शहरं
Join us  
Trending Stories
1
उद्धव ठाकरे कफनचोर, तुम्ही प्रतिसाद देणार का? देवेंद्र फडणवीसांचा मतदारांना सवाल
2
Controversy : Sanju Samson अम्पायरच्या निर्णयावर नाखूश दिसला, दिल्लीचा मालक out आहे, out आहे! ओरडला
3
वापरा आणि फेकून द्या ही भाजपची वृत्ती; त्यांच्या रेल्वेच्या डब्याला भ्रष्टाचाराची चाके- उद्धव ठाकरे
4
धक्कादायक! पुण्यातील वारजे माळवाडीच्या रामनगरमध्ये हवेत गोळीबार; दुचाकीवर आले होते तीन जण
5
सचिन तेंडुलकरच्या शेजाऱ्यांचे एक ट्विट अन् मग झालं असं काही...; वाचा मुंबईतील घराबद्दलचा किस्सा
6
पत्नीने थंड भाजी दिल्याने पतीने घेतला टोकाचा निर्णय, बिट मार्शल्समुळे वाचला जीव
7
Sanju Samson च्या वादग्रस्त विकेटने मॅच फिरली; DCने बाजी मारून प्ले ऑफची आस कायम राखली
8
Israel Hamas War: आता इस्रायलचा विजय झाल्याशिवाय हे हल्ले थांबणार नाहीत; पंतप्रधान Benjamin Netanyahu यांचे मोठे विधान
9
हृदयद्रावक! जळगावमध्ये भरधाव कारने दुचाकीला दिली धडक; आईसह दोन मुले ठार
10
'हमास'च्या समर्थनार्थ पोस्टला लाईक केल्याबद्दल सोमय्या स्कूल व्यवस्थापनाकडून प्राचार्यांचे निलंबन
11
"ज्या-ज्या ठिकाणी चोरलेला धनुष्यबाण आहे, तिथे 'मशाल' जिंकणार"; संजय राऊतांना विश्वास
12
मोठी बातमी: बारामती मतदारसंघातील PDCC बँकेच्या शाखा व्यवस्थापकाविरुद्ध आचारसंहिता भंगाचा गुन्हा
13
IPL मध्ये असा गोष्टी घडत असतात...! दिल्लीकडून पराभवानंतर संजू सॅमसनचं विधान चर्चेत 
14
"...ही देशातील प्रत्येक दलित, मागास, आदिवासीसाठी धोक्याची घंटा; I.N.D.I.A.च्या इराद्यापासून सावध राहा" - PM मोदी
15
"त्या लोकांना केवळ मला उद्ध्वस्त करण्यासाठी कामं नेमून दिली होती"; देवेंद्र फडणवीसांचा खळबळजनक दावा
16
Apple चे नवीन iPad Air अन् iPad Pro लॉन्च; जाणून घ्या किंमत अन् फीचर्स...
17
जॅक फ्रेझर-मॅकगर्क, अभिषेक पोरेल, त्रिस्तान स्तब्स यांची आतषबाजी, DC चे राजस्थानसमोर दोनशेपार लक्ष्य
18
"महाराष्ट्र काँग्रेसचे लोक 26/11च्या मुंबई हल्ल्यातील दहशतवाद्यांना क्लिन चिट देत आहेत..."; मोदींचा हल्लाबोल
19
"इंडी आघाडीचा एकच अजेंडा, ...तर ते 'मिशन कॅन्सल' चालवणार"! पंतप्रधान मोदींचा जोरदार हल्ला 
20
'नॉट रिचेबल' किरण सामंत अखेर 'रिचेबल', 15 मिनिटे बाकी असताना बजावला मतदानाचा हक्क!

सरपंच आरक्षण सोडतीनंतर चुरस वाढली, प्रस्थापित नेत्यांची गावातच कोंडी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 22, 2020 12:18 AM

अनेक दिग्गज राजकारण्यांच्या गावातील सरपंचपद राखीव

ठळक मुद्दे५८४ ग्रामपंचायतींवर महिलाराज

नांदेड : जिल्ह्यातील आमदार, माजी आमदारांसह दिग्गज नेत्यांनी आपल्या गावातील प्रमुख पदाधिकाऱ्यांना सरपंचपदी वर्णी लावण्याची ग्वाही दिली होती. मात्र गुरुवारी झालेल्या १३०९ ग्रामपंचायतींच्या आरक्षण सोडतीत अनेक दिग्गज राजकारण्यांच्या गावातील सरपंचपद राखीव झाल्याने पदाधिकाऱ्यांची कोंडी झाली आहे. विशेष म्हणजे, जिल्ह्यातील तब्बल ५८४ ग्रामपंचायतींवर महिलाराज येणार असल्याचेही स्पष्ट झाले आहे. 

