शहरं
Join us  
Trending Stories
1
"ही वृत्ती संपुष्टात आणण्याची शिवसेनेची भूमिका"; अशोक खरातचे एकनाथ शिंदेंना फोनच्या दाव्यावर उदय सामंतांची प्रतिक्रिया
2
Ashok Kharat Case : भोंदूबाबा खरातचा 'महाप्रताप'! भक्तांच्याच नावे उघडली १०० बोगस खाती; 'समता' आणि 'जयदंबा' पतसंस्था रडारवर
3
'फोनवर संभाषण झाले म्हणून वरिष्ठ मंत्र्यांवर आरोप करणे योग्य नाही';अंजली दमानियांच्या आरोपांवर दीपक केसरकरांचे प्रत्युत्तर
4
श्रेयस अय्यरचं अर्धशतक, पंजाबकडून चेन्नईचा ५ विकेट्सनं पराभव, आयुषच्या मेहनतीवर फेरलं पाणी!
5
धुळे-सोलापूर महामार्गावर प्रचंड वाहतूक कोंडी; ७ तासांपासून वाहने खोळंबली, नागरिकांचे हाल
6
ज्याची भीती तेच घडलं, युद्ध आणखी पेटलं; इराणच्या सर्वात मोठ्या ब्रिजवर हल्ला, ८ मृत्यू ९५ जखमी
7
IPL 2026: ५ षटकार, ६ चौकार, १६९.७७ चा स्ट्राईक रेट; पंजाबविरुद्ध आयुष म्हात्रेची विस्फोटक इनिंग!
8
US Israel Iran War : इराणचा यू-टर्न! आधी म्हणालं 'वैमानिक ताब्यात', आता शोधण्यासाठी बक्षीस; अमेरिकेच्या पायलटबाबत सस्पेन्स
9
IPL 2026: रोहित शर्माचा फिटनेस तर बघा, चक्क एका हातानं पकडला झेल, व्हिडीओ व्हायरल
10
India Oil Supply News: भारतासाठी 'संजीवनी' ठरला हा छोटा देश; युद्ध असो की संकट, अविरत करतोय तेल अन् गॅस पुरवठा
11
"आणखी थोडा वेळ मिळाला, तर अमेरिका सहज होर्मुझ सामुद्रधुनी...", डोनाल्ड ट्रम्प यांचे इराणची चिंता वाढवणार विधान
12
म्हाडाचं घर घ्यायचा विचार? फॉर्म किती रुपयांना, अनामत रक्कम किती भरावी लागणार?
13
US Israel Iran War : डोनाल्ड ट्रम्प यांना विरोध केल्याचे फळ! इराणने उघडला फ्रान्ससाठी होर्मुझचा रस्ता; मॅक्रॉन यांना खास 'बक्षीस'
14
IPL 2026: चेन्नईच्या संघात एक मोठा बदल; कोण इन, कोण आउट? पाहा दोन्ही संघाची प्लेईंन इलेव्हन
15
MS Dhoni: सीएसकेच्या चाहत्यांसाठी गूड न्यूज? ट्रेनिंग सेशनसाठी धोनी मैदानात, पण खेळण्याबाबत सस्पेन्स कायम
16
फक्त एका दिवसासाठी अमेरिकेतून युवक भारतात आला; ताजमहाल पाहून निघून गेला, Video व्हायरल
17
Latest Marathi News LIVE Updates: अमेरिकेला पुन्हा झटका! इराणने दुसरे एफ-३५ लढाऊ विमान पाडले
18
जीवाशी खेळ! एक्स्पायरी डेट बदलून विकत होते कोल्ड ड्रिंक्स, बिस्किट; मोठ्या रॅकेटचा पर्दाफाश
19
Bhagwant Mann : "समोसा-पिझ्झाचा मुद्दा..."; राघव चड्ढांवर पंजाबचे मुख्यमंत्री भगवंत मान कडाडले, आतिशींचा गंभीर आरोप
20
'सिंधू' करार स्थगितीनंतर पाकिस्तानला आणखी एक धक्का! पुन्हा सुरू होतोय 'मोहरा प्रकल्प', जाणून घ्या
Daily Top 2Weekly Top 5

