नांदेड विभागातून आणखी ७५ किसान रेल्वे सोडण्याचे उद्दिष्ट
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 5, 2021 06:09 IST2021-02-05T06:09:09+5:302021-02-05T06:09:09+5:30
नांदेड विभागातून पाठविलेल्या किसान रेल्वे संपूर्ण देशभर म्हणजेच न्यू गुवाहाटी, न्यू जलपाईगुडी , चितपूर, मालडा, आगरताळा, आदी ठिकाणी ...

नांदेड विभागातून आणखी ७५ किसान रेल्वे सोडण्याचे उद्दिष्ट
नांदेड विभागातून पाठविलेल्या किसान रेल्वे संपूर्ण देशभर म्हणजेच न्यू गुवाहाटी, न्यू जलपाईगुडी , चितपूर, मालडा, आगरताळा, आदी ठिकाणी पाठविण्यात आल्या आहेत. या वर्षी मार्च महिन्याअखेरपर्यंत आणखी ७५ विशेष रेल्वेगाड्या सोडण्यात येतील. या रेल्वेंचे वैशिष्ट्य म्हणजे या गाड्या निश्चित वेळापत्रकानुसार धावतात. साधारण ५० किलोमीटर प्रतितास या वेगाने धावतात; यामुळे शेतीमाल वेळेवर पोहोचतो. शेतकऱ्यांना चांगली बाजारपेठ उपलब्ध होते. शेतकऱ्यांना आणखी प्रोत्साहित करण्यासाठी अन्न प्रक्रिया उद्योग मंत्रालयाने ‘ऑपरेशन ग्रीन्स – टॉप टू टोटल’च्या अंतर्गत किसान रेलगाड्यांद्वारे अधिसूचित फळे आणि भाजीपाल्यांच्या वाहतुकीवर ५० टक्के वाहतूक दर सवलत देण्याची घोषणा केली. त्या अनुषंगाने नांदेड विभागातून धावणाऱ्या सर्व किसान रेल्वेला वाहतुकीसाठी ५० टक्के सवलत देण्यात आल्याचे ते म्हणाले.
किसान रेल्वे व्यतिरिक्त नांदेड विभागाने या वर्षी मालवाहतुकीमध्ये बसमत, औरंगाबाद आणि परभणी रेल्वे स्थानकांवरून विविध ठिकाणी १२ साखरेचे रेक पाठविले. तसेच आदिलाबाद येथून ५ मक्याचे रेक पाठविले. हिंगोली रेल्वेस्थानकावरून तीन वर्षांच्या अंतरानंतर सरकीचे तीन रेक पाठविण्यात आले; तसेच मालटेकडी–नांदेड येथून गुळाचे ५ रेक पाठविण्यात आले आहेत. नांदेड विभागातील मालगाड्यांची गती २८ किलोमीटर प्रतितास होती; यावर्षी ती वाढून ४५ किलोमीटर प्रतितास झाली आहे. यामुळेही मालवाहतूक वाढण्यास मदत झाल्याचे उपिंदर सिंघ यांनी सांगितले.