माहूरमध्ये कारवाई
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 26, 2021 04:18 IST2021-05-26T04:18:53+5:302021-05-26T04:18:53+5:30
समाधीचे पूजन उमरी : नागठाणा येथील बालतपस्वी निर्माणरुद्र पशूपती शिवाचार्य महाराज यांच्या समाधीचे पूजन सोमवारी सकाळी भाविकांच्या उपस्थितीत करण्यात ...

माहूरमध्ये कारवाई
समाधीचे पूजन
उमरी : नागठाणा येथील बालतपस्वी निर्माणरुद्र पशूपती शिवाचार्य महाराज यांच्या समाधीचे पूजन सोमवारी सकाळी भाविकांच्या उपस्थितीत करण्यात आले. २४ मे २०२० रोजी त्यांची हत्या करण्यात आली होती. त्यांच्या स्मृतिप्रीत्यर्थ गावकऱ्यांनी निर्वाणी मठात समाधी बांधली आहे. महाराजांच्या प्रतिमेचे व समाधीचे पूजन नागरिकांनी केले. अनेकांनी त्यांच्या आठवणीला उजाळा दिला.
स्वच्छता अभियानाला सुरुवात
बिलोली : बिलोली तालुक्यातील बोळेगाव येथे ग्रामपंचायतीच्या वतीने ग्रामस्वच्छता अभियान राबविण्यात आले. प्रत्येक वाॅर्डातील कचरा दर आठवड्याला गावाबाहेर काढण्याचा निर्णय घेण्यात आला. याशिवाय घनकचरा स्वच्छता अभियान दर महिन्याला राबविण्यात येणार आहे. आगामी पाच वर्षांत हा उपक्रम राबविण्यात येणार असल्याची माहिती सरपंच राधिका बोधनापोड यांनी दिली.
किनवटमध्ये दूषित पाणीपुरवठा
किनवट : पालिका पदाधिकारी आणि प्रशासनाच्या दुर्लक्षामुळे शहरातील नळांना दूषित दुर्गंधीयुक्त पाणीपुरवठा होत असल्याचा आरोप आहे. शहरात जवळपास दोन हजार नळजोडण्या आहेत. अनेकजण पाणीपट्टीही नियमित भरतात. मात्र, पालिकेकडून दूषित पाणीपुरवठा होत असल्याने लोकांनी नाराजी व्यक्त केली आहे.
देगलुरात लसीकरण
देगलूर : तालुक्यात सध्या लसीकरण सुरू आहे. तालुक्यातील ३० हजार २५५ नागरिकांचे लसीकरण पूर्ण झाले, अशी माहिती आरोग्य विभागाच्या सूत्राने दिली. तालुक्यातील ६ केंद्रांवरून २१ हजार ४८७ नागरिकांना पहिला डोस देण्यात आला.