८ महिन्यांच्या गर्भवती पत्नीसह चिमुकलीची हत्या; मुलगी नको म्हणून प्रकार घडल्याचा संशय

By प्रसाद आर्वीकर | Updated: September 13, 2023 15:47 IST

आरोपी पती भारतीय सैन्य दलात सेवेत असून तो स्वतःहून पोलीस ठाण्यात गेला

- मारोती चिलपिपरेकंधार : आठ महिन्याच्या गरोदर पत्नीसह ३ वर्षांच्या मुलीची पतीनेच गळा आवळून हत्या केल्याची संतापजनक घटना कंधार तालुक्यातील बोरी खु येथे १३ ऑगस्ट रोजी पहाटे घडली आहे. या घटनेने संपूर्ण जिल्हा हादरुन गेला आहे. माहेरहून पैसे घेऊन ये आणि तुला मुलीच होतात, या कारणावरुन या हत्या केल्याचा आरोप नातेवाईकांनी केला आहे. विशेष म्हणजे हत्येनंतर आरोपीने स्वत: माळाकोळी पोलिस ठाण्यात जाऊन घटनेची माहिती दिली. आरोपी भारतीय सैन्य दलात सेवेत आहे.

एकनाथ जायभाये असे आरोपीचे नाव असून, भाग्यश्री जायभाये आणि सरस्वती जायभाये असे हत्या झालेल्या मयत पत्नी आणि मुलीचे नाव आहे. १३ सप्टेंबर रोजी पहाटे आरोपी एकनाथ जायभाये याने त्याची पत्नी भाग्यश्री आणि मुलगी सरस्वती या दोघांचा गळा आवळून खून केला आणि तो घरातून निघून गेला. विशेष म्हणजे, हत्या केल्यानंतर त्याने भाग्यश्री हिच्या माहेरी मुलीची हत्या केल्याची माहिती त्याने स्वत:च दिली. त्यानंतर आरोपी एकनाथ जायभाये थेट माळाकोळी पोलिस ठाण्यात दाखल झाला आणि पोलिसांनाही घटनेची माहिती दिली. पोलिसांनी घटनास्थळी जाऊन पंचनामा केला.

या प्रकरणी दैवशाला व्यंकटी केंद्रे यांनी माळाकोळी पोलिस ठाण्यात जाऊन तक्रार दिली आहे. त्यांच्या तक्रारीनुसार तुला मुलगीच कशी झाली, आम्हाला मुलगा पाहिजे होता, असे म्हणून सासरी छळ होत होता. घर बांधकामासाठी माहेरहून ४ लाख रुपयांची मागणीही करण्यात आली होती. त्यावर माहेरच्या मंडळींनी भाग्यश्री हिच्या सासरी जाऊन समजून काढली. परंतु, तिचा छळ कमी झाला नाही. भाग्यश्री ही दुसऱ्यांदा गरोदर झाल्यानंतर ३ महिन्यांपासून पती एकनाथ, सासरा मारोती, सासू अनुसया जायभाये व दीर दयानंद हे तुला दुसरी पण मुलगीच आहे. तु चेक करण्यास दवाखाण्यात चल, असे तगादा लावत होते. मात्र भाग्यश्री  तपासणी करण्यास तयार नव्हती. तेव्हापासून अधिकच  छळ केला जात होता. 

त्यातच १३ सप्टेंबर रोजी भाग्यश्री एकनाथ जायभाये व सरस्वती एकनाथ जायभाये यांचा गळा दाबून खून केला.  दुसरी मुलगी नको, तू डॉक्टरकडे चेकअप कर व माहेरहून ४ लाख रुपये घेऊन ये म्हणून हा खून केल्याची तक्रार भाग्यश्री जायभाये यांची आई दैवशाला व्यंकटी केंद्रे यांनी माळाकोळी पोलिस ठाण्यात दिली आहे.त्यावरुन आरोपी पती एकनाथ मारोती जायभाये याच्यासह सासरे मारोती रामकिशन जायभाये, सासू अनुसया मारोती जायभाये, दीर दयानंद मारोती जायभाये  यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल झाला आहे.

टॅग्स :Crime Newsगुन्हेगारीNandedनांदेड