शहरं
Join us  
Trending Stories
1
दोन दिवसांत दाेनदा प्रवासी लटकले; सीएसएमटी ते वडाळ्यापर्यंत वाहतूक कोलमडली
2
आजचे राशीभविष्य - २ मे २०२४; व्यापारासाठी दिवस उत्तम, आर्थिक बाबी मार्गी लागतील
3
२८-१५-५ महायुतीचा फॉर्म्युला; नाशिक, ठाणे शिंदेसेनेला, पालघर भाजपकडे
4
पहिल्या दोन टप्प्यांतील मतदानाची अंतिम टक्केवारी जाहीर; ३ टक्क्यांची वाढ
5
राज ठाकरे सभा घेऊन कोणाच्या वरातीत नाचणार? सभेसाठी मनसेच्या अर्जावर उद्धवसेनेची टीका
6
भाजप-उद्धवसेना फक्त एका ठिकाणी समोरासमोर; गळ्यात गळे घालून फिरणारे शिवसैनिक एकमेकांच्या विरोधात
7
मुंबईत षटकार मारणार, राज्यात १५ जागा जिंकणार; मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना विश्वास
8
लॉकअपमधल्या चादरीच्या पट्टीने गळफास घेत बिश्नोई गँगच्या आरोपीची आत्महत्या
9
देशाच्या विकासात काँग्रेस अडथळा; ‘फॅमिली फर्स्ट’मुळे भारताचे नुकसान, योगी आदित्यनाथ यांचे टीकास्त्र
10
ठाण्यात दोघा माजी महापौरांमध्ये पुन्हा लढत; २०१४ मध्ये राजन विचारे विरुद्ध संजीव नाईक झाली होती लढत
11
प्रज्वल रेवण्णा उद्या बंगळुरूत येणार; आरोप तथ्यहीन असल्याचा दावा
12
पंतप्रधानांच्या पत्रात दडला निवडणुकीचा अजेंडा; उमेदवारांच्या माध्यमातून मतदारांना संदेश
13
श्रीकांत यांच्या कल्याणसाठी म्हस्केंना उमेदवारी देऊन विचारेंना बाय ? राजन विचारे यांना निवडणूक सोपी जाणार अशी चर्चा सुरू
14
शिंदेंना चढावी लागणार ‘व्हाइट हाउस’ची पायरी; गणेश नाईक यांचा नवी मुंबईसह आगरी मतांवर प्रभाव
15
मराठी पाट्यांचे रडगाणे; ९८ टक्के आस्थापनांनी न्यायालयाच्या आदेशाचे पालन केले
16
दगडफेकीपर्यंतचा प्रचार कोणत्या दिशेने जाणार?
17
MS Dhoni ने केला डॅरिल मिचेलचा अपमान? खवळला इरफान पठाण, Video Viral 
18
100 शाळा अन् 143 कॉल…; बॉम्बच्या धमकीनंतर दिल्ली सरकार अ‍ॅक्शन मोडवर, अ‍ॅडव्हायजरी जारी
19
जय श्रीराम! राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू अयोध्येत; रामलला चरणी नतमस्तक, शरयू नदीचे केले पूजन
20
शरद पवारांनंतर उद्धव ठाकरेंनी भरसभेत मागितली माफी; PM मोदींवर केली टीका, म्हणाले...

अग्निशमन दलाकडून उपलब्ध यंत्रणेद्वारे १२१ मोहिमा फत्ते; मोठ्या बंबाची गरज

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 28, 2020 6:59 PM

एवढ्या मोठ्या शहरासाठी केवळ २१ कर्मचारीच आहेत.

