शहरं
Join us  
Trending Stories
1
US Israel Iran War : ४८ तासांत इराणचा विनाश होईल; होर्मुझच्या सामुद्रधुनीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
2
राघव चड्ढा 'भाजपा'मध्ये जाणार? पीएम मोदींच्या विरोधातील पोस्ट केल्या डिलीट; सौरभ भारद्वाज यांचा मोठा दावा
3
बिश्नोईची जादू; मराठमोळ्या Tushar Deshpande चा अचूक मारा! गुजरातला रोखत राजस्थानचा रोमहर्षक विजय
4
हिमाचलमध्ये भीषण अपघात! कुल्लूमध्ये १५ प्रवाशांना घेऊन जाणारी बस खड्ड्यात कोसळली; बचावकार्य युद्धपातळीवर
5
राधानगरीत आता 'रायबा' आणि 'सरदार'चा दरारा! दोन नर वाघांच्या अस्तित्वावर वनविभागाचे शिक्कामोर्तब
6
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
7
IPL 2026 : मामाची कृपा अन् IPL गाजवतोय भाचा! Sameer Rizvi इम्पॅक्टफुल क्रिकेटर कसा घडला?
8
गॅस सिलिंडर कुठे आहे? आता घरबसल्या फोनवर पाहा 'लाईव्ह लोकेशन'; ग्राहकांना मोठा दिलासा
9
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
10
माजी राष्ट्रपतींसह दोन बड्या नेत्यांवर अमेरिकेसाठी हेरगिरीचा आरोप, गद्दार म्हणून होतेय संभावना
11
Travel : मनालीत खूप गर्दी आहे? मग एप्रिलमध्ये फिरायला जा 'या' शांत ठिकाणी; स्वित्झर्लंडही विसराल!
12
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
13
डबल हेडरमध्ये कमालीचं ट्विस्ट! MI पाठोपाठ GT चा कॅप्टन शुभमन गिलही प्लेइंग इलेव्हनमधून 'गायब'
14
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
15
IPL 2026 : समीर रिझवीचा MI विरुद्धही 'धुरंधर' अवतार; DC ला एकतर्फी जिंकून दिली मॅच
16
दात दुखायला लागला अन् नंतर थेट हात-पाय कापण्याची आली वेळ; तरुणासोबत घडलं भयंकर
17
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
18
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
19
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित शर्माचा मोठा पराक्रम! MS धोनीचा विक्रम मोडत साधला 'नंबर वन'चा डाव
20
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
Daily Top 2Weekly Top 5

उमरीत अंगणवाडी पोषण आहार वाटप चौकशी संशयाच्या भोवऱ्यात

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 25, 2018 00:47 IST

लोकमत न्यूज नेटवर्कउमरी : तालुक्यातील सोमठाणा येथे अंगणवाडीच्या पोषण आहार खाद्यसामग्रीचा गावकºयांनी पकडलेला टेम्पो पोलिसांच्या हवाली करण्यात आला असून याप्रकरणाची चौकशी मात्र संशयाच्या भोवºयात सापडली आहे. सलग तिसºया दिवशीही याबाबत काहीच निर्णय झालेला नाही.उमरी तालुक्यातील सोमठाणा येथे २२ सप्टेंबर रोजी सकाळी अंगणवाडी पोषण आहार खाद्यसामग्रीचे वाटप करण्यासाठी टेम्पो आला होता. ...

