शहरं
Join us  
Trending Stories
1
उद्धव ठाकरे कफनचोर, तुम्ही प्रतिसाद देणार का? देवेंद्र फडणवीसांचा मतदारांना सवाल
2
Controversy : Sanju Samson अम्पायरच्या निर्णयावर नाखूश दिसला, दिल्लीचा मालक out आहे, out आहे! ओरडला
3
वापरा आणि फेकून द्या ही भाजपची वृत्ती; त्यांच्या रेल्वेच्या डब्याला भ्रष्टाचाराची चाके- उद्धव ठाकरे
4
धक्कादायक! पुण्यातील वारजे माळवाडीच्या रामनगरमध्ये हवेत गोळीबार; दुचाकीवर आले होते तीन जण
5
सचिन तेंडुलकरच्या शेजाऱ्यांचे एक ट्विट अन् मग झालं असं काही...; वाचा मुंबईतील घराबद्दलचा किस्सा
6
पत्नीने थंड भाजी दिल्याने पतीने घेतला टोकाचा निर्णय, बिट मार्शल्समुळे वाचला जीव
7
Sanju Samson च्या वादग्रस्त विकेटने मॅच फिरली; DCने बाजी मारून प्ले ऑफची आस कायम राखली
8
Israel Hamas War: आता इस्रायलचा विजय झाल्याशिवाय हे हल्ले थांबणार नाहीत; पंतप्रधान Benjamin Netanyahu यांचे मोठे विधान
9
हृदयद्रावक! जळगावमध्ये भरधाव कारने दुचाकीला दिली धडक; आईसह दोन मुले ठार
10
'हमास'च्या समर्थनार्थ पोस्टला लाईक केल्याबद्दल सोमय्या स्कूल व्यवस्थापनाकडून प्राचार्यांचे निलंबन
11
"ज्या-ज्या ठिकाणी चोरलेला धनुष्यबाण आहे, तिथे 'मशाल' जिंकणार"; संजय राऊतांना विश्वास
12
मोठी बातमी: बारामती मतदारसंघातील PDCC बँकेच्या शाखा व्यवस्थापकाविरुद्ध आचारसंहिता भंगाचा गुन्हा
13
IPL मध्ये असा गोष्टी घडत असतात...! दिल्लीकडून पराभवानंतर संजू सॅमसनचं विधान चर्चेत 
14
"...ही देशातील प्रत्येक दलित, मागास, आदिवासीसाठी धोक्याची घंटा; I.N.D.I.A.च्या इराद्यापासून सावध राहा" - PM मोदी
15
"त्या लोकांना केवळ मला उद्ध्वस्त करण्यासाठी कामं नेमून दिली होती"; देवेंद्र फडणवीसांचा खळबळजनक दावा
16
Apple चे नवीन iPad Air अन् iPad Pro लॉन्च; जाणून घ्या किंमत अन् फीचर्स...
17
जॅक फ्रेझर-मॅकगर्क, अभिषेक पोरेल, त्रिस्तान स्तब्स यांची आतषबाजी, DC चे राजस्थानसमोर दोनशेपार लक्ष्य
18
"महाराष्ट्र काँग्रेसचे लोक 26/11च्या मुंबई हल्ल्यातील दहशतवाद्यांना क्लिन चिट देत आहेत..."; मोदींचा हल्लाबोल
19
"इंडी आघाडीचा एकच अजेंडा, ...तर ते 'मिशन कॅन्सल' चालवणार"! पंतप्रधान मोदींचा जोरदार हल्ला 
20
'नॉट रिचेबल' किरण सामंत अखेर 'रिचेबल', 15 मिनिटे बाकी असताना बजावला मतदानाचा हक्क!

४७ हजार जणांना पहिल्या टप्प्यात मिळेल कोरोना लस

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 15, 2020 7:01 PM

corona vaccine news लस उपलब्ध झाल्यानंतर तिचे वितरण तसेच साठवणूक करण्यासाठीची यंत्रणा कितपत आहे याचा आढावा आता आरोग्य विभागातर्फे घेतला जात आहे.

