जि.प.शिक्षकांचा गौरव
By Admin | Updated: September 7, 2014 00:53 IST2014-09-07T00:53:07+5:302014-09-07T00:53:07+5:30
माजी राष्ट्रपती डॉ. सर्वपल्ली राधाकृष्णन यांचा जन्मदिन शिक्षक दिन म्हणून साजरा केला जातो. याचे औचित्य साधून शुक्रवारी शिक्षण विभागातर्फे बी.आर.मुंडले इंग्लिश स्कूल येथे आयेजित कार्यक्र मात

जि.प.शिक्षकांचा गौरव
जिल्हा परिषद : समाजापुढे नवा आदर्श
नागपूर : माजी राष्ट्रपती डॉ. सर्वपल्ली राधाकृष्णन यांचा जन्मदिन शिक्षक दिन म्हणून साजरा केला जातो. याचे औचित्य साधून शुक्रवारी शिक्षण विभागातर्फे बी.आर.मुंडले इंग्लिश स्कूल येथे आयेजित कार्यक्र मात जिल्हा परिषदेच्या १५ आदर्श शिक्षकांचा सपत्नीक गौरव करण्यात आला. शाल, श्रीफळ, साडीचोळी, दुप्पटा, मानचिन्ह व रोख असे या पुरस्काराचे स्वरूप आहे.
सत्कारमूर्तीत रेणुका कृष्णराव मोहोड (उ. प्राथ. शाळा,वाडी), सुखदेव पंचशील बावणकर (जि.प.प्राथ,. शाळा, महादुला), मनोहर नत्थुजी रंगारी (जि.प.प्रा.शाळा, गिदमगड), मोहन रामकृष्ण डांगोरे (जि.प.प्रा.शाळा कारला), प्रभाकर गोपाळराव काळे (माध्य.शाळा चिचभवन), हरीश्चंद्र माधवराव दहाघाने (जि.प.शाळा पेंढराबोडी), धर्मराज नारायण डोईफोडे (जि.प.शाळा ,खानगाव), नंदकिशोर यादवराव बावनकुळे (जि.प.शाळा, पारडी), यशवंत हरीराम पदाडे (जि.प.शाळा , देवळी), रुपचंद लक्ष्मणराव कोपसे (जि.प.शाळा, वग), आनंदराव राजाराम नंदनवार (जि.प.शाळा, बेरकेपार),नंदाबाई ज्ञानेश्वर पाटमासे (जि.प.शाळा, घोगरा) व अंजिरा श्रावण कोकोडे (जि.प.शाळा, रयतवाडी),तसेच माध्यमिक शिक्षिका शिला दिलीप वानखेडे (निलडोल) व ठमूई लक्ष्मणराव ढोके (काटोल) आदींचा समावेश आहे.
जि.प.अध्यक्ष संध्या गोतमारे, आमदार नागो गाणार, उपाध्यक्ष चंद्रशेखर चिखले, शिक्षण सभापती वंदना पाल, सभापती दुर्गावती सरियाम व मुख्य कार्यकारी अधिकारी शिवाजी जोंधळे आदींच्या हस्ते आदर्श शिक्षकांचा गौरव करण्यात आला.
जि.प.शाळांचा शैक्षणिक दर्जा उंचावण्यासाठी शिक्षकांनी प्रयत्न करून पटसंख्या वाढविण्याचा प्रयत्न करावा, असे आवाहन गाणार यांनी केले. जि.प.शाळांचा नावलौकिक वाढविण्यासाठी शिक्षकांनी प्रयत्न करावे, आदर्श शिक्षकांचा आदर्श डोळ्यापुढे ठेवावा, असे आवाहन गोतमारे व चिखले यांनी केले. जि.प.शाळांतूनही चांगले विद्यार्थी घडत असल्याचे जोंधळे म्हणाले. यावेळी वंदना पाल, दुर्गावती सरियाम यांनीही मार्गदर्शन केले. शिक्षणाधिकारी (प्राथ.) किशोर चौधरी, शिक्षणाधिकारी (मा.)ओमप्रकाश गुढे, जि.प.सदस्य शांता कुमरे, जयकुमार वर्मा व उज्ज्वला बोढारे यांच्यासह जि.प.चे पदाधिकारी व्यासपीठावर होते. शिक्षक, शिक्षण विभागातील अधिकारी व कर्मचारी कार्यक्र माला मोठ्या संख्येने उपस्थित होते. (प्रतिनिधी)