नांदेडमध्ये साखरपुड्याच्या जेवणातून ४५ जणांना विषबाधा
By ऑनलाइन लोकमत | Updated: November 26, 2018 21:25 IST2018-11-26T21:16:36+5:302018-11-26T21:25:01+5:30
विषबाधा झालेल्यांवर उपचार सुरू

नांदेडमध्ये साखरपुड्याच्या जेवणातून ४५ जणांना विषबाधा
किनवट, नांदेड : साखरपुड्याच्या जेवणाच्या भाजीत पाल पडल्याने अन्नातून ४५ जणांना विषबाधा झाली. ही घटना आज दुपारी ४ वाजता सावरगाव तांडा येथे घडली. विषबाधा झालेल्या सर्वांवर जलधरा प्राथमिक आरोग्य केंद्र येथे उपचार करण्यात आले.
जवारसिंग मेरसिंग पडवळे यांच्या मुलाच्या साखरपुड्याचा कार्यक्रम आज संध्याकाळी आयोजित करण्यात आला होता. या कार्यक्रमासाठी तयार करण्यात आलेल्या जेवणाच्या भाजीत पाल पडली होती. या भाजीमुळे पहिल्याच पंगतीत जेवणाऱ्यांना विषबाधा झाली. सर्वांना उलट्याचा त्रास झाला. तालुका आरोग्य अधिकारी डॉ. संजय मुरमुरे यांनी इस्लापूर येथील डॉक्टरांना जलधरा येथे जाण्याच्या सूचना दिल्या. या सर्व रुग्णांवर डॉ. के. के. गायकवाड, डॉ. प्रदीप शिंदे, डॉ. डी. एस. गायकवाड, डॉ. प्रवीण बोडेवार यांनी उपचार केले.
घटनेची माहिती मिळताच उपविभागीय पोलीस अधिकारी सदाशिव चौधरी, इस्लापूरचे सहाय्यक पोलीस निरीक्षक रामेश्वर कायेंदे यांनी भेट देऊन परिस्थितीची माहिती घेतली. विषबाधा झालेल्यांना रुग्णालयात पोहोचवण्यास सामाजिक कार्यकर्ते संतोष पेळे, सवाईराम राठोड, मांगीलाल आडे, गणेश राठोड यांनी सहकार्य केले. आ. प्रदीप नाईक यांनी विषबाधा झालेल्यांची चौकशी करण्याच्या सूचना दिल्या. यानंतर कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती अनिल कऱ्हाळे पाटील यांनी जलधरा येथे भेट दिली.
विषबाधा झालेल्या रुग्णांची नावे- गोबल गोरसिंग पेठोड (वय ६०), फलुसिंग गोरसिंग पेठोड (वय ६०), उत्तम तगरे, गौतम पोळे (वय २१), बसीम अहमद (३०), मंगलसिंग पेळे (६०), दत्ता चौफळे (६०), प्रदीप तगरे (१०), बालगिव चौफाडे (५०), मलैश चौफाडे (६), गोविंदसिंग साबळे (४०), देविसिंग पेळे (६०), नारायण सांबळे (६०), रबत बालसिंग (३५), हरासिंग चौफाडे (६०), पी. भागवन सिंग (२२), मायचंद पडवळे (६०), प्रतापसिंग सांबळे (६०), लालाराम पेळे (६०), चंद्रसिंग पडवाळे (६०), सखाराम एस़ (३२), भागसिंग चौफाडे (६०), तुकाराम खसवत (६०), गणपत चौफाडे (६०), निरज खसवत (२७), न्यायसिंग पंढारे (५५), बी. एम. साबळे (५२), विष्णू साबळे (६५), माधवसिंग पोळे (३८), अमरसिंग पोळे (५०), जवासिंग पडवोळे (५५), रोहिदास पोळे (४०), हरिदास बस्सी (४०), दौलतराम बस्सी (३२), दजनसिंग खसवत (४५), सीताराम साबळे (३५), नानक चौफाडे (५३), नियालसिंग पोळे (६०), जवारसिंग चौफाडे (४७), अनिता पडवळे (१६), रघुनाथ पडवळे (७७), दशरथ चौफाडे (३५), कमलबाई चौफाडे (३८), देवसिंग चौफाडे (४०)