ठळक मुद्देहायरिस्क असलेले जिल्ह्यात ४३ हजार रुग्ण२६ लाख ९७ हजार ५३४ लोकसंख्येचे सर्वेक्षण

- विशाल सोनटक्के

नांदेड : कोरोना लस उपलब्ध झाल्यानंतर ती सर्वात अगोदर आरोग्य कर्मचारी आणि फ्रंटलाईन वर्कर्सना देण्यात येणार असून त्यानंतर गंभीर आजारी रुग्णांना ती देण्याचा प्रयत्न राहील, असे केंद्रीय आरोग्यमंत्र्यांनी स्पष्ट केले आहे. या पार्श्वभूमीवर जिल्ह्यातील ४ हजार आरोग्य कर्मचारी आणि ४३ हजार हायरिस्क असलेल्या रुग्णांना पहिल्या आणि दुसर्या टप्प्यातच ही लस मिळू शकते. 

भारतात सध्या ३ कोविड लसींची चाचणी प्रक्रिया विविध टप्प्यांत सुरू आहे.  लस उपलब्ध झाल्यानंतर तिचे वितरण तसेच साठवणूक करण्यासाठीची यंत्रणा कितपत आहे याचा आढावा आता आरोग्य विभागातर्फे घेतला जात आहे. दुसरीकडे उपलब्ध झालेली लस पहिल्या टप्प्यात कोणाला मिळणार याबाबत उत्सुकता असतानाच केंद्रीय आरोग्यमंत्र्यांनी ही लस सर्वात अगोदर आरोग्य कर्मचारी आणि फ्रंटलाईन वर्कर्सना मिळेल. त्यानंतर ती वयोवृद्ध आणि गंभीर आजाराशी लढणा-या रुग्णांना देण्यात येईल, असे सांगत त्यानंतर लसीच्या उपलब्धतेनुसार ती सर्वांना देण्याचे प्रयत्न राहतील, असे स्पष्ट केले आहे. 

याच पद्धतीने लस देण्याचे नियोजन ठरल्यास नांदेड जिल्ह्यातील जिल्हा रुग्णालय, जिल्हा परिषद आरोग्य विभाग, वैद्यकीय महाविद्यालय आदी ठिकाणी कार्यरत असलेल्या सुमारे ४ हजारांवर आरोग्य कर्मचारी आणि ‘माझे कुटुंब माझी जबाबदारी’ या सर्वेक्षणात जिल्हाभरात आढळलेले कॅन्सर, किडनी, मधुमेह, हृदयविकार, यकृत आदी जंतूविरहित व्याधी असलेल्या ४३ हजार १६१ रुग्णांना प्राधान्याने ही लस उपलब्ध होऊ शकते. 

पहिल्या फेरीत ३६९ कोरोनाबाधित निष्पन्नया अभियानांतर्गत प्रत्येकी तीन जणांच्या एकूण ६५२ टीमने म्हणजेच सुमारे २ हजार जणांनी ४ लाख ८८ हजार ८७३ जणांच्या घरी जावून आरोग्यविषयक माहिती घेतली. यामध्ये २ हजार ४५७ जण सर्दी, ताप तसेच इतर लक्षणे असलेले आढळू आले तर ५५६ जणांची ऑक्सिजन पातळी ९५ पेक्षा कमी दिसली. लक्षणे आढळलेल्यांची तपासणी केली असता ३६९ नागरिक कोविडबाधित निष्पन्न झाले. त्यांना उपचारासाठी संदर्भित करण्यात आले. 

२६ लाख ९७ हजार ५३४ लोकसंख्येचे सर्वेक्षणजिल्ह्यात ‘माझे कुटुंब, माझी जबाबदारी’ या  अभियानाच्या दुस-या टप्प्याला जिल्हाभरात प्रारंभ झाला. पहिल्या टप्प्यात ४ लाख ८९ हजार ४७९ कुटुंबांपैकी ४ लाख ८८ हजार ८७३ कुटुंबांपर्यंत आरोग्य कर्मचारी तसेच स्वयंसेवकांची टीम पोहोचली. या टीमने २६ लाख ९७ हजार ५३४ लोकसंख्येचे सर्वेक्षण केले. यामध्ये विविध गंभीर आजाराने त्रस्त असलेले ४३ हजार १६१ नागरिक जिल्हाभरात आढळले आहेत. - शिवशक्ती पवार, सहायक जिल्हा आरोग्य अधिकारी

टॅग्स :corona virusकोरोना वायरस बातम्याCoronavirus in Maharashtraमहाराष्ट्रात कोरोना व्हायरसNandedनांदेड