किनवट अभिवक्ता संघाच्या अध्यक्षपदी ॲड. अरविंद चव्हाण, तर सचिवपदी ॲड. पंकज गावंडे
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 6, 2021 04:31 IST2021-02-06T04:31:15+5:302021-02-06T04:31:15+5:30
अध्यक्षपदासाठी ॲड. अरविंद चव्हाण व ॲड. किशोर मुनेश्वर यांच्यात निवडणूक झाली. अन्य पदाधिकारी हे बिनविरोध निवडून आले. ...

किनवट अभिवक्ता संघाच्या अध्यक्षपदी ॲड. अरविंद चव्हाण, तर सचिवपदी ॲड. पंकज गावंडे
अध्यक्षपदासाठी ॲड. अरविंद चव्हाण व ॲड. किशोर मुनेश्वर यांच्यात निवडणूक झाली. अन्य पदाधिकारी हे बिनविरोध निवडून आले. निवडण्यात आलेले पदाधिकारी असे; अध्यक्ष ॲड. अरविंद चव्हाण, उपाध्यक्ष ॲड.तोफिक कुरेशी, सचिव ॲड. पंकज गावंडे, सहसचिव ॲड. बिपीन पवार, कोषाध्यक्ष ॲड. सुनील येरेकार. निवडणूक निर्णय अधिकारी म्हणून ॲड. विजय चाडावार यांनी काम पाहिले, तर त्यांना ॲड. सुनील येरेकार यांनी सहकार्य केले. निवडणूक प्रक्रियेसाठी विठ्ठल आरपेलिवार व संतोष जकुलवाड यांनी सहकार्य केले.
निवडणूक प्रक्रिया शांततेत पार पाडावी यासाठी ॲड. अनंत वैद्य, ॲड. सुभाष ताजने, ॲड. यशवंत गजभारे, ॲड. दिनानाथ दराडे, ॲड. राहुल सोनकांबळे आदींनी पुढाकार घेतला होता