ठळक मुद्देसोमठाणा येथे पकडलेला टेम्पो पोलिसांच्या हवाली

लोकमत न्यूज नेटवर्कउमरी : तालुक्यातील सोमठाणा येथे अंगणवाडीच्या पोषण आहार खाद्यसामग्रीचा गावकºयांनी पकडलेला टेम्पो पोलिसांच्या हवाली करण्यात आला असून याप्रकरणाची चौकशी मात्र संशयाच्या भोवºयात सापडली आहे. सलग तिसºया दिवशीही याबाबत काहीच निर्णय झालेला नाही.उमरी तालुक्यातील सोमठाणा येथे २२ सप्टेंबर रोजी सकाळी अंगणवाडी पोषण आहार खाद्यसामग्रीचे वाटप करण्यासाठी टेम्पो आला होता. यात बटाणा, मिरची पावडर, गूळ, हळद, सोयाबीन तेल, शेंगदाणा व मटकी अशी आठ प्रकारची खाद्यसामग्री अंगणवाडीला उतरविण्यात आली. यात दोन क्विंटल ३० किलोंऐवजी केवळ दीड क्विंटल बटाणा उतरविण्यात आला. यासंदर्भात संशयावरून गावकºयांनी पावती व प्रत्यक्षात उतरवण्यात आलेल्या मालाची तपासणी केली. यावेळी मोठी तफावत दिसून आली . म्हणून टेम्पोचालकाकडे चौकशी केली. त्याच्याकडून टेम्पोच्या चाव्या काढून घेण्यात आल्या. यावेळी पितळ उघडे पडण्याच्या भीतीने चालकाने घटनास्थळावरून पळ काढला. त्यामुळे गावकºयांचा संशय आणखी बळावला.दरम्यान, विस्ताराधिकारी पी. एल. जाधव यांनी पंचनामा केला. गावकºयांनी आज खाद्यसामग्रीच्या मालाने भरलेला टेम्पो पोलिसांच्या हवाली केला. शनिवारी झालेल्या या घटनेनंतर तीन दिवस उलटले. तरीही कसलीच ठोस कारवाई झालेली नाही. २४ रोजी सोमवारी दुपारी उशिराने बालविकास प्रकल्प अधिकारी ओमप्रकाश नगराळे हे उमरी येथे दाखल झाले .यावेळी सोमठाणा येथील सरपंच विरेंद्रसिंह चंदेल यांनी याप्रकरणी कोणती कारवाई करण्यात आली याची विचारणा केली असता अद्यापपर्यंत कसलीच कार्यवाही करण्यात आली नसल्याचे बाल विकास प्रकल्प अधिकाºयांनी सांगितले. याबाबत सरपंच चंदेल यांनी याप्रकरणी वरिष्ठांकडे तक्रार करणार असल्याचे सांगितले. पोलिसांच्या हवाली करण्यात आलेल्या टेम्पोमध्ये उर्वरित वाटपाचा माल पडून आहे. उर्वरित किती गावांना वाटप करणे बाकी आहे ? आतापर्यंत किती गावामध्ये वाटप झाले ? याबाबत कसलीच माहिती मिळू शकली नाही. टेम्पोचालक घटनास्थळावरून तीन दिवसांपासून गायब होण्याचे काय कारण असू शकते? नांदेड जिल्ह्यात कृष्णूर येथील अनाज कंपनीच्या रेशनचा धान्य घोटाळा गाजतो आहे. असे असताना उमरीच्या अंगणवाडी पोषण आहार वाटपाचा टेम्पो पकडल्यानंतर हे प्रकरण अधिकच गुंतागुंतीचे दिसत आहे. म्हणून या प्रकरणाचे धागेदोरे कुठपर्यंत पसरले आहेत. याबाबतचा संशय वाढला आहे. पोलीस तसेच जिल्हा प्रशासनाने या प्रकरणाची कसून चौकशी करावी, अशी नागरिकांतून मागणी होत आहे.

सोमठाणा येथे ठेकेदाराने कमी माल दिला म्हणून त्याच्यावर कार्यवाही करण्यात यावी ही आपली स्पष्ट भूमिका आहे. यात पूर्णपणे ठेकेदाराचा दोष आहे आपण कुणालाच पाठीशी घालणार नाही- ओमप्रकाश नगराळे, बालविकास प्रकल्प अधिकारी, उमरी

टॅग्स :NandedनांदेडPoliceपोलिसraidधाडEducationशिक्षण