प्रसूती झालेल्या पत्नीस गरम पाणी आणण्यास गेलेल्या पतीचे अपघाती निधन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 29, 2020 04:16 IST2020-12-29T04:16:51+5:302020-12-29T04:16:51+5:30

अर्धापूर : एक मुलगी पत्नी सर्व काही आनंदात सुरू होते. मात्र नियतीला त्यांचे हे सुख मान्य नसावे. पत्नीसाठी गरम ...

Accidental death of husband who went to fetch hot water for his pregnant wife | प्रसूती झालेल्या पत्नीस गरम पाणी आणण्यास गेलेल्या पतीचे अपघाती निधन

प्रसूती झालेल्या पत्नीस गरम पाणी आणण्यास गेलेल्या पतीचे अपघाती निधन

अर्धापूर : एक मुलगी पत्नी सर्व काही आनंदात सुरू होते. मात्र नियतीला त्यांचे हे सुख मान्य नसावे. पत्नीसाठी गरम पाणी आणण्यासाठी गेलेल्या पतीचे अपघातात निधन झाल्याने तांबे परिवारावर दुःखाचे डोंगर कोसळले. ही घटना रविवारी रात्री घडली. मयताच्या पश्चात एक दिवसाचा मुलगा व तीन वर्षाची मुलगी असून वडिलांचे छत्र हरवल्याने दोघेही आता निराधार झाले आहेत.

अर्धापूर शहरांमध्ये किरायाने राहत असलेले व भोकर फाटा परिसरात गेल्या काही दिवसापासून एका कलाकेंद्रात ढोलकी वादक म्हणून काम करत असलेला शुभम संजय तांबे (वय २२), मूळ गाव राजुरा ता.मूर्तिजापूर, जि.अकोला) येथील असून शनिवारी रात्री अज्ञात वाहनाने धडक दिल्याने गंभीर जखमी झाला. त्याचा मृतदेह रविवार २७ डिसेंबर रोजी अर्धापूर शहरातील नांदेड-नागपूर रस्त्यावरील रविराज बारच्या बाजूला उभ्या असलेल्या ट्रॅक्टर ट्रॉलीच्या बाजूला आढळून आला आहे. या प्रकरणी अज्ञाताविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

शुभम तांबे व पत्नी पूजा तांबे यांचा सुखी परिवार होता. यांना तीन वर्षाची एक मुलगी श्रावणी आहे. पत्नीला प्रसूतीसाठी अर्धापूर येथील एका दवाखान्यांमध्ये दाखल केले होते. यावेळी मुलाचा जन्म झाला. सर्व पाहुण्यांना मुलगा झाल्याची गोड बातमी सांगितली. मुलगा झाल्याने खुश असलेला शुभम रात्री पत्नीस गरम पाणी आणण्यासाठी बाहेर गेला तोच तांबे परिवारावर नियतीचा घात झाला. शुभमचा अपघातात दुर्दैवी मृत्यू झाला. वडिलांचे छत्र हरवल्याने एक दिवसाचा मुलगा व तीन वर्षाची मुलगी श्रावणी निराधार झाले.

तिघे झाले निराधार

वडिलांचे छत्र त्याने एक दिवसाचा मुलगा व तीन वर्षाची मुलगी श्रावणी यांच्या वडिलांचे छत्र हरवल्याने व पत्नी पूजा तांबे हे शुभम यांचे अपघाती निधन झाल्याने पत्नी-मुले असे तिघेजण निराधार झाले आहे.

Web Title: Accidental death of husband who went to fetch hot water for his pregnant wife