'लक्की ड्रॉ' मध्ये बक्षिस लागल्याचे आमिष देऊन महिलेचे दागिने पळवले
By शिवराज बिचेवार | Updated: August 13, 2022 18:53 IST2022-08-13T18:52:55+5:302022-08-13T18:53:23+5:30
तुम्ही खरेदी केलेल्या सोन्याच्या नेकलेसवर लक्की ड्रॉ मध्ये बक्षिस लागले आहे, असे सांगून केली फसवणूक

'लक्की ड्रॉ' मध्ये बक्षिस लागल्याचे आमिष देऊन महिलेचे दागिने पळवले
नांदेड- तुम्ही खरेदी केलेल्या सोन्याच्या नेकलेसवर लक्की ड्रॉ मध्ये बक्षिस लागले आहे. असे आमिष दाखवून महिले जवळील दागिने वजन करण्यासाठी घेतलेल्या आरोपीने पोबारा केला. ही घटना १२ ऑगस्ट रोजी भोकर शहरातील बिंदू कॉलेज परिसरात घडली.
धानोरा येथील अंजली हनुमंतराव लामेंगे या १२ ऑगस्ट रोजी बिंदू महाविद्यालय समोर थांबलेल्या होत्या. यावेळी अनोळखी एक जण त्यांच्या जवळ आला. तुम्ही खरेदी केलेल्या सोन्याच्या नेकलेसवर लक्की ड्रॉ मध्ये बक्षिस लागले आहे असे त्यांना सांगितले. अंजली यांनाही विश्वास पटला. त्यानंतर वजन करण्यासाठी म्हणून त्यांच्या जवळील १ लाख ३१ हजार रुपयांचे दागिने काढून घेतले. तसेच दुचाकीवरुन पळ काढला. महिलेने आरडाओरड केली. परंतु तोपर्यंत चोरटा पसार झाला होता. या प्रकरणात भोकर पोलिस ठाण्यात गुन्हा नाेंदविण्यात आला आहे.