शहरं
Join us  
Trending Stories
1
लोकल ट्रेनच्या दरवाजाजवळ उभे राहणे हा निष्काळजीपणा नव्हे; उच्च न्यायालयाचा निर्णय
2
"...तर नरकाचे दरवाजे उघडतील"; ट्रम्प यांच्या ४८ तासांच्या अल्टीमेटमवर इराणची थेट 'अणुयुद्धाची' धमकी!
3
आजचे राशीभविष्य, ०५ एप्रिल २०२६: चांगली बातमी, धनलाभ, नशिबाची साथ; हर्षोल्लासाचा दिवस
4
सुनेत्रा पवारांविरोधात शरद पवारांनी उमेदवार दिल्यास काँग्रेसचा पाठिंबा; प्रदेशाध्यक्षांचा नवा प्रस्ताव
5
'धुरंधर'नंतर हाच सिनेमा पाहणार, मृणाल ठाकुरच्या 'डकैत'वर प्रेक्षकांच्या कमेंट्स; ट्रेलर रिलीज
6
भोंदू अशोक खरातला मदत करणाऱ्या महसूल अधिकाऱ्यांना घरी जावे लागेल: चंद्रशेखर बावनकुळे
7
"बायकोसोबत रेड कार्पेटवर चालताना भीती वाटते...", ऐश्वर्याबद्दल असं का म्हणाला अभिषेक बच्चन?
8
अमली पदार्थ जप्ती प्रकरणात दोघांची अखेर निर्दोष मुक्तता; नियम पालनात सरकारी पक्ष अपयशी
9
पश्चिम रेल्वेच्या ताफ्यात १५ डब्यांच्या २ नवीन लोकल; ३३ टक्के क्षमता वाढणार
10
विशेष लेख: आपल्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात नेमके चालले आहे तरी काय..?
11
साप्ताहिक राशीभविष्य: ७ राशींना मनासारखा काळ, पैशांचा ओघ राहील; यश-प्रगती चौफेर-चौपट लाभ!
12
राज्यातील कुपोषण घटतेय, पण धोका कायम! बालविकास योजनांना गती देण्याचे आव्हान
13
केरळातील डावे सरकार अखेरची घटका मोजतेय, राज्यात एनडीए सत्तेत येईल: पंतप्रधान मोदी
14
Fastest Delivery In IPL 2026 : भारताची नवी स्पीडगन! Ashok Sharma चा १५४.२ kmph वेग, Nortje चा रेकॉर्ड मोडला
15
बँक मॅनेजर जोडप्याचा हाय-प्रोफाइल घोटाळा; ८५ वर्षीय वृद्धेची ७६ लाखांची फसवणूक
16
मंत्री गणेश नाईक म्हणतात... ठाण्यातील शिवसेनेचा खरा इतिहास सांगितला जात नाही!
17
बेपत्ता वैमानिकासाठी अमेरिकेची धावपळ! शत्रूच्या पायलटला हवाली करण्यासाठी इराणकडून बक्षीस जाहीर
18
IPL New Record : नवा रेकॉर्ड! वैभव सूर्यवंशी-यशस्वी जैस्वाल जोडीनं रचला इतिहास
19
कनिष्ठ, वरिष्ठ अधिकारीही भोंगळ कारभाराला जबाबदार; उच्च न्यायालयाची कठोर टीका
20
राज्यातील निवासी डॉक्टरांची ड्युटी आठवड्याला ४८ तास? वैद्यकीय शिक्षण विभागात संभ्रम
Daily Top 2Weekly Top 5

युवकाचा मृत्यू, निष्काळजीपणाचा गुन्हा दाखल

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 22, 2018 23:38 IST

करंट लागल्याने एका युवकाचा मृत्यू झाला. या प्रकरणात हिंगणा पोलिसांनी साडेतीन महिन्यानंतर गुन्हा दाखल केला आहे.

