नांदेड शहरातीलकॅन्डल मार्च दगडफेक प्रकरणी १५ जणांवर गुन्हे

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 19, 2018 12:54 AM2018-04-19T00:54:32+5:302018-04-19T00:54:32+5:30

उन्नाव व कठुआ येथील अत्याचाराच्या घटनेचा निषेध करण्यासाठी मंगळवारी रात्री शहरातील आयटीआय चौकातून कॅन्डल मार्च काढण्यात आला होता़ या कॅन्डल मार्चचा डॉ़ बाबासाहेब आंबेडकर पुतळ्याजवळ समारोप झाल्यानंतर त्यातील काही जणांनी बसेसवर दगडफेक केली होती़ या प्रकरणात वजिराबाद पोलिसांनी पंधरा जणांवर गुन्हे नोंदविले असून त्यातील चार जणांना अटक करण्यात आली आहे़ दगडफेकीत जवळपास पाच लाखांचे नुकसान झाले़

15 gang rape cases in Nanded city | नांदेड शहरातीलकॅन्डल मार्च दगडफेक प्रकरणी १५ जणांवर गुन्हे

नांदेड शहरातीलकॅन्डल मार्च दगडफेक प्रकरणी १५ जणांवर गुन्हे

Next
ठळक मुद्देचार जणांना अटक : जवळपास पाच लाखांचे नुकसान

लोकमत न्यूज नेटवर्क
नांदेड : उन्नाव व कठुआ येथील अत्याचाराच्या घटनेचा निषेध करण्यासाठी मंगळवारी रात्री शहरातील आयटीआय चौकातून कॅन्डल मार्च काढण्यात आला होता़ या कॅन्डल मार्चचा डॉ़ बाबासाहेब आंबेडकर पुतळ्याजवळ समारोप झाल्यानंतर त्यातील काही जणांनी बसेसवर दगडफेक केली होती़ या प्रकरणात वजिराबाद पोलिसांनी पंधरा जणांवर गुन्हे नोंदविले असून त्यातील चार जणांना अटक करण्यात आली आहे़ दगडफेकीत जवळपास पाच लाखांचे नुकसान झाले़
नांदेड नागरी समितीच्या वतीने या कॅन्डल मार्चचे आयोजन करण्यात आले होते़ आयटीआय चौक येथून सात वाजता हा कॅन्डल मार्च निघाला होता़ रात्री आठ वाजेच्या सुमारास तो डॉ़बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्याजवळ पोहोचला़ यावेळी महिला व लहान मुलांना अगोदर काढून देण्यात आले़
त्यानंतर मोर्चातील काही जणांमध्ये आपआपसात वाद झाला़ या वादानंतर काही जणांनी रस्त्यावर उभ्या असलेल्या बसेसवर दगडफेक करण्यास सुरुवात झाली़ त्यामुळे एकच धावपळ झाली़ या दगडफेकीत शहर वाहतूक शाखेच्या वाहनासह एकूण १६ वाहनांचे नुकसान झाले़ याप्रकरणी वजिराबाद पोलिसांनी १५ जणांविरुद्ध गुन्हा नोंदविला आहे़
त्यात अरुण दगडू, फारुख अहमद, मकसूद पटेल, फिरोज लाला, शेख मुख्तार शे़युसूफ, म़आवेज मग़ौस, पठाण इम्रान खान युसूफ खान, शेख अफरोज शेख चाँद, विजय गाभणे, प्रदीप नागापूरकर, शंकर बांदावार, दिनकर राठौर, अलताफ हुसेन, श्याम कांबळे व श्याम निलंगेकर यांचा समावेश आहे़

Web Title: 15 gang rape cases in Nanded city

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.