शहरं
Join us  
Trending Stories
1
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
2
होर्मुझनंतर आता 'बाब अल-मंदेब'वर इराणची नजर? एका ट्विटने खळबळ; काय होणार परिणाम?
3
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
4
Ravindra Erande : खळबळजनक! १२१ आक्षेपार्ह Video, २ पेनड्राईव्ह...; नोकरीचं आमिष दाखवून महिलांवर अत्याचार
5
डोनाल्ड ट्रम्प यांची सुट्टी रद्द! व्हाईट हाऊसमध्ये युद्धाची तयारी? इराणच्या एका चालीने अमेरिका हादरली!
6
मराठ्यांच्या अंगावर धनगर, मुस्लिम आणि दलित घालण्याचे षडयंत्र आहे का? : मनोज जरांगे पाटील
7
अशोक खरात प्रकरण: "संजय राऊतांनी बाकीची उठाठेव सोडून आपल्या..."; भाजपचा उद्धवसेनेवर पलटवार
8
Vastu Shastra: तुमच्या घरातील घड्याळ तुमची प्रगती थांबवतंय का? वास्तुशास्त्राचे 'हे' नियम एकदा नक्की वाचा!
9
बारामती पोटनिवडणूक बिनविरोध करण्यासाठी ठाकरे पाठिंबा देणार का? संजय राऊतांनी सगळेच सांगितले
10
Video: खळखळ वाहणारं नदीचं पाणी अचानक दगडांमध्ये झालं गायब? निसर्गाची ही किमया पाहिलीत?
11
Raghav Chadha : Video - “घायल हूं, इसलिए घातक हूं,...”; AAP च्या गंभीर आरोपावर राघव चड्ढा यांचं चोख प्रत्युत्तर
12
इराणने रस्ता रोखला, पण भारताने शोधली नवी वाट; आफ्रिकेतील देशांशी मैत्री अन् रशियाची तुफान साथ!
13
DC vs MI : मुंबई इंडियन्सचा कॅप्टन बदलला! पांड्याच्या जागी सूर्याकडे जबाबदारी, जाणून घ्या त्यामागचं कारण
14
Gold Silver Price: महिन्याभरात ३५ हजारांनी स्वस्त झाली चांदी, तर सोनं १२ हजारांनी घसरलं; पाहा काय आहेत नवे दर
15
भाजपाने तिकीट नाकारल्यानंतर अन्नामलाई पहिल्यांदाच बोलले, म्हणाले, ‘मला निवडणूक लढवायची…’ 
16
होर्मुज संकटामुळे पाकिस्तानचं कंबरडं मोडलं; 'पेट्रोल बॉम्ब' फुटला, जनताही रस्त्यावर
17
पत्नी प्रियकरासोबत फिरताना दिसली, जाब विचारताच झालं उलट! दोघांनी मिळून पतीला हाणलं
18
Hanuman Mantra: घराबाहेर पडताना, वाहन चालवताना ११ वेळा म्हणा 'हा' दिव्य सुरक्षा कवच मंत्र; हनुमान करतील रक्षण!
19
शेअर बाजारातील घसरणीमुळे गुंतवणूकदार हवालदिल; Zerodha च्या नितीन कामथ यांनी दिला नवा मंत्र
20
Video - हृदयद्रावक! नातू पार्क करत होता गाडी, तेवढ्यात बॅक गिअर; आजीचा जागीच मृत्यू,
Daily Top 2Weekly Top 5

नितीश कुमारांच्या पोटात ३२ दात, नाना पटोले यांची टीका

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 28, 2024 17:23 IST

आपल्या राजकीय फायद्यासाठी ते केव्हाही इकडून तिकडे जावू शकतात अशा शब्दात काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी टीका केली.

नांदेड- नितीशकुमार पुन्हा भाजपासोबत गेले आहेत. त्यावरुन मला लोकसभेतील लालू प्रसाद यांचे भाषण आठवते. आपल्या तोंडात ३२ दात असतात. मात्र नितीश कुमारांच्या पोटात ३२ दात आहेत, असे ते म्हणाले होते. आपल्या राजकीय फायद्यासाठी ते केव्हाही इकडून तिकडे जावू शकतात अशा शब्दात काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी टीका केली.

काँग्रेसच्या महिला मेळाव्यासाठी रविवारी नाना पटोले हे नांदेडात आले होते. ते म्हणाले, २०१४ पासून आतापर्यंतच्या काळात नितीमत्ता अन् सगळ्या व्यवस्थेला मातीमोल करण्याचे पाप भाजपाने केले आहे. भ्रष्टाचाराने पैसे कमवा, लोकांना विकत घ्या नाहीतर ईडी आणि सीबीआयचा वापर करा असे सुरु आहे. राजकीय नितीमत्ता संपविण्याचे काम सध्या सुरु आहे. त्यामुळे राजकीय अस्थिरता आली आहे. बहुमताचे सरकार पाडणे सुरु आहे. महाराष्ट्रातही फुले-शाहू-आंबेडकर यांच्या विचाराला मुठमाती देण्याचे काम केले. या राज्यात सध्या भ्रष्ट सरकार काम करीत आहे. त्यामुळे ही जी परिस्थिती निर्माण झाली आहे. त्यासाठी लोक आता निवडणुकीची वाट पाहत आहेत. निवडणुकीत भाजपला घरी पाठविण्याचा मानस जनतेने केला आहे, असेही पटोले म्हणाले.

आठ ते दहा दिवसात जागा वाटप निश्चित

येत्या ३० तारखेला इंडीया आघाडीची बैठक होणार आहे. या बैठकीचे निमंत्रण वंचितचे प्रकाश आंबेडकर यांनाही देण्यात आले आहे. प्रदेश प्रभारी रमेश चेन्नीथला यांचे त्यांच्याशी बोलणे झाले आहे. ते किंवा त्यांचे प्रतिनिधी या बैठकीला उपस्थित राहतील. येत्या आठ ते दहा दिवसात महाराष्ट्रातील जागा वाटप निश्चित होणार आहे. उद्धव ठाकरे गटाने मुंबईतील चार जागांवर दावा केल्याचा विषयावर पटोले यांनी असे आता चालतच राहणार आहे. आठ दिवसात त्यावर अंतिम निर्णय होईल असे सांगितले.

नितीश कुमार पलटूराम-चेन्नीथला

राहुल गांधी यांच्या भारत जोडो यात्रेची भाजपाला भीती वाटत आहे. त्यामुळे राहूल गांधी यांच्यावर बिनबोभाट आरोप केले जात आहेत. नितीश कुमार यांच्याबाबत काय बोलणार? आतापर्यंत ते किती वेळा पलटले आहेत. ते पलटूराम आहेत. उद्या आमच्यासोबतही येवू शकतात. त्यामुळे त्यांच्या बद्दल न बोललेच बरे अशी प्रतिक्रिया महाराष्ट्र प्रभारी रमेश चेन्नीथला यांनी दिली.

टॅग्स :Nana Patoleनाना पटोलेNitish Kumarनितीश कुमार