नागपुरातील नरसाळ्यात तरुणाची दगडाने ठेचून हत्या
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 19, 2018 16:20 IST2018-05-19T16:19:59+5:302018-05-19T16:20:09+5:30
उमरेड मार्गावरील नरसाळ्याच्या सुदामनगरीत एका तरुणाची दगडाने ठेचून निर्घृण हत्या करण्यात आली. विशाल दिलीप मानकर (वय २१) असे मृताचे नाव आहे. तो तुळजाईनगर, गारगोटी परिसरात राहत होता.

नागपुरातील नरसाळ्यात तरुणाची दगडाने ठेचून हत्या
लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : उमरेड मार्गावरील नरसाळ्याच्या सुदामनगरीत एका तरुणाची दगडाने ठेचून निर्घृण हत्या करण्यात आली. विशाल दिलीप मानकर (वय २१) असे मृताचे नाव आहे. तो तुळजाईनगर, गारगोटी परिसरात राहत होता.
शनिवारी सकाळी विशाल मानकरचा मृतदेह नरसाळा परिसरात रक्ताच्या थारोळ्यात पडून दिसल्याने बघ्यांची मोठी गर्दी जमली. काहींनी सकाळी ७ वाजता ही माहिती हुडकेश्वर पोलिसांना कळवली. पोलिसांनी लगेच घटनास्थळ गाठले. विशालच्या मृतदेहाशेजारी दगड आणि दारूची बाटली पडून होती. त्यामुळे आरोपीने दारूच्या नशेत वाद झाल्यानंतर विशालला दगडाने ठेचून मारले असावे, असा पोलिसांनी प्राथमिक अंदाज काढला. विशाल कॅटरर्सचे काम करायचा. फावल्या वेळेत तो जुने फर्निचर विकत घेणे आणि ते चांगले करून विकण्याचे काम करायचा. त्याची हत्या करणारे कोण, ते वृत्त लिहिस्तोवर स्पष्ट झाले नव्हते.