नांदेड महापालिकेत २ लाख ४६ हजार 'लाडक्या बहिणी' निर्णायक; जाणून घ्या प्रभागवार मतदार

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 19, 2025 18:39 IST2025-12-19T18:39:49+5:302025-12-19T18:39:59+5:30

महिलांच्या तुलनेत पुरुष मतदारांची संख्या जास्त असली तरी तीन प्रभागांत महिला मतदारांचा वरचष्मा कायम

2 lakh 46 thousand 'Ladakya Bahini' are decisive in Nanded Municipal Corporation; Know ward-wise voters | नांदेड महापालिकेत २ लाख ४६ हजार 'लाडक्या बहिणी' निर्णायक; जाणून घ्या प्रभागवार मतदार

नांदेड महापालिकेत २ लाख ४६ हजार 'लाडक्या बहिणी' निर्णायक; जाणून घ्या प्रभागवार मतदार

नांदेड : महापालिका निवडणुकीसाठी अंतिम प्रारूप मतदार यादी महापालिकेने नुकतीच घोषित केली असून, तब्बल ५ लाख १ हजार ७९९ मतदार मतदानाचा हक्क बजावणार आहेत. महिलांच्या तुलनेत पुरुष मतदारांची संख्या जास्त असली तरी तीन प्रभागांत महिला मतदारांचा वरचष्मा कायम राहणार असल्याचे आकडेवारीरून दिसून येते.

महापालिकेत एकूण २० प्रभाग असून, सर्वात कमी मतदार हनुमानगढ प्रभागात १९ हजार ३८० तर सर्वाधिक मतदार सिडको-वाघाळा प्रभागात ३१ हजार ९०८ मतदार आहेत. बहुसदस्यीय रचना असलेल्या प्रत्येक प्रभागातून ४ तर शेवटचा सिडको-वाघाळा प्रभागातून ५ नगरसेवक निवडून दिले जाणार आहेत. या निवडणुकीत २ लाख ५४ हजार ९९९ पुरुष तर २ लाख ४६ हजार ६९६ महिला मतदार आहेत. याशिवाय १०४ इतर मतदार मतदानाचा हक्क बजावतील. प्रभाग क्रमांक ७ जयभीमनगर-मगदूम नगर, प्रभाग क्रमांक ८ शिवाजीनगर व प्रभाग क्रमांक १८ खडकपुरा-देगाव चाळ या प्रभागात महिला मतदारांची संख्या पुरुषांपेक्षा अधिक आहेत. बहुतांश तृतीयपंथी मतदार सांगवी व शिवाजीनगर प्रभागात वास्तव्यास असल्याचे मतदार यादीवरून दिसून येते.

मतदारांना वळवताना उमेदवारांची परीक्षा
प्राप्त अर्जांची छाननी झाल्यावर महापालिका निवडणुकीचा रणसंग्राम रंगणार आहे. असे असले तरी काही झाले तरी निवडणूक लढवायचीच असा निर्धार केलेल्या अनेक इच्छुकांनी निवडणूक घोषित होण्यापूर्वीच प्रभाग पिंजून काढले आहेत. लोकप्रतिनिधी असताना प्रभागात न फिरकणारे अनेक चेहरे इतिहास विसरुन मतदारांना गळ घालताना दिसून येत आहेत. मात्र, अतिशय चाणाक्ष असलेला मतदारराजा इच्छुकांची कधी फिरकी तर कधी नेतेमंडळींप्रमाणे आश्वासन देत मतदान तुम्हालाच करणार असल्याचे सांगत उमेदवारांना भिजवत ठेवत आहे.

निवडणूक लांबल्याने उत्सुकता शिगेला
महापालिकेचा कार्यकाळ संपून तीन वर्षांपेक्षा अधिकचा कालावधी लोटला आहे. यापूर्वी २०१७ मध्ये महापालिका निवडणूक झाली होती. त्याला जवळपास आठ वर्षे झाली असून, न्यायालयाच्या आदेशाने का होईना लांबलेली निवडणूक पुन्हा एकदा होणार आहे. यानिमित्ताने मतदानाचा हक्क बजावून रखडलेली कामे लोकसेवकांकडे पाठपुरावा करुन पूर्ण होतील, अशी अपेक्षा मतदारांना आहे. त्यामुळे उमेदवार व मतदार या दोन्ही घटकांना लांबलेली निवडणूक एकदाची घोषित झाल्याने आनंदाचे उधाण आले आहे.

प्रभाग क्रमांक व नाव  पुरुष मतदार  स्त्री मतदार   इतर   एकूण मतदार
१ - तरोडा खु.१३,४९७१२,७०८१२६,२०६
२ - तरोडा बु.१३,४५८१३,७४३*३२७,२०४
३ - सांगवी बु.१०,३६४९,९२६५२२०,३४२
४ - हनुमानगड९,८८५९,४९५०१९,३८०
५ - भाग्यनगर१२,२३५११,८४६३७७*२४,४५८
६ - गणेशनगर१२,४५०११,५२०३२६*२४,२९६
७ - जयभीमनगर / मकदुमनगर११,३५२११,४५१६२२,८७८
८ - शिवाजीनगर११,३३८१०,६४४८४४*२२,८२६
९ - नवा मोंढा१०,९६९११,९६२१२२,९३२
१० - दत्त नगर१२,४३३१२,१६२६५३*२५,२४८
११ - हैदरबाग१३,०८६१४,६९७२२७,७८५
१२ - उमर कॉलनी१५,४६३१४,६९९*०३०,१६२
१३ - चौफाळा / करबला१०,७९३१०,७७४०२१,५६७
१४ - इतवारा / मदिनानगर१३,०१५१२,६७२०२५,६८७
१५ - होळी / मनियारगल्ली१५,१०९१४,३२६०२९,४३५
१६ - वजिराबाद / गाडीपुरा१२,६४९१२,३४६१२४,९९६
१७ - गुरुद्वारा११,८२८११,४५४०२३,२८२
१८ - खडकपुरा / देगावचाळ१२,९७२१३,०६७०२६,०३९
१९ - वसरणी / कौठा१५,०१८१४,१५८०२९,१७६
२० - सिडको / वाघाळा१६,१००१५,८०८०३१,९०८

एकूण २,५४,९९९- २,४६,६९६- १०४- ५,०१,७९९

Web Title : नांदेड़ महानगरपालिका: 2.46 लाख महिला मतदाता निर्णायक; वार्ड-वार विवरण

Web Summary : नांदेड़ महानगरपालिका चुनाव में 5.01 लाख मतदाता। तीन वार्डों में महिलाओं की संख्या पुरुषों से अधिक है। वार्ड 7, 8 और 18 में महिला मतदाता अधिक हैं। लंबे इंतजार के बाद चुनाव से उम्मीदवारों और मतदाताओं में काफी दिलचस्पी है।

Web Title : Nanded Municipal Corporation: 2.46 Lakh Women Voters Key; Ward-wise Details

Web Summary : Nanded's municipal elections see 5.01 lakh voters. Women outnumber men in three wards. Ward 7, 8, and 18 have more female voters. The election is generating much interest among candidates and voters alike after a long delay.

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.