२१ ला युवा खासदार वरुण गांधी नागपुरात

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 17, 2018 22:18 IST2018-04-17T22:18:26+5:302018-04-17T22:18:36+5:30

युवा मुक्ती अभियान हा युवकांच्या सर्वांगीण विकासासाठी सकारात्मक दृष्टी ठेवणाऱ्या विदर्भातील स्वयंसेवी संस्थांचा एकात्मिक मंच आहे. या मंचतर्फे येत्या २१ एप्रिल रोजी वसंतराव देशपांडे सभागृह येथे युवा सन्मान संवाद-विदर्भ युवा परिषदेचे आयोजन करण्यात आले आहे. युवा खासदार वरुण गांधी यांच्या उपस्थितीत दुपारी १२ वाजता या परिषदेचे उदघाटन  होणार असल्याची माहिती परिषदेचे समन्वयक अ‍ॅड. भूपेश पाटील यांनी मंगळवारी पत्रपरिषदेत दिली.

Youth MP Varun Gandhi at Nagpur on 21th April | २१ ला युवा खासदार वरुण गांधी नागपुरात

२१ ला युवा खासदार वरुण गांधी नागपुरात

ठळक मुद्देयुवा सन्मान संवाद-विदर्भ युवा परिषदेचे आयोजन

लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : युवा मुक्ती अभियान हा युवकांच्या सर्वांगीण विकासासाठी सकारात्मक दृष्टी ठेवणाऱ्या विदर्भातील स्वयंसेवी संस्थांचा एकात्मिक मंच आहे. या मंचतर्फे येत्या २१ एप्रिल रोजी वसंतराव देशपांडे सभागृह येथे युवा सन्मान संवाद-विदर्भ युवा परिषदेचे आयोजन करण्यात आले आहे. युवा खासदार वरुण गांधी यांच्या उपस्थितीत दुपारी १२ वाजता या परिषदेचे उदघाटन  होणार असल्याची माहिती परिषदेचे समन्वयक अ‍ॅड. भूपेश पाटील यांनी मंगळवारी पत्रपरिषदेत दिली. डॉ. आंबेडकर विचाराचे चिंतक अशोक भारती, युगांतर संस्थेचे राजकुमार तिरपुडे आदी मान्यवर उपस्थित राहणार आहेत. परिषदेमध्ये युवकांच्या समस्या व युवा शक्ती सकारात्मक दिशेकडे वळविण्याबाबत मार्गदर्शन केले जाणार असल्याचे अ‍ॅड. पाटील यांनी सांगितले. पत्रपरिषदेत नारायण चिचोणे, संजय नितनवरे, निकेश पिने, आरती पंखराज, राजू मालवीय आदी उपस्थित होते.

Web Title: Youth MP Varun Gandhi at Nagpur on 21th April