पेरूच्या मोहात युवकाने गमावला जीव; नागपुरातील घटना
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 28, 2017 15:59 IST2017-12-28T15:57:33+5:302017-12-28T15:59:07+5:30
झाडावर चढून पेरु तोडताना तोल गेल्यामुळे जखमी झालेल्या ३५ वर्षीय युवकाचा उपचारादरम्यान मृत्यू झाल्याची घटना पाचपावली पोलीस ठाण्याच्या हद्दीत घडली.

पेरूच्या मोहात युवकाने गमावला जीव; नागपुरातील घटना
ठळक मुद्देपाय घसरून पडल्याने गंभीर जखमी
आॅनलाईन लोकमत
नागपूर : झाडावर चढून पेरु तोडताना तोल गेल्यामुळे जखमी झालेल्या ३५ वर्षीय युवकाचा उपचारादरम्यान मृत्यू झाल्याची घटना पाचपावली पोलीस ठाण्याच्या हद्दीत घडली. याप्रकरणी पोलिसांनी अकस्मात मृत्यूची नोंद केली आहे. प्रकाश गणेश प्रजापती (३५) रा. बाळाभाऊपेठ, कुंभारपुरा, नागपूर हे रविवारी सायंकाळी ५ वाजता घरी असलेल्या पेरुच्या झाडावर पेरु तोडण्यासाठी चढले. पाय घसरल्यामुळे त्यांचा तोल जाऊन ते खाली पडून गंभीर जखमी झाले. त्यांना उपचारासाठी मेयो रुग्णालयात दाखल करण्यात आले. मंगळवारी रात्री उपचारादरम्यान डॉक्टरांनी त्यांना तपासून मृत घोषित केले.