शहरं
Join us  
Trending Stories
1
श्रेयस अय्यरचं अर्धशतक, पंजाबकडून चेन्नईचा ५ विकेट्सनं पराभव, आयुषच्या मेहनतीवर फेरलं पाणी!
2
अफगाणिस्तानला भूकंपाचा भीषण धक्का; जम्मू-काश्मीर आणि दिल्लीतही जमीन हादरली
3
"ही वृत्ती संपुष्टात आणण्याची शिवसेनेची भूमिका"; अशोक खरातचे एकनाथ शिंदेंना फोनच्या दाव्यावर उदय सामंतांची प्रतिक्रिया
4
इराणने आमचे लढाऊ विमान पाडले, वैमानिकही बेपत्ता; अमेरिकेने दिली कबुली
5
Mumbai Indias: मुंबई इंडियन्सची ताकद वाढली, स्टार ऑलराउंडरची संघात एन्ट्री, दिल्लीविरुद्ध खेळण्याची शक्यता!
6
Ashok Kharat Case : भोंदूबाबा खरातचा 'महाप्रताप'! भक्तांच्याच नावे उघडली १०० बोगस खाती; 'समता' आणि 'जयदंबा' पतसंस्था रडारवर
7
'फोनवर संभाषण झाले म्हणून वरिष्ठ मंत्र्यांवर आरोप करणे योग्य नाही';अंजली दमानियांच्या आरोपांवर दीपक केसरकरांचे प्रत्युत्तर
8
धुळे-सोलापूर महामार्गावर प्रचंड वाहतूक कोंडी; ७ तासांपासून वाहने खोळंबली, नागरिकांचे हाल
9
ज्याची भीती तेच घडलं, युद्ध आणखी पेटलं; इराणच्या सर्वात मोठ्या ब्रिजवर हल्ला, ८ मृत्यू ९५ जखमी
10
IPL 2026: ५ षटकार, ६ चौकार, १६९.७७ चा स्ट्राईक रेट; पंजाबविरुद्ध आयुष म्हात्रेची विस्फोटक इनिंग!
11
US Israel Iran War : इराणचा यू-टर्न! आधी म्हणालं 'वैमानिक ताब्यात', आता शोधण्यासाठी बक्षीस; अमेरिकेच्या पायलटबाबत सस्पेन्स
12
IPL 2026: रोहित शर्माचा फिटनेस तर बघा, चक्क एका हातानं पकडला झेल, व्हिडीओ व्हायरल
13
India Oil Supply News: भारतासाठी 'संजीवनी' ठरला हा छोटा देश; युद्ध असो की संकट, अविरत करतोय तेल अन् गॅस पुरवठा
14
"आणखी थोडा वेळ मिळाला, तर अमेरिका सहज होर्मुझ सामुद्रधुनी...", डोनाल्ड ट्रम्प यांचे इराणची चिंता वाढवणार विधान
15
म्हाडाचं घर घ्यायचा विचार? फॉर्म किती रुपयांना, अनामत रक्कम किती भरावी लागणार?
16
US Israel Iran War : डोनाल्ड ट्रम्प यांना विरोध केल्याचे फळ! इराणने उघडला फ्रान्ससाठी होर्मुझचा रस्ता; मॅक्रॉन यांना खास 'बक्षीस'
17
IPL 2026: चेन्नईच्या संघात एक मोठा बदल; कोण इन, कोण आउट? पाहा दोन्ही संघाची प्लेईंन इलेव्हन
18
MS Dhoni: सीएसकेच्या चाहत्यांसाठी गूड न्यूज? ट्रेनिंग सेशनसाठी धोनी मैदानात, पण खेळण्याबाबत सस्पेन्स कायम
19
फक्त एका दिवसासाठी अमेरिकेतून युवक भारतात आला; ताजमहाल पाहून निघून गेला, Video व्हायरल
20
Latest Marathi News LIVE Updates: अमेरिकेला पुन्हा झटका! इराणने दुसरे एफ-३५ लढाऊ विमान पाडले
Daily Top 2Weekly Top 5

पुराच्या पाण्यात पोहण्याचे अतिधाडस अंगलट; दोन मित्र वाहून गेली, तिघे बचावली

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 3, 2024 17:14 IST

पाण्याचा अंदाज न आल्याने नदीत पोहायला गेलेले दोन मित्र वाहून गेले, तिघे बचावली

- राजेश वाघमारे

भोकर : तालुक्यातील रेणापूर येथील तुडुंब भरलेल्या सुधा नदीत पोहण्याचे अतिधाडस दोन मित्रांच्या अंगलट आले आहे. वेगाने वाहणाऱ्या पाण्याचा अंदाज न आल्याने दोन मित्र वाहून गेल्याची घटना मंगळवारी दुपारी घडली आहे. घटनेनंतर प्रशासनासह ग्रामस्थांनी शोध मोहीम सुरू केली असून अद्याप त्यांचा शोध लागला नाही. रेणापूर येथील श्रीनिवास भरत मुळेकर (१९) आणि यश संदीप भगत (२०) अशी दोघांची नावे आहेत. या घटनेत इतर तिघे बचवल्याची माहिती आहे.

श्रीनिवास आणि यश हे दोघे गावातीलच अन्य तीन मित्रांसोबत मंगळवारी दुपारी गावालगत असलेल्या सुधा नदीत पोहण्यासाठी गेले होते. यातील एक जण पोहताना पाण्याचा अंदाज न आल्याने वाहून जात असल्याचे लक्षात येताच दुसऱ्या मित्राने वाचविण्याचा प्रयत्न केला. परंतु तो सुध्दा वाहून गेला तर अन्य तिघे मित्र मात्र या संकटातून बचावले आहेत. घटनेची माहिती कळताच ग्रामस्थांनी शोध सुरू केला. घटनास्थळी तहसीलदार सुरेश घोळवे, सपोनि शैलेंद्र औटी यांच्यासह महसूल व पोलीस कर्मचारी हजर झाले असून ग्रामस्थ व प्रशासनाच्या वतीने शोध घेण्यात येत आहे.  दोन्ही तरुण शेतकरी कुटुंबातील असून श्रीनिवास मुळेकर हा बी.काॅमचे शिक्षण घेत होता. तर यश भगत याने आयटीआय चे शिक्षण पूर्ण केले होते. मागील दोन दिवसांपासून तालुक्यात संततधार सुरू असल्याने नदीनाले तुडूंब भरुन वाहत आहेत. प्रशासनाच्यावतीने सतर्कतेचा इशारा दिला असतानाही काहीजण धाडस करीत असल्याने दुर्दैवी घटना घडत आहेत. दोन तरुण वाहून गेल्याची वार्ता समजताच या घटनेनंतर रेणापूर गावावर शोककळा पसरली आहे.

टॅग्स :Nandedनांदेडdrowningपाण्यात बुडणेfloodपूर