शहरं
Join us  
Trending Stories
1
प्रत्येक भारतीयाला संताप, संसदेचं विशेष अधिवेशन बोलवा; राहुल गांधी, खरगेंची मोदींकडे मागणी
2
काश्मीरमध्ये ४८ पर्यटन स्थळे बंद; दहशतवाद्यांची घरे पाडल्यामुळे स्लिपर सेलकडून मोठ्या हल्ल्याची शक्यता
3
'फॅमिली मॅन' फेम अभिनेत्याची हत्या? मित्रांसोबत गेला होता पिकनिकला, कुटुंबियांनी व्यक्त केला संशय
4
पाकिस्तानने भारतासाठी हवाई क्षेत्र बंद केले, परंतू भारताचे वापरतोय; ते ही बंद करण्याचा विचार...
5
आप पदाधिकाऱ्याच्या मुलीचा कॅनडामध्ये संशयास्पद मृत्यू; आठवडाभरापासून होती बेपत्ता
6
"गावातल्या मुलाला आपण स्वीकारणारच नाही का?"; 'झापुक झुपूक'च्या ट्रोलिंगबद्दल केदार शिंदे स्पष्टच बोलले
7
'भालू' फेम अभिनेते, निर्माते आणि दिग्दर्शक प्रकाश भेंडे यांचं निधन
8
कॅनडामध्ये ट्रम्प विरोधाने निवडणूक फिरली; ट्रुडोंच्या पक्षाचे मार्क कार्नी नवे पंतप्रधान होणार
9
Akshaya Tritiya 2025: सोने खरेदी शक्य नाही? मग अक्षय्य तृतीयेला घरी आणा कामधेनुची मूर्ती!
10
वैभव सूर्यवंशीच्या तुफान फटकेबाजीवर बॉलिवूडकरही फिदा! युवा क्रिकेटपटूवर केला कौतुकाचा वर्षाव
11
अमेरिकेतून अदानींसाठी चांगली बातमी! 'त्या' प्रकरणात अदानी ग्रीन कंपनीला क्लीन चिट
12
ठाकरे गटाला धक्का देण्यासाठी एकनाथ शिंदेंची खेळी; शिवीगाळ करणाऱ्या दत्ता दळवींचा शिवसेनेत प्रवेश
13
'या' दिग्गज शेअरनं १ लाखांचे केले ४ कोटी रुपये, आता बोनस सोबत पुन्हा शेअर्स वाटण्याची तयारी 
14
आणखी एक सासू होणाऱ्या जावयासोबत गेली पळून, मुलीचं लग्न मोडलं अन् महिलेने...
15
VIDEO: कार्यक्रमातून बाहेर काढलं म्हणून संतापला भाजप नेता; पोलीस अधिक्षकाला माफी मागायला लावली
16
पहलगाम हल्ल्याच्या दुसऱ्या दिवशी बीएसएफचा जवान पाकिस्तानच्या ताब्यात; सीमेवर पोहोचली गर्भवती पत्नी
17
Parshuram Jayanti 2025: आईचा वध करूनही भगवान परशुराम थोर मातृपितृ भक्त कसे? वाचा त्यांचे कार्य!
18
सायबर गुन्हेगारांचा नवा फंडा; गरजू विद्यार्थ्यांच्या बँक खात्यांचा वापर करून फ्रॉड
19
Parshuram Jayanti 2025: भगवान परशुरामांनी पृथ्वी २१ वेळा नि:क्षत्रिय करण्यामागे काय होते कारण?
20
सूरज चव्हाणचा 'झापुक झुपूक' लवकरच गाठणार कोटींचा आकडा? ४ दिवसात कमावले इतके लाख

झिरो पेन्डन्सी म्हणजे गठ्ठे बांधून पसारा आवरण्याचा प्रकार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 9, 2018 23:53 IST

राज्य शासनाने प्रलंबित कामाचा निपटारा तत्काळ व्हावा, विकास कामांच्या आवश्यक दस्तावेजात सुसूत्रता यावी, यासाठी जिल्हा परिषदांमध्ये ‘झिरो पेन्डन्सी’अभियान राबविण्याचे आदेश दिले होते. नागपूर जिल्हा परिषदेत हे अभियान मोठ्या सक्तीने राबविण्यात आले. परंतु आजही तक्रारींचा पाऊस कायमच आहे. हे अभियान केवळ पसारा आवरण्याचा प्रकार ठरले असल्याचा आरोप लोकप्रतिनिधींनी केला आहे.

