शहरं
Join us  
Trending Stories
1
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
2
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
3
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
4
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
5
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
6
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
7
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
8
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
9
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
10
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
11
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
12
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
13
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
14
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
15
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
16
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
17
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
18
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
19
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
20
₹१.४ लाख स्टायफंड अन् नोकरी...; भारतीय विद्यार्थ्यांना जपानमध्ये संशोधनाची मोठी संधी
Daily Top 2Weekly Top 5

नांदेड जिल्ह्यात अवघा ९.३५ टक्के पाणीसाठा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 27, 2019 01:05 IST

यंदा सरासरीपेक्षा कमी पाऊस झाल्याने प्रकल्पात जेमतेम पाणीसाठा आहे. त्यातच वाढत्या तापमानामुळे साठ्यात वेगाने घट होत आहे.

नांदेड : यंदा सरासरीपेक्षा कमी पाऊस झाल्याने प्रकल्पात जेमतेम पाणीसाठा आहे. त्यातच वाढत्या तापमानामुळे साठ्यात वेगाने घट होत आहे. सद्य:स्थितीत जिल्ह्यातील मोठे, मध्यम आणि लघु अशा १०६ प्रकल्पांत मिळून केवळ ९.३५ टक्के उपयुक्त पाणीसाठा शिल्लक असल्याने नागरिकांना पाण्याचा वापर जपून करावा लागणार आहे.नांदेड जिल्ह्यात १०६ प्रकल्प आहेत. यात मानार आणि विष्णूपुरी या प्रकल्पांकडे मोेठे प्रकल्प म्हणून पाहिले जाते. मानार प्रकल्पाची पूर्ण जलक्षमता १४६.९२ दलघमी इतकी आहे. सद्य:स्थितीत या प्रकल्पात २१.८७ दलघमी म्हणजेच १५.८२ टक्के पाणी उपलब्ध आहे. विष्णूपुरी प्रकल्पाची पूर्ण जलक्षमता ८३.५५ दलघमी आहे. या प्रकल्पात सध्या केवळ ८.८३ दलघमी उपयुक्त पाणीसाठा असून या पाण्याची टक्केवारी १०.९३ इतकी आहे. जिल्ह्यात ९ मध्यम प्रकल्प आहेत. या प्रकल्पांची पूर्ण जलक्षमता १७९.९८ दलघमी आहे. सद्य:स्थितीत या प्रकल्पांत ८.७३ दलघमी उपयुक्त पाणीसाठा असून उपयुक्त पाण्याची टक्केवारी ६.२८ इतकी आहे. तर जिल्ह्यातील ३ उच्च पातळी बंधाऱ्यांची पूर्ण जलक्षमता १२१.७० दलघमी आहे. सद्य:स्थितीत या तीन बंधाऱ्यांत ७.६३ दलघमी उपयुक्त पाणी असून उपयुक्त पाण्याची टक्केवारी ६.३९ इतकी आहे. जिल्ह्यात ८८ लघु प्रकल्प आहेत. या प्रकल्पांची पूर्ण जलक्षमता २१६.४५ दलघमी इतकी आहे. सद्य:स्थितीत या ८८ प्रकल्पात केवळ १६.०८ दलघमी उपयुक्त पाणीसाठा असून ही टक्केवारी ८.४१ एवढी आहे. तर जिल्ह्यातील कोल्हापुरी पद्धतीच्या चारही बंधा-यात सध्या ठणठणाट आहे.

टॅग्स :NandedनांदेडWaterपाणीwater shortageपाणीटंचाईvishnupuri damविष्णुपुरी धरणDamधरण