शहरं
Join us  
Trending Stories
1
रिझर्व्ह बँकेचा 100, 200 रुपयांच्या नोटांबद्दल महत्त्वाचा निर्णय, सर्वसामान्यांना मिळणार दिलासा
2
परप्रांतीय प्रियकराच्या मदतीनं पतीचा काढला काटा; हत्येनंतर अपघाताचा रचला बनाव, पण...
3
‘पीओके’मधील दहशतवादी नेटवर्कवर भारत करणार प्रहार; उच्चस्तरीय विचारविनिमय सुरू; ४२ सक्रिय दहशतवादी तळ केंद्राच्या रडारवर
4
आजचे राशीभविष्य, २९ एप्रिल २०२५: सार्वजनिक क्षेत्रात मानहानी होण्याची शक्यता
5
तीन देशांत एकाच वेळी वीज गायब; सर्व काही थांबले; देशभरातील वाहतूक सिग्नलवर परिणाम
6
१६ पाकिस्तानी यूट्युब चॅनेलवर सरकारची बंदी; केंद्रीय गृहमंत्रालयाच्या शिफारशींनुसार बंदी
7
त्यांची जबाबदारी माझ्यावर होती, मी माफी कशी मागू, शब्द नाहीत; मुख्यमंत्री ओमर अब्दुल्ला यांनी दिली कबुली
8
नौदलाच्या ताफ्यात येणार फ्रान्सची २६ राफेल विमाने; ६४ हजार कोटींच्या खरेदी करारावर देशांच्या स्वाक्षऱ्या
9
गूढ कायम.. खरं, खोट्याचा होईना उलगडा; डॉ. वळसंगकरांच्या आत्महत्येला दहा दिवस ओलांडले
10
‘म्हाडा’चे ५ हजार घरांचे दिवाळी गिफ्ट; जुन्या इमारतीचाही पुनर्विकास होणार
11
१९ चाळींचा पुनर्विकास एमएमआरडीए करणार; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत महत्त्वपूर्ण निर्णय
12
‘लिव्ह इन’, उत्तराखंड आणि समान नागरी संहिता
13
बुलेट ट्रेन २०२८ अखेरीस मुंबईतून धावणार सुसाट, नवी मुंबई विमानतळ गेम चेंजर ; मुख्यमंत्री फडणवीस
14
मुलांचा ताबा देताना धर्म विचारात घेतला जाऊ शकत नाही : हायकोर्ट
15
कान टोचले, बरे झाले ! केंद्राने विशेष पत्रक काढून माध्यमांना काही मार्गदर्शक सूचना दिल्या
16
पाण्यासाठी भारत-पाक युद्ध पेटण्याची वेळ येऊन ठेपली ?
17
मोठमोठे रस्ते बांधत आहात, इकडे लाेकांचा जीव जाताेय; जखमींवर कॅशलेस उपचारांवरून सर्वाेच्च न्यायालयाने केंद्राला फटकारले
18
बोगस डॉक्टरांविरोधात प्रशासनाने कसली कंबर; तालुकापातळीवरही समिती सक्षम होणार!

अन् अजितदादा जेव्हा सिंहासन नाकारतात तेव्हा...

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 21, 2018 15:55 IST

राजकारणात जे काही करायचे ते खुर्चीसाठीच असत असं बोलल्या जात असल तरी अजितदादा पवार यांचा सारखा बडा नेता जेंव्हा चक्क सिंहासन नाकारतो तेव्हा मात्र अनेकांना आश्चर्याचा धक्का बसल्याशिवाय राहत नाही.

उमरी ( नांदेड ) - राजकारणात जे काही करायचे ते खुर्चीसाठीच असत असं बोलल्या जात असल तरी अजितदादा पवार यांचा सारखा बडा नेता जेंव्हा चक्क सिंहासन नाकारतो तेव्हा मात्र अनेकांना आश्चर्याचा धक्का बसल्याशिवाय राहत नाही.

त्याचे असे झाले की , सध्या राष्ट्रवादी काँग्रेसचे मराठवाड्यात  हल्लाबोल आंदोलन सुरू आहे, या आंदोलनाच्या पाचव्या दिवशी नांदेड जिल्ह्यातील उमरी येथील सभेसाठी अजितदादा आणि अन्य नेत्यांचे व्यासपीठावर आगमन झाले. व्यासपीठावर मध्यभागी एक राजेशाही सिंहासनासारखी, महाराजा खुर्ची मांडली होती तर बाजूला साध्या  खुर्च्या होत्या. स्थानिक नेत्यांनी दादा यांना त्या राजेशाही खुर्ची वर बसण्याचा आग्रह केला मात्र दादा यांनी तीथे बसण्यास स्पष्ट नकार देत ती महाराजा खुर्ची आधी उचला म्हणून आदेश दिला . दादांच्या आदेशाप्रमाणे कार्यकर्त्यांनी ती खुर्ची हटवली आणि दादांनी साध्या खुर्चीवर बसने पसंद केले. दादांचा हा साधेपणा जमलेल्या हजारो नागरिकांना चांगलाच भावला.

हे सरकार फसवे असून शेतक-यांच्या विरोधातले

शेतीसाठीच्या पाणीपट्टीत वाढ, कर्ज माफिची  फसवी घोषणा, शेतपंपाचे विज कनेक्शन तोडणे, शेतीला लागणा-या साधन सामुग्रीच्या किंमतीत वाढ केल्याने शेतकरी मेटाकुटीला आला आहे. यामुळे हे सरकार शेतकरी हिताचे नसून फसवे आणि त्यांच्या विरोधातले आहे अशी जोरदार टीका माजी उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी येथे आयोजित हल्लाबोल मेळाव्यात केले.

शहरातील बैल बाजार मैदानात आज राष्ट्रवादी काँंग्रेस पार्टीच्या वतीने हल्लाबोल मेळाव्याचे आयोजन करण्यात आले होते. मेळाव्याच्या अध्यक्षस्थानी माजी आ.शंकरअण्णा धोंडगे, तर व्यासपीठावर विरोधी पक्ष नेते धनंजय मुंडे, पक्षप्रवक्ते नवाब मलीक, चित्रा वाघ, संग्राम कोते, आ.सतीश चव्हाण, विक्रम काळे, कमलकिशोर कदम, प्रांजली रावनगावकर, बसवराज पाटील, वसंत सुगावे, हरिहर भोसीकर, सुनील कदम, दिलीप धोंडगे, संजय पाटील क-हाळे, बाबुराव केंद्रे आदींची उपस्थिती होती. 

या प्रसंगी बोलताना अजित पवार म्हणाले, आघाडी सरकारच्या काळात लोहा-कंधार मतदार संघात धरण, तलाव उभारण्याचे निर्णय कुठलाही भेदभाव न ठेवता घेतले. परंतु आजचे सरकार शेतकऱ्यांचे विज कनेक्शन तोडत आहे. कर्ज माफ करण्याची घोषणा केली तिही फसवी निघाली. बेरोजगारांना नोकरी देतो म्हणाले मात्र गेल्या साडेतीन वर्षात एकालाही नोकरी दिली नाही. यामुळे हे सरकार फसवे असून पूर्णपणे अपयशी ठरलेले  आहे अशी जोरदार टीका त्यांनी यावेळी केली. यानंतर विरोधी पक्षनेते धनंजय मुंढे, नवाब मलिक, माजी आ. शंकरआण्णा धोंडगे यांनी सुद्धा भाषणातून सरकारवर टीका केली.  

टॅग्स :Ajit Pawarअजित पवारNCPराष्ट्रवादी काँग्रेसNandedनांदेड