ठळक मुद्देनागपूर जिल्हा परिषदेत तक्रारींचा पाऊस कायमच : लोकप्रतिनिधींचा आक्षेप

आॅनलाईन लोकमतनागपूर : राज्य शासनाने प्रलंबित कामाचा निपटारा तत्काळ व्हावा, विकास कामांच्या आवश्यक दस्तावेजात सुसूत्रता यावी, यासाठी जिल्हा परिषदांमध्ये ‘झिरो पेन्डन्सी’अभियान राबविण्याचे आदेश दिले होते. नागपूर जिल्हा परिषदेत हे अभियान मोठ्या सक्तीने राबविण्यात आले. परंतु आजही तक्रारींचा पाऊस कायमच आहे. हे अभियान केवळ पसारा आवरण्याचा प्रकार ठरले असल्याचा आरोप लोकप्रतिनिधींनी केला आहे.शासनाच्या आदेशानुसार नागपूर जि.प.च्या सीईओंनी ‘झिरो पेन्डन्सी’साठी सर्व विभागाला कामाला लावले़ हिवाळी अधिवेशनादरम्यान स्वत: ग्रामविकास खात्याच्या प्रधान सचिवांना हे पे्रझेन्टेशन दाखविण्यात आले होते़ वस्तुत: ही पेन्डन्सी जुन्या दस्तऐवजाचे गठ्ठे बांधण्यापलीकडे तीळमात्रही कमी झाली नाही. ही पेन्डन्सी पूर्ण न होताच सीईओंनी आपली पाठ थोपटून घेण्यासाठी प्रेझेन्टेशनच्या खर्चावर लाखो रुपये फुकल्याची ओरड होत आहे.तीस वर्षे, दहा वर्षे आणि पाच वर्षांच्या विकास कामांचा तपशील हिरव्या, पिवळ्या आणि निळ्या रंगाच्या कापडात बांधण्यात आला आहे़ परंतु मूळ तक्रारी एकाच टेबलवर अनेक दिवसांपासून जैसे थे प्रलंबित असल्याचे पाहायला मिळत आहे़ काही विकास कामांच्या फाईल्स तर शोधूनही सापडत नाही़ ग्रामीण जनतेशी सर्वाधिक नाळ जुळलेला पंचायत विभागाची स्थिती अत्यंत भयावह आहे़ येथे सर्वाधिक तक्रारी प्रलंबित आहेत़ त्याचे उत्तर सादर करताना आणि फाईल मंजूर करून घेताना कर्मचाऱ्यांना कमालीच्या अडचणी येत आहेत. त्यानंतर बांधकाम विभाग आणि शिक्षण विभागाची हीच स्थिती आहे़ सीईओंनी आपण जिल्हा परिषद शिस्तबद्ध केली, यासाठीचा व्हिडीओ, आॅडिओ प्लॅन करवून झिरो पेन्डन्सीचे मानांकन मिळविले़ शासन धोरणानुसार आठ दिवसांपेक्षा तक्रार, विकास कामांची फाईल प्रलंबित न राहण्याचे धोरण असताना गठ्ठे बांधून पसारा सावरण्याचा प्रकार पेन्डन्सीच्या नावावर करण्यात आल्याच्या प्रतिक्रिया काही कर्मचारी संघटनांकडून व्यक्त होत आहेत़ हा कुठला झिरो पेन्डन्सीचा भागजिल्हा परिषदेने झिरो पेन्डन्सीचा केवळ देखावा केला़ स्थायी समितीतीलच निर्णय निकाली निघत नाही़ विकास कामांच्या फाईल्स महिनोन्महिने प्रलंबित राहतात़ सदस्य याविषयी विचारणा करतात; परंतु उत्तर मिळत नाही. हा कुठला झिरो पेन्डन्सीचा भाग म्हणावा़- मनोहर कुंभारे, विरोधी पक्षनेता, जि.प.

 

टॅग्स :zpजिल्हा परिषदnagpurनागपूर