ठळक मुद्दे नांदेड अग्निशमन दलात कर्मचाऱ्यांची वाणवाअत्याधुनिक साहित्याची आवश्यकता

नांदेड : शहरातील आगी आटोक्यात आणण्याची धुरा नांदेड महापालिका अग्निशमन दलातील २१ कर्मचाऱ्यांवर आहे. तर सिडकोमध्ये एमआयडीसी परिसरात स्वतंत्र केंद्र असून तिथे १३ कर्मचारी कार्यरत आहेत. जीवाची बाजी लावत योग्य वेळेत पोहोवून आग आटोक्यात आणण्याचा अग्निशमन दलाचा प्रयत्न राहिला आहे. मागील वर्षभरात महापालिकेच्या अग्निशमन दलाने जवळपास १२१ आगी आटोक्यात आणण्याचे काम केले आहे. 

नांदेड शहरात उद्योग, धंदे मोठ्या प्रमाणात असून मनपाच्या अखत्यारित सर्वाधिक प्रमाणात कापड, स्टेशनरी, फर्निचर साहित्य आदीची दुकाने आहेत.  शहरात आगीच्या घटना वारंवार घडत असतात. त्यामुळे अग्निशमन दलास कायमच सतर्क रहावे लागते. परंतु, एवढ्या मोठ्या शहरासाठी केवळ २१ कर्मचारीच आहेत. वाहन चालकासह फायर मॅन, लीड फायर मॅन असे जवळपास १४ पदे रिक्त आहेत. सिडकोत एकच बंब असून कर्मचार्यांची संख्या जवळपास १३ आहे.  शहरातील आगीची संख्या पाहता साहित्य आणि कर्मचारी संख्या वाढविण्याची गरज आहे. 

आगीच्या १२१ घटनानांदेड शहर व परिसरात घडलेल्या वर्षभरातील जवळपास १२१ ठिकाणच्या आगी विझविण्याचे काम अग्निशमल दलाने केले आहे. त्यात अनेक ठिकाणी २० मिनिटाच्या आत पोहोचण्याचे रेकॅार्डही अग्निशमन दलाने केलेले आहे. यामध्ये वर्षभरातील सर्वात मोठी असलेली लातूर फाट्यावरील आग वेळेत विझविली होती. 

अत्याधुनिक साहित्याचा अभावनांदेड महापालिकेच्या अग्निशमन दलाकडे फायर टेंडर, क्यूआरव्ही (देवदूत), फायर बुलेट यासह इतर यंत्र सामग्री उपलब्ध आहे. येथे ब्राऊझर फायर टेंडर (मोठा बंब) ज्यात १२ हजार लिटर पाणी बसेल, अशा बंबाची कमतरता आहे. तर सिडकोत एकच बंब आहे. एमआयडीसी असल्याने आणखी बंब वाढविण्याबरोबर अत्याधुनिक साहित्य उपलब्ध करून देण्याची गरज आहे. 

अग्निशमन दलात कर्मचाऱ्यांचा अभावमहापालिकेच्या अग्निशमन दलामध्ये अग्निशमन अधिकारी शेख रईसपाशा यांच्यासह २१ कमर्मचार्यांचा समावेश आहे. याठिकाणी वाहनचालक, फायर मॅन अशा कर्मचार्यांचा अभाव आहे.  नवीन नांदेडच्या एमआयडीसी परिसरात नव्याने सुरू केलेल्या केंद्रात जवळपास १३ कर्मचारी असून इतर रिक्त पदे भरण्याची गरज आहे.  

नांदेड शहर व परिसरात घडलेल्या आगीच्या घटना आटोक्यात आणण्याचा आमचा नेहमीच प्रयत्न राहिला आहे. उपलब्ध मणुष्यबळावर आम्ही दोन शिफ्टमध्ये काम करतो.  परंतु, कर्मचार्यांचे समर्पण आणि नियोजनामुळे बहुतांश ठिकाणी वेळेत पाेहोचून आग विझविण्यात यश मिळालेले आहे.    - शेख रईस पाशा, अग्निशमन अधिकारी, मनपा. 

टॅग्स :Fire Brigadeअग्निशमन दलNanded-Waghala Municipal Corporationनांदेड - वाघाळा महानगरपालिका