Nandes: महापरिनिर्वाण दिनानिमित्त धावणार विशेष रेल्वे
By ऑनलाइन लोकमत | Updated: December 3, 2023 13:06 IST2023-12-03T13:05:39+5:302023-12-03T13:06:40+5:30
Nanded News: भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या महापरिनिर्वाण दिनानिमित्त होणारी प्रवाशांची गर्दी लक्षात घेऊन नांदेड रेल्वे विभागातून मुंबई येथे जाण्यासाठी आदिलाबाद ते दादर ही विशेष रेल्वे गाडी चालविण्यात येणार आहे.

Nandes: महापरिनिर्वाण दिनानिमित्त धावणार विशेष रेल्वे
नांदेड : भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या महापरिनिर्वाण दिनानिमित्त होणारी प्रवाशांची गर्दी लक्षात घेऊन नांदेड रेल्वे विभागातून मुंबई येथे जाण्यासाठी आदिलाबाद ते दादर ही विशेष रेल्वे गाडी चालविण्यात येणार आहे.
आदिलाबाद ते दादर (०७०५८) ही गाडी आदीलाबाद येथून ५ डिसेंबर रोजी सकाळी ७ वाजता सुटणार आहे. किनवट, हिमायतनगर, भोकर, मुदखेड, नांदेड, पूर्णा, परभणी, मानवत रोड, सेलू, परतुर, जालना, छत्रपती संभाजी नगर, लासुर, रोटेगाव, नगरसोल, मनमाड, नाशिक रोड, इगतपुरी, कल्याण मार्गे ६ डिसेंबर रोजी सकाळी ३:३० वाजता दादर येथे पोहोचणार आहे. तसेच परतीच्या प्रवासामध्ये दादर ते आदीलाबाद (०७०५७) ही विशेष रेल्वे ७ डिसेंबर रोजी रात्री १:०५ वाजता दादर येथून सुटेल. परतीच्या मार्गाने ८ डिसेंबर रोजी सायंकाळी ७ वाजता आदीलाबाद येथे पोहोचणार आहे. या रेल्वेला १२ जनरल डबे, दोन एसएलआर असे एकूण १४ डबे जोडले जाणार आहेत, अशी माहिती नांदेडच्या जनसंपर्क कार्यालयाने दिली.