शहरं
Join us  
Trending Stories
1
स्वाती मालीवाल यांच्या तक्रारीनंतर पोलीस अ‍ॅक्शन मोडमध्ये, विभव कुमार यांच्याविरोधात FIR दाखल
2
IPL 2024, QUALIFIER 1 च्या एका जागेसाठी तिरंगी लढत; SRH, RR, CSK यांच्यात मजेशीर चुरस
3
खासदारांच्या दिलदार शत्रूनेच चंद्रहार पाटील यांचा घात केला - विशाल पाटील
4
SRH vs GT सामन्यात पाऊस आला धावून, २ संघ गेले वाहून! आता प्ले ऑफचे एकच स्थान शिल्लक
5
स्वाती मालीवाल यांनी दिली लेखी तक्रार, गैरवर्तनप्रकरणी दिल्ली पोलीस करणार चौकशी 
6
पंतप्रधान मोदी किती जागा जिंकणार? चीननंतर आता पाकिस्तानातूनही आला आकडा! तुम्हीही जाणून घ्या
7
लोणारच्या दैत्यसुदन मंदिरामध्ये सूर्यकिरणांचा अभिषेक!
8
घाटकोपर होर्डिंग दुर्घटनेतील आरोपी भावेश भिंडे याला अटक; दोन दिवसांपासून सुरु होता शोध
9
मी फडणवीसांवर काहीच बोलणार नाही, कारण...; उद्धव ठाकरेंनी केली घणाघाती टीका
10
अमेठीतून गेले आता रायबरेलीतूनही जाणार खटा-खट-खटा-खट, पंतप्रधान मोदींचा राहुल गांधींवर हल्लाबोल
11
विकेंडला तीन दिवस 'ड्राय डे' राहणार! मद्यप्रेमींना घसा ओला करणे आव्हान 
12
धक्कादायक! प्रॉपर्टीच्या वादातून नायजेरियात मशिदीत बॉम्बस्फोट; आठ जणांचा मृत्यू, १६ जखमी
13
'संपूर्ण जगाला विश्वास, भारतात BJP चे सरकार स्थापन होणार', PM मोदींचा विरोधकांवर निशाणा
14
Mahindra XUV 3XO चा रेकॉर्ड, अवघ्या एका तासात 50000 बुकिंग!
15
तू काय नवीन नाहीस! गौतम गंभीरचा ट्वेंटी-२० वर्ल्ड कपपूर्वी संजू सॅमसनला सज्जड दम 
16
T20 World Cup आधी पाकिस्तानची इंग्लंडविरूद्ध तयारी; शोएब मलिकने सांगितला प्लॅन
17
"इंडिया आघाडी फुटणार अन् शहजादे...", पंतप्रधान नरेंद्र मोदींचा विरोधकांवर हल्लाबोल
18
रायबरेलीत सोनिया गांधी सक्रिय; अखिलेश यादव, राहुल गांधी पोहोचण्यापूर्वीच कार्यकर्त्यांसोबत बैठक!
19
केजरीवाल बाहेर आल्याने सर्वाधिक नुकसान कुणाचं, भाजप की काँग्रेस?; प्रशांत किशोर यांनी 'गणित'च सांगितलं
20
‘CAA ही मोदींची गॅरंटी, कुणीही हटवू शकणार नाही’, आझमगड येथून मोदींनी दिलं आव्हान

१ कोटींना गंडवून वाळू ठेकेदार पसार?

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 01, 2019 12:32 AM

शासकीय दंडाची रक्कम टाळणे व मजुरांची मजुरी या दोन्हीच्या रकमा काही लाखात गेल्याचे लक्षात येताच वाळू ठेकेदाराने रात्रीतून साहित्यासह गाशा गुंडाळल्याचा प्रकार ३० मे रोजी सगरोळी येथे घडला.

ठळक मुद्देबिलोली तालुक्यातील सगरोळीचा प्रकार रिकामे २०० ते २५० ट्रक शेतात उभेठेकेदार म्हणाले, पैसे देणार

