नांदेडात महामानवाच्या जयंतीची जय्यत तयारी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 14, 2019 00:29 IST2019-04-14T00:27:56+5:302019-04-14T00:29:01+5:30
महामानव डॉ़ बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीची जय्यत तयारी सुरु असून रविवारी पहाटेपासून रेल्वेस्थानक परिसरातील डॉ़बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्याला अभिवादनासाठी लाखोंचा जनसमुदाय लोटणार आहे़

नांदेडात महामानवाच्या जयंतीची जय्यत तयारी
नांदेड : महामानव डॉ़ बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीची जय्यत तयारी सुरु असून रविवारी पहाटेपासून रेल्वेस्थानक परिसरातील डॉ़बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्याला अभिवादनासाठी लाखोंचा जनसमुदाय लोटणार आहे़ त्यामुळे पोलीस प्रशासनानेही तगडा बंदोबस्त ठेवला आहे़ रविवारी एक दिवसासाठी वाहतूक मार्गातही बदल करण्यात आला आहे़
वाहतुकीसाठी बंद असलेले मार्ग- हबीब टॉकीज, जुना मोंढा, देना बँक, महावीर चौक, तरोडेकर मार्केट, वजिराबाद चौक, कलामंदिर, शिवाजीनगर, आयटीआय, श्रीनगर, वर्कशॉप कॉर्नर जाण्या-येण्यासाठी बंद राहतील़ वर्कशॉप, श्रीनगर, आयटीआय, शिवाजीनगर, कलामंदिर, वजिराबाद चौक, शिवाजी पुतळा, रेल्वेस्थानक, आंबेडकर पुतळ्याकडे जाणारा रस्ता़ सिडको, हडको, लोहा, सोनखेड ते जुना मोंढ्याकडे येणारा रस्ता जुना मोंढापासून बंद राहील़ अण्णा भाऊ साठे चौक, हिंगोली गेट, चिखलवाडी ते महावीर चौकाकडे येणारा रस्ता फॉरेस्ट आॅफिसपासून बंद राहील़ बाफना टी पॉर्इंट, कविता रेस्टॉरंट, भगतसिंघ चौक मार्गे जुना मोंढाकडे येणारा रस्ता भगतसिंघ चौकापासून बंद राहील़ अण्णा भाऊ साठे चौक, हिंगोली गेट, रेल्वेस्थानकाकडे येणारा रस्ता रेल्वे क्वॉर्टरपासून बंद राहील़
नायगाव, नरसी व वाजेगावकडून येणारी वाहने हिंगोली गेटपर्यंत येतील़ हिंगोली गेटपासून पुढे वाहतुकीस रस्ता बंद असेल़ अण्णाभाऊ साठे चौक ते आयटीआय जाणारा रस्ता बंद राहील़ टिळनगर चौक, भाग्यनगर कमान ते वर्कशॉप जाणारा व येणारा रस्ता बंद राहील़ गणेशनगर वाय पॉर्इंट ते फुले मार्केट रस्ता़ चिखलवाडी कॉर्नर ते शिवाजी पुतळा रस्ता बंद राहील़ तर पर्यायी रस्त्यांचा वापर करण्याचे आवाहन केले आहे़ त्यामध्ये बर्की चौकाकडून जुना मोंढाकडे येणारी वाहतूक हबीब टॉकीजपासून महम्मद अली रोडमार्गे भगतसिंघ चौक, बाफना टी पॉर्इंट मार्गे हिंगोली गेट अशी वळविण्यात आली आहे़ सिडको, हडको, लोहा, सोनखेडकडून शहरात येणारी वाहतूक साई कमान, गोवर्धनघाट, नवीन पूल, तिरंगा चौक मार्गे पोलीस मुख्यालय, लालवाडी, खडकपुरा, अंडरब्रीज, शिवाजीनगर, पिवळी गिरणी, गणेश नगर वाय पॉर्इंट, पावडेवाडी नाका मार्गे मोर चौक, छत्रपती चौक ते कॅनॉल रोड बायपास अशी वळविली आहे़ राज कॉर्नर ते जुना मोंढाकडे जाणारी वाहतूक राज कॉर्नर, शिव मंदिर मार्गे पीरबुºहाण चौक, टिळक नगर चौक, आनंदनगर, नाईक चौक, अण्णा भाऊ साठे चौक अशी वळविण्यात आली आहे़ तसेच नाईक चौक, महाराणा प्रताप चौक, नमस्कार चौक अशी वळविली आहे़