जिल्ह्यात नवे ३४ कोरोना रुग्ण

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 21, 2021 04:14 IST2021-06-21T04:14:20+5:302021-06-21T04:14:20+5:30

जिल्ह्यात रविवारी ३९ रुग्णांनी कोरोनावर मात केली आहे. त्यात सर्वाधिक २५ रुग्ण गृहविलगीकरण आणि मनपा अंतर्गत एनआरआय भवन येथील ...

34 new corona patients in the district | जिल्ह्यात नवे ३४ कोरोना रुग्ण

जिल्ह्यात नवे ३४ कोरोना रुग्ण

जिल्ह्यात रविवारी ३९ रुग्णांनी कोरोनावर मात केली आहे. त्यात सर्वाधिक २५ रुग्ण गृहविलगीकरण आणि मनपा अंतर्गत एनआरआय भवन येथील आहेत. शासकीय वैद्यकीय महाविद्यालयातील १, जिल्हा रुग्णालयातील २, मुखेड कोविड रुग्णालय १, किनवट २ आणि खासगी रुग्णालयातील ८ रुग्णांचा कोरोनामुक्त रुग्णांमध्ये समावेश आहे.

जिल्ह्यात सध्या २७१ रुग्णांवर उपचार सुरू आहे. त्यातील दोघांची प्रकृती गंभीर आहे. सध्या विष्णूपुरी येथील शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात ११, जिल्हा रुग्णालय कोविड हॉस्पिटलमध्ये २१, मुखेड ३, किनवट ६, देगलूर ४, हदगाव १ व खासगी रुग्णालयात १२ रुग्ण उपचार घेत आहेत तर मनपा अंतर्गत गृहविलगीकरणात १७२ आणि जिल्ह्यातील विविध तालुक्यांतर्गत ४१ रुग्ण घरीच उपचार घेत आहेत. जिल्ह्यात सध्या रुग्ण बरे होण्याचे प्रमाण ९६.९८ टक्क्यांवर पोहोचली आहे.

Web Title: 34 new corona patients in the district