सगरोळी : शासकीय दंडाची रक्कम टाळणे व मजुरांची मजुरी या दोन्हीच्या रकमा काही लाखात गेल्याचे लक्षात येताच वाळू ठेकेदाराने रात्रीतून साहित्यासह गाशा गुंडाळल्याचा प्रकार ३० मे रोजी सगरोळी येथे घडला.गावच्या सरपंचासह गावक-यांनी घाटावरील एक जेसीबी जप्त करून गावच्या निगरानीत ठेवली आहे. याशिवाय या घाटावरील २०० ते २५० ट्रक एका शेतात उभे आहेत. र्पाकिंगसाठीही पैसे देण्याचे दिलेले आश्वासन न पाळल्याने पैसे मिळाल्याशिवाय ट्रक सोडणार नाही, अशी भूमिका सदर शेतकऱ्यांने घेतली आहे.सगरोळी येथील गट क्रमांक ३०५, ३०६, ३०८, ३०९, ३३४, ३३५, ३४९ मध्ये वाळू घाट आहेत. यातील एका घाटाचा लिलाव झाला. हा घाट नांदेड येथील एका ठेकेदाराने मित्रांच्या भागीदारीने घेतला.जवळपास दीड महिन्याच्या उपशानंतर ठेकेदाराची बक्कळ कमाई झाली. याच दरम्यान देगलूर येथे जिल्हाधिकारी अरुण डोंगरे यांनी बनावट पावत्यांच्या संशयावरुन २८ ट्रक पकडून लाखो रुपये दंडा आकारला. याशिवाय बिलोलीचे उपजिल्हाधिकारी अमोलसिंह भोसले यांनी पहिल्याच दिवशी दोन ट्रकवर दंडात्मक तर तहसीलच्या फिरत्या पथकाने दोन दिवसात सहा ट्रकवर दंडात्मक कारवाई केली. दंडाची एकूण रक्कम ५० ते ६० लाखांच्या घरात जाते.ही रक्कम भरल्याशिवाय ट्रक पुन्हा मिळणार नाहीत, ट्रकमालकही पैसे सोडणार नाही, या भीतीने घाईघाईने ठेकेदाराने रात्रेंदिवस मजुरारवी व जेसीबीद्वारे उत्खनन करीत २०० ते २५० ट्रक वाळूने भरले. आठवडाभरात दोन ते अडीच हजार ट्रक भरले. एका ट्रकला सात ते साडेसात हजार रुपये भरवई ठेकेदार देत असे. याप्रमाणे १५ दिवसाचे ४० ते ५० लाखापेक्षा जास्त गावक-याचे देणे झाले. मजुरांनी व सरपंचांनी दररोज विचारण करु लागले, तेव्हा एक ते दोन दिवसात पैसे देतो, असे सांगून ठेकेदार वेळ मारुन नेई.एकीकडे प्रशासनाच्या दंडाची रक्कम ५० ते ६० लाख रुपये व मजुरी ४० ते ५० लाख असे एकूण १ कोटींचे देणे झाले होते. एक कोटींचे गंडांत्तर टाळण्यासाठी ठेकेदाराने शक्कल लढविली आणि त्याने ३० मे रात्री साहित्यासह धूम ठोकली.दरम्यान, सरपंचासह गावक-यांनी घाटावरील एक जेसीबी जप्त करून गावच्या निगरानीत ठेवली.सरपंच,उपसरपंच व प्रतिष्ठित नागरिक यांच्या मध्यस्थीने थांबलेले मजुर आता मजुरीसाठी सरपंच व संबंधितांना वेठीस धरत आहेत. आता सर्व गावकरी मिळून ठेकेदाराचा शोध घेत आहेत.दरम्यान, २०० ते २५० रिकामे ट्रक रमेश मोतीवार यांच्या शेतात उभे आहेत. पार्किगपोटी काही रक्कम देण्याचे आश्वासन ठेकेदाराने मोतीवार यांनाही दिले होते, मात्र खडकूही न मिळाल्याने पैसे दिल्याशिवाय ट्रक सोडणार नाही, अशी भूमिका मोतीवार यांनी घेतली.

सरपंच, तलाठी, ठेकेदार म्हणालेरेती घाट सुरू झाल्यापासून दर आठवड्याला मजुरांची भरवई मजुरी देण्याचे सर्व गावक-यांच्या समक्ष ठरविण्यात आले होते. ठरल्याप्रमाणे एक दोन आठवड्याचे पैसे ठेकेदाराने दिले. मात्र गेल्या पंधरा दिवसापासून चालढकल करून शेवटी चाळीस ते पन्नास लाख रुपये ठकवून फरार झाला असून गावक-यांच्या नाराजीचा सामना आम्हाला करावे लागत आहे- व्यंकटराव सिदनोड, सरपंच प्रतिनिधी सगरोळी

सगरोळी रेतीघाट ठेकेदारास शासनस्तरावरून तात्पुरते बंद किंवा पूर्णपणे बंद असे कोणतेही नोटीस देण्यात आलेले नाही. दररोज सुरळीत चालू असणारे घाट असे अचानक का आणि कशासाठी ठेकेदार घाट बंद केला आहे. हे त्यांनाच माहित़-खांडेकर, तलाठी, सज्जा सगरोळी

आम्ही रेती घाट बंद केला नाही. आमचे कांही टेक्नीकल अडचणी आहेत. शिवाय सोबतचे सहकारीही स्वत:च्या कामात व्यस्त आहेत. घाटावर देखरेखीसाठी कुणीही नाही. त्यामुळे दोन ते तीन दिवस घाट बंद ठेवण्यात आला आहे. गावचे पैसे देणे आहे. घाट चालू करताच संपूर्ण पैसे देण्यात येथील गंडवण्याचा येथे प्रश्नच येत नाही़-सूर्यकांत पवार, सगरोळी रेती घाट ठेकेदाऱ

टॅग्स :Nandedनांदेडsandवाळूgodavariगोदावरी