शहरं
Join us  
Trending Stories
1
श्रेयस अय्यरचं अर्धशतक, पंजाबकडून चेन्नईचा ५ विकेट्सनं पराभव, आयुषच्या मेहनतीवर फेरलं पाणी!
2
अफगाणिस्तानला भूकंपाचा भीषण धक्का; जम्मू-काश्मीर आणि दिल्लीतही जमीन हादरली
3
"ही वृत्ती संपुष्टात आणण्याची शिवसेनेची भूमिका"; अशोक खरातचे एकनाथ शिंदेंना फोनच्या दाव्यावर उदय सामंतांची प्रतिक्रिया
4
इराणने आमचे लढाऊ विमान पाडले, वैमानिकही बेपत्ता; अमेरिकेने दिली कबुली
5
Mumbai Indias: मुंबई इंडियन्सची ताकद वाढली, स्टार ऑलराउंडरची संघात एन्ट्री, दिल्लीविरुद्ध खेळण्याची शक्यता!
6
Ashok Kharat Case : भोंदूबाबा खरातचा 'महाप्रताप'! भक्तांच्याच नावे उघडली १०० बोगस खाती; 'समता' आणि 'जयदंबा' पतसंस्था रडारवर
7
'फोनवर संभाषण झाले म्हणून वरिष्ठ मंत्र्यांवर आरोप करणे योग्य नाही';अंजली दमानियांच्या आरोपांवर दीपक केसरकरांचे प्रत्युत्तर
8
धुळे-सोलापूर महामार्गावर प्रचंड वाहतूक कोंडी; ७ तासांपासून वाहने खोळंबली, नागरिकांचे हाल
9
ज्याची भीती तेच घडलं, युद्ध आणखी पेटलं; इराणच्या सर्वात मोठ्या ब्रिजवर हल्ला, ८ मृत्यू ९५ जखमी
10
IPL 2026: ५ षटकार, ६ चौकार, १६९.७७ चा स्ट्राईक रेट; पंजाबविरुद्ध आयुष म्हात्रेची विस्फोटक इनिंग!
11
US Israel Iran War : इराणचा यू-टर्न! आधी म्हणालं 'वैमानिक ताब्यात', आता शोधण्यासाठी बक्षीस; अमेरिकेच्या पायलटबाबत सस्पेन्स
12
IPL 2026: रोहित शर्माचा फिटनेस तर बघा, चक्क एका हातानं पकडला झेल, व्हिडीओ व्हायरल
13
India Oil Supply News: भारतासाठी 'संजीवनी' ठरला हा छोटा देश; युद्ध असो की संकट, अविरत करतोय तेल अन् गॅस पुरवठा
14
"आणखी थोडा वेळ मिळाला, तर अमेरिका सहज होर्मुझ सामुद्रधुनी...", डोनाल्ड ट्रम्प यांचे इराणची चिंता वाढवणार विधान
15
म्हाडाचं घर घ्यायचा विचार? फॉर्म किती रुपयांना, अनामत रक्कम किती भरावी लागणार?
16
US Israel Iran War : डोनाल्ड ट्रम्प यांना विरोध केल्याचे फळ! इराणने उघडला फ्रान्ससाठी होर्मुझचा रस्ता; मॅक्रॉन यांना खास 'बक्षीस'
17
IPL 2026: चेन्नईच्या संघात एक मोठा बदल; कोण इन, कोण आउट? पाहा दोन्ही संघाची प्लेईंन इलेव्हन
18
MS Dhoni: सीएसकेच्या चाहत्यांसाठी गूड न्यूज? ट्रेनिंग सेशनसाठी धोनी मैदानात, पण खेळण्याबाबत सस्पेन्स कायम
19
फक्त एका दिवसासाठी अमेरिकेतून युवक भारतात आला; ताजमहाल पाहून निघून गेला, Video व्हायरल
20
Latest Marathi News LIVE Updates: अमेरिकेला पुन्हा झटका! इराणने दुसरे एफ-३५ लढाऊ विमान पाडले
Daily Top 2Weekly Top 5

नांदेड महापालिकेत २ लाख ४६ हजार 'लाडक्या बहिणी' निर्णायक; जाणून घ्या प्रभागवार मतदार

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 19, 2025 18:39 IST

महिलांच्या तुलनेत पुरुष मतदारांची संख्या जास्त असली तरी तीन प्रभागांत महिला मतदारांचा वरचष्मा कायम

नांदेड : महापालिका निवडणुकीसाठी अंतिम प्रारूप मतदार यादी महापालिकेने नुकतीच घोषित केली असून, तब्बल ५ लाख १ हजार ७९९ मतदार मतदानाचा हक्क बजावणार आहेत. महिलांच्या तुलनेत पुरुष मतदारांची संख्या जास्त असली तरी तीन प्रभागांत महिला मतदारांचा वरचष्मा कायम राहणार असल्याचे आकडेवारीरून दिसून येते.

