नांदेड जिल्ह्यात पाच दिवसांत ७० हजार हेक्टर क्षेत्र बाधित

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 25, 2021 04:16 IST2021-07-25T04:16:53+5:302021-07-25T04:16:53+5:30

दुसरीकडे उमरी तालुक्यातील शेलगाव येथील नामदेव नागा झुंजार (वय ४९) हे २३ जुलै रोजी दुपारी ३.३० वाजता कुदळा येथील ...

70,000 hectares affected in Nanded district in five days | नांदेड जिल्ह्यात पाच दिवसांत ७० हजार हेक्टर क्षेत्र बाधित

नांदेड जिल्ह्यात पाच दिवसांत ७० हजार हेक्टर क्षेत्र बाधित

दुसरीकडे उमरी तालुक्यातील शेलगाव येथील नामदेव नागा झुंजार (वय ४९) हे २३ जुलै रोजी दुपारी ३.३० वाजता कुदळा येथील तलावामध्ये मासेमारीसाठी गेेले होते. ते अद्याप बेपत्ता आहेत. त्यांचा शोध घेतला जात असल्याची माहिती उमरी तहसीलदारांनी कळवली आहे. मुसळधार पावसाने जिल्ह्यात एक लहान, पाच मोठी जनावरे दगावली आहेत. जिल्ह्यात पावसाने ८१ घरांची पडझडही झाली आहे. बिलोली तालुक्यात २५ घरे पडली आहेत. देगलूर तालुक्यात २३, किनवट ५, हिमायतनगर ९, लोहा ३. धर्माबाद ३. भोकर १, नायगाव ३. अर्धापूर १ आणि मुखेड तालुक्यात ८ घरांची पडझड झाली आहे.

चौकट

सर्वाधिक फटका धर्माबाद तालुक्याला

पाच दिवस झालेल्या मुसळधार पावसाचा धर्माबाद तालुक्याला सर्वाधिक मोठा फटका बसला आहे. येथे ४५ टक्के खरिपाचे पीक पावसाने बाधित झाले आहे. ३ हजार ९७८ शेतकऱ्यांना नुकसानीचा फटका सहन करावा लागला आहे. देगलूर तालुक्यात ८० गावांतील ४० टक्के पिके पावसाने वाया गेली आहेत. येथे १६ हजार ४८९ शेतकऱ्यांचे नुकसान झाले आहे. किनवट तालुक्यात ३३. हिमायतनगर ३३. लोहा ३३. भोकर ३५, बिलोली ३३. हदगाव ३. आणि नायगाव तालुक्यात ३. टक्के पिकांचे नुकसान झाले आहे. जिल्ह्यातील ५६३ गावांतील ९२ हजार ३५३ शेतकऱ्यांना अतिवृष्टीचा फटका बसला आहे.

Web Title: 70,000 hectares affected in Nanded district in five days

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.