नांदेडमार्गे हैद्राबादेत जाणारे ४६० किलो चंदन जप्त

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 22, 2019 01:44 PM2019-01-22T13:44:15+5:302019-01-22T13:52:58+5:30

या प्रकरणात तिघांविरुद्ध गुन्हे नोंदविण्यात आले आहेत.

460 kg sandalwood seized in Nanded | नांदेडमार्गे हैद्राबादेत जाणारे ४६० किलो चंदन जप्त

नांदेडमार्गे हैद्राबादेत जाणारे ४६० किलो चंदन जप्त

googlenewsNext
ठळक मुद्देस्थानिक गुन्हे शाखेची कामगिरी पंधरा लाखांचा माल जप्त

नांदेड : वसमत तालुक्यातील पांगरा येथून पीकअप वाहनाच्या खालच्या बाजूने कप्पा करुन त्यातून होणारी चंदनाची तस्करी स्थानिक गुन्हे शाखेने रोखली़ चंदासिंग कॉर्नरपासून सिनेस्टाईल या वाहनाचा पाठलाग करीत पोलिसांनी ९ लाख ३० हजार रुपये किमतीचे ४६० किलो चंदन जप्त केले आहे़ या प्रकरणात तिघांविरुद्ध गुन्हे नोंदविण्यात आले आहेत़ अशी माहिती पोलिस अधीक्षक संजय जाधव यांनी दिली़

हिंगोली जिल्ह्यातील पांगरा येथून चंदनाची तस्करी करण्यात येत असल्याची माहिती खबऱ्याकडून पोलिसांना मिळाली होती़ त्यानंतर स्थानिक गुन्हे शाखेचे दोन पथके नियुक्त करण्यात आले होते़ यातील एक पथक भोकर फाटा आणि दुसरे चंदासिंग कॉर्नर येथे थांबले होते़ पांगरा येथून निघालेला महिंद्र पीक अप के़ए़-१८, ८५०१ हा मालेगांव मार्गे नांदेड शहरात आला़ त्यानंतर नांदेड शहरातून तो चंदासिंग कॉर्नर मार्गे हैद्राबादकडे जात असल्याची कुणकुण स्थागुशाच्या पथकाला लागली़ मंगळवारी पहाटे पाच वाजेच्या सुमारास पथकाने मारतळ्यापर्यंत या महिंद्रा पीक अप वाहनाचा पाठलाग करुन त्यांना पकडले़ पोलिसांनी पीक अप वाहनाची तपासणी केली असता, खालच्या बाजूने कप्पा करुन त्यामध्ये चंदन असल्याचे आढळून आले.

पोलिसांनी वाहनातील ४६० किलो चंदन जप्त केले़ तर कुरुंदा येथील शेख अली शेख खॉजा व चालक मोहम्मद खुनी मोहम्मद सोफी या दोघांना अटक केली आहे़ याप्रकरणात एकुण तिघांविरुद्ध गुन्हा नोंदविण्यात आला आहे़ हे आरोपी आंतरराज्ीय असून इतर आरोपींच्या शोधासाठी पथकाची स्थापना करण्यात आली आहे़ पोनि़सुनिल निकाळजे यांच्या मार्गदर्शनाखाली पथकातील पोउपनि कल्याण नेहरकर, शहादेव खेडकर, दशरथ जांभळीकर, सुनिल गटलेवार, पोतदार, गजानन बयनवाड, मंगेश जोंधळे, शैलेश बुडगुलवाड, बजरंग बोडके, व्यंकट गंगुलवार, श्रीरामे यांनी ही कारवाई केली़ 

Web Title: 460 kg sandalwood seized in Nanded

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.