नांदेडमध्ये जिल्हा परिषद सीईओच्या दालनासमोर युवकाचा आत्महत्येचा प्रयत्न
By श्रीनिवास भोसले | Updated: January 19, 2023 13:56 IST2023-01-19T13:55:43+5:302023-01-19T13:56:07+5:30
सुदैवाने तिथे उपस्थित असणाऱ्या मंडळींनी वेळीच युवकाला आवरल्याने अनर्थ टळला.

नांदेडमध्ये जिल्हा परिषद सीईओच्या दालनासमोर युवकाचा आत्महत्येचा प्रयत्न
नांदेड: जिल्हा परिषदेच्या सीईओच्या दालनासमोर आज दुपारी एका युवकाने अंगावर पेट्रोल टाकून आत्मदहन करण्याचा प्रयत्न केल्याने खळबळ उडाली. सुदैवाने तिथे उपस्थित असणाऱ्या मंडळींनी वेळीच युवकाला आवरल्याने अनर्थ टळला.
नांदेड लगतच्या सुगाव गावातील हुसेन शेख असे या युवकाचे नाव आहे .गावातील ग्रामपंचायतीच्या सेवक पदाच्या नोकरीत अन्याय झाल्याचा आरोप करत या युवकाने आज दुपारी जिल्हा परिषद कार्यालयात धाव घेतली. येथे आल्यानंतर काही कळायच्या आत सीईओच्या दालनासमोर सोबत आणलेले पेट्रोल अंगावर टाकत आत्मदहन करण्याचा प्रयत्न केला. यामुळे एकच गोंधळ उडाला. मात्र, तेथे उपस्थित लोकांनी वेळीच त्याला रोखले. त्यानंतर पोलिसांनी तात्काळ घटनास्थळी धाव घेत त्याला ताब्यात घेतले.