जि.प. साठी १०० तर पं.स. साठी १५६ उमेदवारांचे अर्ज वैध
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 23, 2021 04:09 IST2021-09-23T04:09:51+5:302021-09-23T04:09:51+5:30
नागपूर : ५ ऑक्टोबर रोजी जिल्हा परिषदेच्या पोटनिवडणुकीचे मतदान होणार आहे. जिल्हा परिषदेच्या १६ जागांसाठी १०० तर पंचायत समितीच्या ...

जि.प. साठी १०० तर पं.स. साठी १५६ उमेदवारांचे अर्ज वैध
नागपूर : ५ ऑक्टोबर रोजी जिल्हा परिषदेच्या पोटनिवडणुकीचे मतदान होणार आहे. जिल्हा परिषदेच्या १६ जागांसाठी १०० तर पंचायत समितीच्या ३१ जागांसाठी १५६ उमेदवारांचे अर्ज वैध ठरले. २७ सप्टेंबर रोजी दुपारी ३ नंतर उमेदवारांची अंतिम यादी लागणार आहे.
बुधवारी जिल्हाधिकारी विमला आर. यांनी आज निवडणुकीसंदर्भात आढावा घेतला. या निवडणुकीत ६ लाख १६ हजार १६ मतदार मतदानाचा हक्क बजावणार आहेत. १११५ मतदान केंद्रांवर मतदान होणार आहे. ५ ऑक्टोबरला सकाळी ७.३० ते सायंकाळी ५.३० पर्यंत मतदान पार पडणार आहे. ६ ऑक्टोबर रोजी मतमोजणी सकाळी १० वाजतापासून सुरू होईल. निवडणुका लढविणाऱ्या उमेदवारांना २७ सप्टेंबर रोजीच चिन्हाचे वाटप होईल. जिथे अपील आहे तेथे २९ सप्टेंबर रोजी चिन्हाचे वाटप होईल.
- यांची निवडणुूक निर्णय अधिकारी म्हणून निवड
नरखेड तालुक्यासाठी रवींद्र जोगी, उपजिल्हाधिकारी
काटोल तालुक्यासाठी उपविभागीय अधिकारी श्रीकांत उंबरकर
कळमेश्वर तालुक्यासाठी उपजिल्हाधिकारी हेमा बढे
सावनेर तालुक्यासाठी उपविभागीय अधिकारी अतुल म्हैत्रे
पारशिवनी तालुक्यासाठी उपजिल्हाधिकारी सुजाता गंधे
रामटेक तालुक्यासाठी उपविभागीय अधिकारी वंदना सवरंगपते
मौदा तालुक्यासाठी उपविभागीय अधिकारी एस.आर. मदनूरकर
कामठी तालुक्यासाठी उपविभागीय अधिकारी शेखर घाडगे
नागपूर तालुक्यासाठी उपजिल्हाधिकारी जगदीश कातकर
हिंगणा तालुक्यासाठी उपविभागीय अधिकारी इंदिरा चौधरी
उमरेड तालुक्यासाठी उपजिल्हाधिकारी नितीन पाटील
कुही तालुक्यासाठी उपविभागीय अधिकारी चंद्रभान खंडाईत
भिवापूर तालुक्यासाठी उपजिल्हाधिकारी शिवराज पडोळे