सीबीएसईचे १२५० विद्यार्थी परीक्षा न देता पास
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 18, 2021 04:17 IST2021-04-18T04:17:16+5:302021-04-18T04:17:16+5:30
प्रतिक्रिया- १. सीबीएसईने दहावीच्या परीक्षा न घेण्याचा निर्णय घेऊन विद्यार्थ्यांना, तसेच पालकांना दिलासा दिला आहे. कारण कोरोनाचे रुग्ण दिवसेंदिवस ...

सीबीएसईचे १२५० विद्यार्थी परीक्षा न देता पास
प्रतिक्रिया- १. सीबीएसईने दहावीच्या परीक्षा न घेण्याचा निर्णय घेऊन विद्यार्थ्यांना, तसेच पालकांना दिलासा दिला आहे. कारण कोरोनाचे रुग्ण दिवसेंदिवस सुरू असून, अशा वेळी विद्यार्थ्यांच्या सुरक्षेचा प्रश्न निर्माण झाला असता. त्यामुळे पालकांमध्ये चिंतेचे वातावरण होते. - अशोक कवडे, नांदेड.
२. दहावीच्या परीक्षा न घेता विद्यार्थ्यांना पास करण्याचा निर्णय योग्य असला तरी विद्यार्थ्यांना पुढील प्रवेशासाठी कशा पद्धतीने नियम लागू करणार आहेत याबाबत प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहेत. विद्यार्थ्यांचे कोणतेही नुकसान हाेऊ नये, अशी भीती पालकांमध्ये आहे. - गणेश बुक्तरे, नांदेड
३. कोरोनाचा प्रादुर्भाव वाढल्याने विद्यार्थ्यांच्या सुरक्षिततेच्या दृष्टीने दहावीच्या परीक्षा रद्द करून या विद्यार्थ्यांना पुढील वर्गात प्रवेशित करण्याचा निर्णय योग्यच आहे. या विद्यार्थ्यांचे दहावीमध्ये झालेल्या अंतर्गत परीक्षांतील गुणांच्या आधारे मूल्यांकन करावे. - साईनाथ वाघमारे, नांदेड.
प्रतिक्रिया - दहावीमध्ये झालेल्या अंतर्गत परीक्षांतील गुणांच्या आधारे मूल्यांकन केले जाणार आहे. विद्यार्थ्यांच्या शाळेत दोन चाचण्या, एक सहामाही आणि दोन पूर्व परीक्षा झाल्या असल्याने विद्यार्थ्यांना योग्य गुणांकन दिले जातील. त्यामुळे कोणतेही नुकसान होणार नाही. - बालासाहेब कच्छवे, शिक्षणतज्ञ नांदेड