शहरं
Join us  
Trending Stories
1
MIMच्या पदयात्रेत मोठा राडा; जलील यांच्यासमोरच कार्यकर्त्यांमध्ये फ्री-स्टाईल हाणामारी!
2
अंबरनाथमध्ये भाजपशी युती करणाऱ्या काँग्रेसच्या १२ नगरसेवकांना दणका; पक्षाने केलं निलंबित
3
Vaibhav Suryavanshi Century : वैभव सूर्यवंशीची विश्वविक्रमी सेंच्युरी! असा पराक्रम करणारा पहिला कॅप्टन
4
Video: अमेरिकेकडून रशियन तेलवाहू टँकरचा पाठलाग; मॉस्कोने सुरक्षेसाठी पाठवली नेव्ही, आता पुढे...
5
आकाराने गोव्यापेक्षाही लहान, नांदतात सगळेच श्रीमंत! 'हा' छोटासा देश कसा बनला कुबेराचा खजिना?
6
कुटुंब रंगलंय निवडणूक प्रचारात; शिंदेसेनेच्या उमेदवारांची घरच्यांसाठीच तिकीट घेण्यात आघाडी
7
मुस्तफिजुर रहमानचा बांगलादेशने बदला घेतला; भारतीय अँकरला बीपीएलमधून बाहेर काढले
8
Riitual: सावधान! हातातील पूजेचा धागा 'इतक्या' दिवसांनंतर बनतो नकारात्मक ऊर्जेचं कारण!
9
आरक्षण मिळाल्यानंतर पुन्हा जनरल कॅटेगरीवर दावा करता येणार नाही; सर्वोच्च न्यायालयाचा मोठा निर्णय
10
एक्स गर्लफ्रेंडशी पुन्हा संबंध जोडण्यासाठी रचला कट; अपघात घडवून आणल्याचा धक्कादायक खुलासा
11
वैभव सूर्यवंशीचा धमाक्यावर धमाका! षटकार-चौकारांची 'बरसात' करत ठोकली सलग दुसरी फिफ्टी
12
Dhule: शिंदेसेनेच्या उमेदवार गीता नवले यांची फेसबुकवरून बदनामी, नेमका प्रकार काय?
13
Nashik Municipal Election 2026 : शिंदेसेना वरचढ ठरणार की भाजप गड राखणार? अटीतटींच्या लढतींनी वेधले मतदारांचे लक्ष
14
भयंकर! सुंदर दिसण्याची ओढ बेतली जीवावर; कॉस्मेटिक सर्जरीनंतर प्रसिद्ध इन्फ्लुएन्सरचा मृत्यू
15
"त्यांच्या कोत्या वृत्तीला राज ठाकरेंनी साथ दिली"; उद्धव ठाकरेंनी मनात राग धरून डावलल्याचा संतोष धुरींचा आरोप
16
8th Pay Commission: आठव्या वेतन आयोगापूर्वी केंद्रीय कर्मचारी आणि पेन्शनर्ससाठी गुड न्यूज; DA-DR मध्ये होणार बंपर वाढ?
17
Nashik Municipal Election 2026 : भाजपचे आमदारच नाराज, तेथे कार्यकर्त्यांचे काय? अरविंद सावंत यांची टीका
18
अवघी ६ लाख लोकसंख्या असलेला 'हा' देश भारतासाठी अति महत्त्वाचा का आहे? कारण काय?
19
"सत्ता हेच सर्वस्व नाही, हे लोक स्वार्थासाठी..."; भाजप-काँग्रेस आघाडीवर श्रीकांत शिंदे बरसले
20
ऑस्ट्रेलियानं रचला इतिहास! १३४ वर्षांचा विक्रम मोडला; टीम इंडियाच्या वर्ल्ड रेकॉर्डशी बरोबरी
Daily Top 2Weekly Top 5

पोलीसांच्या मारहाणीनंतर युवकाने जाळून घेतले; फौजदारासह एक कर्मचारी बडतर्फ

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 18, 2019 12:01 IST

याप्रकरणी फौजदार व पोलीस नाईक यांना बडतर्फ करण्यात आले आहे

ठळक मुद्देफौजदारासह पाच जणांवर गुन्हे  दोघेजण अटकेत असून इतर फरार आहेत 

नांदेड : हिमायतनगर येथील शेख सद्दाम या युवकाच्या जळीत प्रकरणात गुन्हा दाखल पोलीस उपनिरीक्षक ज्ञानोबा शिवाजी काळे आणि  पो ना संतोष गंगाधरराव राणे यांना सेवेतून बडतर्फ करण्याचे आदेश विशेष पोलीस निरीक्षक प्रकाश मुत्याल आणि बुधवारी रात्री उशिरा काढले. पोलीस अधीक्षक संजय जाधव यांनी काळे आणि राणे यांना बडतर्फ करण्याची शिफारस केली होती. 

कौटुंबिक वाद झाल्याने झालेल्या प्रकरणाची माहिती देण्यासाठी शेख सद्दाम यांनी ३ जुलै रोजी पोलीस ठाणे गाठले. मात्र, पोलीस उपनिरीक्षक ज्ञानोबा काळे, पोलीस कर्मचारी संतोष राणे, जिचकार यांनी फिर्याद न घेता सद्दाम यांना जबर मारहाण करून त्यांच्याकडील रोख १७ हजार ५०० व सोन्याची अंगठी काढून घेतल्याचा आरोप आहे. या घटनेनंतर सद्दाम यांनी ठाणे परिसरातच स्वत:च्या अंगावर रॉकेल टाकून पेटवून घेतले. यात ते ८० टक्के भाजले असून, नांदेडच्या शासकीय रुग्णालयात त्यांच्यावर उपचार सुरू आहेत. या घटनेला जबाबदार धरून संबंधित पोलिसांवर कारवाई करावी, अशी मागणी सद्दाम यांच्या नातेवाईकांनी लावून धरली. बुधवारी पोलिसांनी पोलीस उपनिरीक्षक ज्ञानोबा काळे, संतोष जिचकार, संतोष गंगाराम राणे, शेख सिराज शेख सरदार, शेख सरदार, जिशान मिर्झा यांच्याविरूद्ध गुन्हा नोंद केला. शेख सिराज, शेख सरदार, शेख सरदार यांना अटक झाली. उर्वरित आरोपी फरार आहेत. या प्रकरणात कसूरदार उपनिरीक्षक काळे, पो ना राणे यांच्याविरुद्ध पोलीस अधीक्षक जाधव यांनी बडतर्फ करण्याची शिफारस केली होती. या शिफारसीनुसार विशेष पोलीस निरीक्षक मुत्याल यांनी बडतर्फीचे आदेश काढले.

हिमायतनगरमध्ये फौजफाटाघटनेच्या पार्श्वभूमीवर हिमायतनगरात मोठा फौजफाटा दाखल करण्यात आला. अतिरिक्त पोलीस प्रमुख विजय पोवार, सहा. पोलीस अधीक्षक नुरुल हसन हिमायतनगरात तळ ठोकून आहेत. घटनेतील दोषींना पाठीशी घालणार नाही, असे दोघांनीही पत्रकारांशी बोलताना सांगितले. 

कायदा हा सर्वांसाठी समान असून, या प्रकरणातील सर्व आरोपींना तात्काळ अटक करण्यात येईल. आरोपींच्या शोधासाठी एक पथक रवाना करण्यात आले आहे. - रवींद्र बोरसे, पोलीस निरीक्षक, हिमायतनगर

टॅग्स :Crime Newsगुन्हेगारीNandedनांदेडPoliceपोलिसArrestअटक