युवकांनो नियमित रक्तदान करा : भूषणकुमार उपाध्याय
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 19, 2018 23:37 IST2018-11-19T23:35:31+5:302018-11-19T23:37:55+5:30
अनेक लोक भ्रामक कल्पनेतून रक्तदान करीत नाही, हे विचार बदलणे आवश्यक आहे. युवकांनी नियमित रक्तदान करण्याची गरज आहे. कमीत कमी वर्षातून दोनदा तरी रक्तदान करावे, असे आवाहन पोलीस आयुक्त डॉ. भूषणकुमार उपाध्याय यांनी येथे केले.

युवकांनो नियमित रक्तदान करा : भूषणकुमार उपाध्याय
लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : अनेक लोक भ्रामक कल्पनेतून रक्तदान करीत नाही, हे विचार बदलणे आवश्यक आहे. युवकांनी नियमित रक्तदान करण्याची गरज आहे. कमीत कमी वर्षातून दोनदा तरी रक्तदान करावे, असे आवाहन पोलीस आयुक्त डॉ. भूषणकुमार उपाध्याय यांनी येथे केले.
डॉ. हेडगेवार रक्तपेढीत अत्याधुनिक रक्तघटक विघटन यंत्राचे लोकार्पणप्रसंगी ते उद्घाटक म्हणून बोलत होते. व्यासपीठावर उद्योगपती अजय कनोरिया, डॉ. दिलीप गुप्ता, डॉ. पी.के. देशपांडे, डॉ. अनसिंगकर, डॉ. हर्षा सोनी, नगरसेविका परिणिता फुके, रवी वाघमारे, बाळासाहेब वेलनकर व रक्तपेढीचे सचिव अशोक पत्की उपस्थित होते.
पोलीस विभागाकडूनही जास्तीत जास्त रक्तदान होण्यासाठी प्रयत्न केले जातील, अशी ग्वाहीही डॉ. उपाध्याय यांनी दिली. पत्की म्हणाले, डॉ. हेडगेवार रक्तपेढी रुग्णांना सुरक्षित रक्तपुरवठा कसा करता येईल, यासाठी नेहमीच जागरूक असते. नुकतेच रक्तपेढीने ‘प्लेटलेट क्रॉस मॅच’ हे तंत्रज्ञान आणले. मध्य भारतात ही सोय केवळ याच रक्तपेढीत उपलब्ध आहे. यात आता ‘रक्त विघटन’ यंत्राची भर पडल्याने याचा फायदा रुग्णांना होणार आहे. यासाठी कनोरिया यांनी आर्थिक मदत केल्याचेही त्यांनी सांगितले.
उपस्थितांचा परिचय प्रकाश कुंडले यांनी करून दिला. संचालन प्रवीण पाटील यांनी केले तर आभार हरीभाऊ इंगोले यांनी मानले.