शहरं
Join us  
Trending Stories
1
श्रेयस अय्यरचं अर्धशतक, पंजाबकडून चेन्नईचा ५ विकेट्सनं पराभव, आयुषच्या मेहनतीवर फेरलं पाणी!
2
अफगाणिस्तानला भूकंपाचा भीषण धक्का; जम्मू-काश्मीर आणि दिल्लीतही जमीन हादरली
3
"ही वृत्ती संपुष्टात आणण्याची शिवसेनेची भूमिका"; अशोक खरातचे एकनाथ शिंदेंना फोनच्या दाव्यावर उदय सामंतांची प्रतिक्रिया
4
इराणने आमचे लढाऊ विमान पाडले, वैमानिकही बेपत्ता; अमेरिकेने दिली कबुली
5
Mumbai Indias: मुंबई इंडियन्सची ताकद वाढली, स्टार ऑलराउंडरची संघात एन्ट्री, दिल्लीविरुद्ध खेळण्याची शक्यता!
6
Ashok Kharat Case : भोंदूबाबा खरातचा 'महाप्रताप'! भक्तांच्याच नावे उघडली १०० बोगस खाती; 'समता' आणि 'जयदंबा' पतसंस्था रडारवर
7
'फोनवर संभाषण झाले म्हणून वरिष्ठ मंत्र्यांवर आरोप करणे योग्य नाही';अंजली दमानियांच्या आरोपांवर दीपक केसरकरांचे प्रत्युत्तर
8
धुळे-सोलापूर महामार्गावर प्रचंड वाहतूक कोंडी; ७ तासांपासून वाहने खोळंबली, नागरिकांचे हाल
9
ज्याची भीती तेच घडलं, युद्ध आणखी पेटलं; इराणच्या सर्वात मोठ्या ब्रिजवर हल्ला, ८ मृत्यू ९५ जखमी
10
IPL 2026: ५ षटकार, ६ चौकार, १६९.७७ चा स्ट्राईक रेट; पंजाबविरुद्ध आयुष म्हात्रेची विस्फोटक इनिंग!
11
US Israel Iran War : इराणचा यू-टर्न! आधी म्हणालं 'वैमानिक ताब्यात', आता शोधण्यासाठी बक्षीस; अमेरिकेच्या पायलटबाबत सस्पेन्स
12
IPL 2026: रोहित शर्माचा फिटनेस तर बघा, चक्क एका हातानं पकडला झेल, व्हिडीओ व्हायरल
13
India Oil Supply News: भारतासाठी 'संजीवनी' ठरला हा छोटा देश; युद्ध असो की संकट, अविरत करतोय तेल अन् गॅस पुरवठा
14
"आणखी थोडा वेळ मिळाला, तर अमेरिका सहज होर्मुझ सामुद्रधुनी...", डोनाल्ड ट्रम्प यांचे इराणची चिंता वाढवणार विधान
15
म्हाडाचं घर घ्यायचा विचार? फॉर्म किती रुपयांना, अनामत रक्कम किती भरावी लागणार?
16
US Israel Iran War : डोनाल्ड ट्रम्प यांना विरोध केल्याचे फळ! इराणने उघडला फ्रान्ससाठी होर्मुझचा रस्ता; मॅक्रॉन यांना खास 'बक्षीस'
17
IPL 2026: चेन्नईच्या संघात एक मोठा बदल; कोण इन, कोण आउट? पाहा दोन्ही संघाची प्लेईंन इलेव्हन
18
MS Dhoni: सीएसकेच्या चाहत्यांसाठी गूड न्यूज? ट्रेनिंग सेशनसाठी धोनी मैदानात, पण खेळण्याबाबत सस्पेन्स कायम
19
फक्त एका दिवसासाठी अमेरिकेतून युवक भारतात आला; ताजमहाल पाहून निघून गेला, Video व्हायरल
20
Latest Marathi News LIVE Updates: अमेरिकेला पुन्हा झटका! इराणने दुसरे एफ-३५ लढाऊ विमान पाडले
Daily Top 2Weekly Top 5

नांदेडमध्ये ४९१ उमेदवार, खर्च मर्यादा ९ लाख; ४४ कोटींच्या 'दौलतजादा'चा अंदाज !

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 13, 2026 19:14 IST

शासकीय नियमास बांधील राहून उमेदवारांनी बांधला निवडणूक खर्चाचा ताळेबंद

नांदेड : नांदेड महानगरपालिका निवडणुकीचा बिगुल वाजल्यानंतर आता खऱ्या अर्थाने पैशांचा खेळ सुरू झाला आहे. यंदाच्या निवडणुकीत तब्बल ४९१ उमेदवार आपले नशीब आजमावत असून, त्यांच्या खर्चावर राज्य निवडणूक आयोगाचे बारीक लक्ष आहे. नांदेड महानगरपालिकेचा समावेश 'ड' वर्गात होत असल्याने, आयोगाने प्रत्येक उमेदवारासाठी ९ लाख रुपयांपर्यंत खर्चाची अधिकृत मर्यादा निश्चित केली आहे.

गणिताचा विचार केला, तर एका उमेदवाराने सरासरी ९ लाख रुपये खर्च केले तरी एकूण ४९१ उमेदवारांचा खर्च तब्बल ४४ कोटी १९ लाख रुपयांच्या घरात जातो. जर काहींनी छुप्या मार्गानेखर्च वाढवला, तर हा आकडा ५० या अवाढव्य खर्चामुळे निवडणुकीत कोटींच्याही पुढे जाण्याची शक्यता आहे. मोठी आर्थिक उलाढाल होणार असून, प्रचार साहित्य, रॅली, जाहिराती आणि कार्यकर्त्यांच्या चंगळीवर कोटींची 'दौलतजादा' होणार असल्याचे स्पष्ट चित्र आहे. वाढत्या उमेदवार संख्येमुळे यंदा नांदेडची निवडणूक राज्याच्या इतिहासातील सर्वात महागड्या निवडणुकांपैकी एक ठरू शकते.

मर्यादेत खर्चुनही ४४ कोटींची 'दौलतजादा' होणारजर सर्व ४९१ उमेदवारांनी आयोगाच्या ९ लाखांच्या मर्यादेपर्यंत खर्च केला, तर एकूण खर्च ४४ कोटी १९ लाख रुपयांच्या घरात जातो. हा आकडा शहराच्या अर्थव्यवस्थेत निवडणुकीच्या काळात होणाऱ्या मोठ्या उलाढालीचा पुरावा आहे.

महापालिकेसाठी ४९१ उमेदवार रिंगणातनांदेड महानगरपालिकेच्या निवडणुकीत विविध राजकीय पक्ष आणि अपक्ष मिळून एकूण ४९१ उमेदवार आपले नशीब आजमावत आहेत. उमेदवारांची ही मोठी संख्या पाहता यंदाची निवडणूक अत्यंत चुरशीची आणि खर्चिक होणार असल्याचे स्पष्ट आहे.

दिवसांच्या आत ३० हिशेब द्यावा लागणारनिकाल जाहीर झाल्यापासून ३० दिवसांच्या आत प्रत्येक उमेदवाराला आपल्या संपूर्ण निवडणूक खर्चाचा अंतिम हिशेब आणि प्रतिज्ञापत्र निवडणूक विभागाकडे सादर करावे लागते. हिशेब सादर न करणाऱ्या उमेदवाराला भविष्यात निवडणूक लढवण्यास अपात्र ठरवले जाऊ शकते.

टॅग्स :Municipal Electionमहानगरपालिका निवडणूक २०२६Nanded-Waghala Municipal Corporationनांदेड - वाघाळा महानगरपालिका