ठळक मुद्देविविध घटनेत पाच ठार

लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : करंट लागल्याने एका युवकाचा मृत्यू झाला. या प्रकरणात हिंगणा पोलिसांनी साडेतीन महिन्यानंतर गुन्हा दाखल केला आहे. ६ मे रोजी जुना बाभुळखडा येथील रहिवासी ३० वर्षीय प्रवीण ऊर्फ सोनू वाघे हा हिंगणा खडकी येथील शीलाबाई उईके यांच्या घरी गेला होता. शीलाबाई यांच्या घरी लग्नसमारंभ होता. यादरम्यान सोनू कूलरमध्ये पाणी टाकत होता. कूलर सुरू असल्याने त्याला विजेचा धक्का बसला. यात त्याचा मृत्यू झाला. हिंगणा पोलिसांनी अकस्मात मृत्यूची नोंद केली होती. तपासात अर्थिंग नसल्याने कूलर शॉर्ट झाल्याचे आढळून आले. या आधारावर शीलाबाई यांच्याविरुद्ध निष्काळजीपणा बाळगल्याचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.विजेच्या धक्क्याने तरुणाचा मृत्यूविजेचा धक्का लागून ३२ वर्षीय युवकाचा मृत्यू झाला. योगेश्वर मौर्य रा. भरतवाडा असे मृताचे नाव आहे. तो बुधवारी सकाळी वेल्डिंग मशीनचा वायर प्लगमध्ये लावत असताना त्याला विजेचा धक्का बसला. बेशुद्ध अवस्थेत त्याला मेयो रुग्णालयात नेले असता डॉक्टरांनी तपासून मृत घोषित केले. कळमना पोलिसांनी अकस्मात मृत्यूची नोंद केली आहे.अपघातातील जखमीचा मृत्यूरस्ता अपघातात जखमी झलेल्या इसमाचा उपचारादरम्यान मृत्यू झाला. इस्तारी मुलुंडे (५७) रा. सीपीडब्ल्यूडी क्वॉर्टर काटोल रोड असे मृताचे नाव आहे. गेल्या १६ आॅगस्ट रोजी गिट्टीखदान चौकात अपघातात ते जखमी झाले होते. रामदासपेठ येथील एका खासगी रुग्णालयात त्यांच्यावर उपचार सुरू होते. बुधवारी सकाळी त्यांचा मृत्यू झाला. गिट्टीखदान पोलिसांनी अकस्मात मृत्यूची नोंद केली आहे.कारच्या धडकेत पादचाऱ्याचा मृत्यूइतवारी येथे अनियंत्रित कारने पायी जात असलेल्या एका व्यक्तीला धडक दिली. यात ६५ वर्षीय व्यक्तीचा मृत्यू झाला. ओमप्रकाश मोतीलाल रोडे रा. मस्कासाथ पोलीस चौकी असे मृताचे नाव आहे. मस्कासाथ मार्गावरील मेमन जमात भवनाजवळ कार क्रमांक एमएच २०/एजी/८८३ च्या चलकाने त्यांना धडक देऊन जखमी केले. मेयो रुग्णालयात नेल्यावर डॉक्टरांनी तपासून मृत घोषित केले. तहसील पोलिसांनी अपघाताचा गुन्हा दाखल केला आहे.जखमी व्यक्तीचा मृत्यूघरच्या पायऱ्यांवरून पडून जखमी झालेल्या ६० वर्षीय व्यक्तीचा उपचारादरम्यान मृत्यू झाला. केशव लोखंडे रा. रामबाग असे मृताचे नाव आहे. ते घरातील पायऱ्या उतरताना पडून जखमी झाले होते. त्यांच्यावर मेडिकलमध्ये उपचार सुरू होते. मंगळवारी त्यांचा मृत्यू झाला. इमामवाडा पोलिसांनी अकस्मात मृत्यूची नोंद केली आहे.

 

टॅग्स :AccidentअपघातDeathमृत्यू