महापालिकेत एकूण २० प्रभाग असून, सर्वात कमी मतदार हनुमानगढ प्रभागात १९ हजार ३८० तर सर्वाधिक मतदार सिडको-वाघाळा प्रभागात ३१ हजार ९०८ मतदार आहेत. बहुसदस्यीय रचना असलेल्या प्रत्येक प्रभागातून ४ तर शेवटचा सिडको-वाघाळा प्रभागातून ५ नगरसेवक निवडून दिले जाणार आहेत. या निवडणुकीत २ लाख ५४ हजार ९९९ पुरुष तर २ लाख ४६ हजार ६९६ महिला मतदार आहेत. याशिवाय १०४ इतर मतदार मतदानाचा हक्क बजावतील. प्रभाग क्रमांक ७ जयभीमनगर-मगदूम नगर, प्रभाग क्रमांक ८ शिवाजीनगर व प्रभाग क्रमांक १८ खडकपुरा-देगाव चाळ या प्रभागात महिला मतदारांची संख्या पुरुषांपेक्षा अधिक आहेत. बहुतांश तृतीयपंथी मतदार सांगवी व शिवाजीनगर प्रभागात वास्तव्यास असल्याचे मतदार यादीवरून दिसून येते.

मतदारांना वळवताना उमेदवारांची परीक्षाप्राप्त अर्जांची छाननी झाल्यावर महापालिका निवडणुकीचा रणसंग्राम रंगणार आहे. असे असले तरी काही झाले तरी निवडणूक लढवायचीच असा निर्धार केलेल्या अनेक इच्छुकांनी निवडणूक घोषित होण्यापूर्वीच प्रभाग पिंजून काढले आहेत. लोकप्रतिनिधी असताना प्रभागात न फिरकणारे अनेक चेहरे इतिहास विसरुन मतदारांना गळ घालताना दिसून येत आहेत. मात्र, अतिशय चाणाक्ष असलेला मतदारराजा इच्छुकांची कधी फिरकी तर कधी नेतेमंडळींप्रमाणे आश्वासन देत मतदान तुम्हालाच करणार असल्याचे सांगत उमेदवारांना भिजवत ठेवत आहे.

निवडणूक लांबल्याने उत्सुकता शिगेलामहापालिकेचा कार्यकाळ संपून तीन वर्षांपेक्षा अधिकचा कालावधी लोटला आहे. यापूर्वी २०१७ मध्ये महापालिका निवडणूक झाली होती. त्याला जवळपास आठ वर्षे झाली असून, न्यायालयाच्या आदेशाने का होईना लांबलेली निवडणूक पुन्हा एकदा होणार आहे. यानिमित्ताने मतदानाचा हक्क बजावून रखडलेली कामे लोकसेवकांकडे पाठपुरावा करुन पूर्ण होतील, अशी अपेक्षा मतदारांना आहे. त्यामुळे उमेदवार व मतदार या दोन्ही घटकांना लांबलेली निवडणूक एकदाची घोषित झाल्याने आनंदाचे उधाण आले आहे.

प्रभाग क्रमांक व नाव  पुरुष मतदार  स्त्री मतदार   इतर   एकूण मतदार१ - तरोडा खु.१३,४९७१२,७०८१२६,२०६२ - तरोडा बु.१३,४५८१३,७४३*३२७,२०४३ - सांगवी बु.१०,३६४९,९२६५२२०,३४२४ - हनुमानगड९,८८५९,४९५०१९,३८०५ - भाग्यनगर१२,२३५११,८४६३७७*२४,४५८६ - गणेशनगर१२,४५०११,५२०३२६*२४,२९६७ - जयभीमनगर / मकदुमनगर११,३५२११,४५१६२२,८७८८ - शिवाजीनगर११,३३८१०,६४४८४४*२२,८२६९ - नवा मोंढा१०,९६९११,९६२१२२,९३२१० - दत्त नगर१२,४३३१२,१६२६५३*२५,२४८११ - हैदरबाग१३,०८६१४,६९७२२७,७८५१२ - उमर कॉलनी१५,४६३१४,६९९*०३०,१६२१३ - चौफाळा / करबला१०,७९३१०,७७४०२१,५६७१४ - इतवारा / मदिनानगर१३,०१५१२,६७२०२५,६८७१५ - होळी / मनियारगल्ली१५,१०९१४,३२६०२९,४३५१६ - वजिराबाद / गाडीपुरा१२,६४९१२,३४६१२४,९९६१७ - गुरुद्वारा११,८२८११,४५४०२३,२८२१८ - खडकपुरा / देगावचाळ१२,९७२१३,०६७०२६,०३९१९ - वसरणी / कौठा१५,०१८१४,१५८०२९,१७६२० - सिडको / वाघाळा१६,१००१५,८०८०३१,९०८

एकूण २,५४,९९९- २,४६,६९६- १०४- ५,०१,७९९

English
हिंदी सारांश
Web Title : Nanded Municipal Corporation: 2.46 Lakh Women Voters Key; Ward-wise Details

Web Summary : Nanded's municipal elections see 5.01 lakh voters. Women outnumber men in three wards. Ward 7, 8, and 18 have more female voters. The election is generating much interest among candidates and voters alike after a long delay.
टॅग्स :Municipal Electionमहानगरपालिका - नगरपालिका निवडणूक २०२६Nanded-Waghala Municipal Corporationनांदेड - वाघाळा महानगरपालिका