बिलोली तालुक्यातील खतगाव या माजी खा. भास्करराव पाटील खतगावकर यांच्या गावातील सरपंचपदाचे आरक्षण ओबीसी महिलासाठी आहे. तर बिलोली तालुक्यातीच माजी आ. गंगाराम ठक्करवाड यांच्या कासराळीचे सरपंचपद अनुसूचित जातीसाठी जाहीर झाले आहे. आ. रावसाहेब अंतापूरकर  यांच्या देगलूर तालुक्यातील अंतापूर या गावचे सरपंचपद मागास प्रवर्ग महिलेसाठी तर भाजप जिल्हा उपाध्यक्ष प्रकाश पाटील यांच्या बेंम्बरा या गावचे सरपंचपद अनुसूचित जाती महिलेसाठी राखीव झाले आहे. तीच बाब जि. प. सदस्य अनुराधा पाटील यांचे गाव असलेल्या खानापूरचे सरपंचपद अनुसूचित जाती महिलेसाठी राखीव झाले आहे.

देगलूरचे राष्ट्रवादी काँग्रेसचे तालुकाध्यक्ष अंकुश देसाई देगावकर यांचे गाव असलेल्या देगाव बु. चे सरपंचपद सर्वसाधारण महिलेसाठी तर काँग्रेस तालुकाध्यक्ष प्रीतम देशमुख यांच्या हणेगावचे सरपंचपद मागास प्रवर्गातील महिलेसाठी राखीव झाले आहे. मुक्रमाबाद येथील ग्रामीण जिल्हाध्यक्ष व्यंकटराव गोजेगावर यांच्या गोजेगावचे सरपंचपद अनुसूचित जातीसाठी राखीव झाले आहे. काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष गोविंदराव नागेलीकर यांच्या मुदखेड तालुक्यातील नागेलीचे सरपंचपद सर्वसाधारण महिलेसाठी, तालुकाध्यक्ष उद्धवराव पवार आणि बालाजी सूर्यतळे यांचे गाव असलेल्या निवघ्याचे सरपंचपद अनुसूचित जाती महिलेसाठी राखीव झाले आहे. 

हदगाव तालुक्यातील विधानसभेचे पराभूत उमेदवार बाबूराव कदम यांच्या कोहळी गावचे सरपंचपद अनुसूचित जाती महिलेसाठी तर जि.प.सदस्य मारोती लाेखंडे यांच्या तळणी गावचे सरपंचपद मागास प्रवर्गासाठी राखीव झाले आहे. काँग्रेसचे माजी जिल्हाध्यक्ष बी. आर. कदम आणि युवक काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष तिरुपती कोंढेकर यांच्या कोंढा गावचे सरपंचपद सर्वसाधारण महिलेसाठी, काँग्रेसचे जिल्हा सरचिटणीस  संजय देशमुख यांच्या लहान गावचे सरपंचपद मात्र खुले झाले आहे. माजी जि. प. अध्यक्ष माणिकराव इंगोले, माजी जि. प. सदस्य नागोराव इंगोले, शेतकरी नेते प्रल्हाद इंगोले यांच्या मालेगावचे सरपंचपदही खुले झाले आहे. तर शिवसेनेचे जिल्हा परिषद सदस्य बबनराव बारसे यांच्या बारस गावचे सरपंचपद अनुसूचित जाती महिलेसाठी राखीव झाले आहे.

चिखली अ.जातीसाठी तर आष्टी अ.जाती महिलेसाठीखा.प्रताप पाटील चिखलीकर यांचे कंधार तालुक्यातील चिखली गावचे सरपंचपद अनुसूचित जातीसाठी आरक्षित झाले आहे. तर हदगावचे माजी आ. नागेश पाटील आष्टीकर यांच्या आष्टी गावचे सरपंचपदही अनुसूचित जाती महिलसाठी आरक्षित झाले आहे. माजी खा.सुभाष वानखेडे यांच्या ल्याहरी गावातही आता अनुसूचति जमाती प्रवर्गातील सरपंच असेल माजी खा.डॉ.केशवराव धोंडगे व माजी आ.गुरुनाथराव कुरुडे यांच्या बहाद्दरपुरा गावचे सरपंचपद अनुसूचित जातीसाठी आरक्षित झाले आहे. माजी आ.शंकरअण्णा धोंडगे यांच्या बाचोटी गावच्या सरपंचपदी अनुसूचित जाती प्रवर्गातील महिला येईल. माजी आ.ईश्वरराव भोसीकर यांच्या पानभोसीचे सरपंचपद मागास प्रवर्गासाठी तर आ.श्यामसुंदर शिंदे यांच्या हळदा गावचे सरपंचपद महिलेसाठी आरक्षित झाले आहे.

टॅग्स :Nandedनांदेडsarpanchसरपंचgram panchayatग्राम पंचायत