नागपुरातील बोरगाव चौकात युवकाचा भोसकून खून

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 7, 2018 01:05 IST2018-01-07T01:04:39+5:302018-01-07T01:05:26+5:30

गिट्टीखदान पोलीस ठाण्यांतर्गत बोरगाव चौकात शनिवारी रात्री एका २४ वर्षाचा अज्ञात आरोपींनी धारदार शस्त्राने खून केल्याची घटना घडली.

Youth murdered by stabing in Borgaon Chowk, Nagpur | नागपुरातील बोरगाव चौकात युवकाचा भोसकून खून

नागपुरातील बोरगाव चौकात युवकाचा भोसकून खून

ठळक मुद्देमृत युवकही होता गुन्हेगारी प्रवृत्तीचा

आॅनलाईन लोकमत
नागपूर : गिट्टीखदान पोलीस ठाण्यांतर्गत बोरगाव चौकात शनिवारी रात्री एका २४ वर्षाचा अज्ञात आरोपींनी धारदार शस्त्राने खून केल्याची घटना घडली. सारंग केशव मदने रा. बोरगाव असे मृत युवकाचे नाव आहे. मिळालेल्या माहितीनुसार सारंग रात्री ११.१५ वाजता बोरगावच्या दिनशॉ फॅक्ट्री चौकातील राधे मिष्टान्न भंडार समोर आला होता. तेथे तो दोन मित्रांसोबत बसून चर्चा करीत होता. दरम्यान तलवार आणि इतर शस्त्र घेऊन दुचाकी वाहनांवर आरोपी युवक तेथे आले. त्यांनी सारंगवर हल्ला केला. हल्ला झाल्याचे पाहून सारंगचे मित्र घटनास्थळाहून पळून गेले. सारंग गंभीररीत्या जखमी झाल्याने तो पळून जाऊ शकला नाही. घटनास्थळीच त्याचा मृत्यू झाला. सारंगही गुन्हेगारी प्रवृत्तीचा असल्याचे सांगण्यात येत आहे. हा खून टोळी वैमनस्यातून झाला असल्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे. घटनेची माहिती मिळताच सहायक पोलीस आयुक्त अश्विनी पाटील, गिट्टीखदानचे निरीक्षक राजकमल वाघमारे व पोलीस घटनास्थळी पोहोचले. पोलिसांनी आजूबाजूच्या दुकानाबाहेर लावलेल्या सीसीटीव्हीचे फुटेज गोळा करणे सुरू केले. सीसीटीव्ही फुटेजच्या आधारे पोलीस आरोपींचा शोध घेण्याचा प्रयत्न करीत होते.

Web Title: Youth murdered by stabing in Borgaon Chowk, Nagpur