शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ खुली करण्याची शेवटची आशा संपली! UNSC मध्ये झाले मतदान, पण चीन-रशियाचे 'व्हिटो'अस्त्र
2
राजस्थानचा 'रॉयल' विजय! यशस्वी, वैभवने गोलंदाजांना धुतले, मुंबई इंडियन्सचा २७ धावांनी पराभव
3
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
4
कडक! बुमराहचं वैभव सूर्यवंशीने असं केलं स्वागत! पहिल्याच ओव्हरमध्ये ठोकले दोन गगनचुंबी षटकार; पहा व्हिडिओ
5
"पुढील ४८ तास जिथे आहात, तिथेच रहा", ट्रम्प यांच्या धमकीनंतर इराणमधील भारतीयांना केंद्राकडून अलर्ट
6
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
7
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
8
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
9
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
10
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
11
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
12
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
13
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
14
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
15
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
16
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
17
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
18
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
19
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
20
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
Daily Top 2Weekly Top 5

‘मानार’ मध्ये ४१ टक्केच साठा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 7, 2018 00:58 IST

मानार प्रकल्पात ४१ टक्के पाणीसाठा असून यंदा परतीच्या पावसावर प्रकल्प भरेल, अशी आशा बळीराजा करु लागला आहे. मानार प्रकल्पात ४१ टक्के पाणीसाठा राहिला असल्याने नायगाव, बिलोली, धर्माबाद या ठिकाणचा पिण्याचा व सिंचना प्रश्न निर्माण झाला आहे. सलग दुसऱ्या दुसºया वर्षीही प्रकल्प भरला नाही.

लोकमत न्यूज नेटवर्कबारुळ: मानार प्रकल्पात ४१ टक्के पाणीसाठा असून यंदा परतीच्या पावसावर प्रकल्प भरेल, अशी आशा बळीराजा करु लागला आहे.मानार प्रकल्पात ४१ टक्के पाणीसाठा राहिला असल्याने नायगाव, बिलोली, धर्माबाद या ठिकाणचा पिण्याचा व सिंचना प्रश्न निर्माण झाला आहे. सलग दुसऱ्या दुसºया वर्षीही प्रकल्प भरला नाही.मानार प्रकल्पाचे उद्घाटन तत्कालीन मुख्यमंत्री कै. वसंतराव नाईक यांच्या हस्ते १५ जानेवारी रोजी १९६४ रोजी करण्यात आले. या प्रकल्पाच्या निर्मितीसाठी केंद्रीय गृहमंत्री कै. शंकरराव चव्हाण यांनी अथक परिश्रम घेतले.या प्रकल्पासाठी सात गावे स्थलांतरीत करण्यात आली. २ हजार ८६० हेक्टर जमीन कंधार तालुक्यातील गेली. १४६.९२ दलघमी जलसाठा असलेला हा प्रकल्प कंधार, नायगाव, बिलोली, धर्माबाद तालुक्यांतील नागरिक व शेतकºयांसाठी वरदान ठरला आहे. या प्रकल्पावर २५ हजार हेक्टर जमीन सिंचनाखाली आली. बारुळ, बाचोटी, बहाद्दरपूरा, तेलूर,वरवट, धर्मापुरी, चिंचोली येथील सुमारे १५० भोई समाजाचा मच्छ व्यवसाय चालतो.बारुळ मानार प्रकल्प इ. स. २०१६-१७ मध्ये तुडुंब भरला होता. सलग दोन वर्षापासून मात्र प्रकल्प पन्नास टक्क्याच्यावर पाणीसाठा गेला नाही. मागील वर्षी २०१७-१८ मध्ये प्रकल्पात या महिन्यात ३० साठा होता. यंदा २०१८-१९ आॅक्टोबरमध्ये आजरोजी प्रकल्पात ४१ टक्के पाणीसाठा आहे. यामुळे मच्छ व्यवसाय, सिंचनावर संकट येणार की काय, अशी भीती वाटू लागली आहे. बारुळ परिसरात सुरुवातीला चांगला पाऊस झाला.सोयाबीन उत्पादनात घटबारुळ मंडळातील ३८ गावांत शेतक-यांनी सोयाबीन पीक घेतले होते. प्रारंभी पिकाला चांगला पाऊस झाला. मात्र त्यानंतर पावसाने दडी मारली. या काळात पिकावर ‘करपा’ रोग पडला. त्यामुळे उत्पन्नावर घट झाली. पावसाच्या हुलकावणीमुळे सोयाबीनचे उत्पादन घटल्यामुळे शेतकरी हतबल झाला आहे.

टॅग्स :NandedनांदेडDamधरणWaterपाणीwater shortageपाणीटंचाई