स्मार्ट सिटीसाठी झोनस्तरावर सर्वे

By Admin | Updated: September 19, 2015 03:49 IST2015-09-19T03:49:09+5:302015-09-19T03:49:09+5:30

स्मार्ट सिटी योजनेंतर्गत नागपूर शहराची निवड झाल्यानंतर महापालिका प्रशासन सक्रिय झाले आहे.

Zonatara survey for Smart City | स्मार्ट सिटीसाठी झोनस्तरावर सर्वे

स्मार्ट सिटीसाठी झोनस्तरावर सर्वे

नागपूर : स्मार्ट सिटी योजनेंतर्गत नागपूर शहराची निवड झाल्यानंतर महापालिका प्रशासन सक्रिय झाले आहे. आता पायाभूत सुविधांच्या आधारावर वस्त्यांची निवड केली जाईल. यासंबंधीची एक यादी तयार केली जाईल. ज्या भागात पायाभूत सुविधा नाहीत तेथे प्रथम विकास कामे केली जातील. या प्रकल्पाच्या तयारीसाठी आयुक्त श्रावण हर्डीकर यांनी शुक्रवारी विभाग प्रमुख व झोनच्या सहायक आयुक्तांची बैठक घेतली.
सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार पायाभूत सुविधांच्या आधारावर वस्त्यांची यादी तयार करावी, असे स्पष्ट निर्देश आयुक्तांनी सर्व सहाय्यक आयुक्तांना दिले. या अंतर्गत गरीब, अत्यंत गरीब व झोपडपट्टी अशी यादी तयार करण्याचे निर्देश देण्यात आले. सर्वप्रथम शहरातील त्या भागांचा विकास केला जाईल जेथे पायाभूत सुविधा उदा. रस्ते, गटारी, पथदिवे, उद्यान आदी नाहीत. संबंधित यादी तयार झाल्यानंतर टप्प्याटप्प्याने विकास केला जाईल. महापालिकेच्या एका वरिष्ठ अधिकाऱ्याने सांगितले की, ‘स्मार्ट सिटी’ म्हणजे नेमके काय असेल हे अद्याप सर्वसामान्य माणसाला समजलेले नाही. स्मार्ट सिटी अंतर्गत शहरातील प्रत्येक भागात पायाभूत सुविधा मिळणे आवश्यक आहे. शहराचा समान व एकत्रित विकास या प्रकल्पांतर्गत करायचा आहे. या प्रकल्पासोबतच अनेक उपक्रमही राबविले जातील. स्मार्ट सिटी स्पर्धेत दीड हजाराहून अधिक सूचना आल्या आहेत.
त्यांची छाननी करून अंतिम २० सूचनांची निवड केली जाईल. तज्ज्ञांची समिती त्यातून दहाची निवड करेल. लवकरच ही प्रक्रिया सुरू होईल. (प्रतिनिधी)

Web Title: Zonatara survey for Smart City