आहे. बिलोली तालुक्यातील तीन तर देगलूर तालुक्यातील दोघांसह खाजगी रुग्णालयात उपचार घेत असलेल्या पाच जणांनीही कोरोनावर मात केली. त्यामुळे आजपर्यंत कोरोनामुक्त झालेल्या रुग्णांची संख्या २१ हजार ४५० एवढी झाली आहे.
चौकट ..........
बारा जणांची प्रकृती गंभीर
जिल्ह्यात सद्य:स्थितीत ३२३ जणांवर उपचार सुरू आहेत. यामध्ये विष्णुपुरी महाविद्यालय १९, जिल्हा रुग्णालय १४, जिल्हा रुग्णालय नवीन इमारत ९, मुखेड ७, हदगाव २, महसूल कोविड केअर सेंटर १३, किनवट ३, देगलूर २, खाजगी रुग्णालय १२, नांदेड मनपांतर्गत गृहविलगीकरणात २०७, तर जिल्ह्यातील तालुक्यांतर्गत गृहविलगीकरणात ३५ जणांवर उपचार सुरू आहेत. यातील १२ जणांची प्रकृती गंभीर असल्याचे जिल्हा रुग्णालयाच्या वतीने सांगण्यात आले.