लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : यासीन प्लॉट सक्करदरा परिसरात एका २० वर्षीय युवकाचे अपहरण करून १० हजार रुपयाची खंडणी मागितल्याचा प्रकार उघडकीस आला आहे.बिट्टू मिर्झा, गौरव टाले आणि सोहेल नावाचा साथीदार अशी आरोपींची नावे आहेत. अमर्त दिवे (२०) रा. म्हाळगीनगर असे फिर्यादीचे नाव आहे. अमर्त शनिवारी सकाळी १०.३० वाजता गाडीने यासीन प्लॉटमधील गॅस गोदामाच्या गल्लीतून जात होता. तेव्हा आरोपींनी त्याचे अपहरण केले. त्याला ताजबागसमोरील मैदानात नेऊन १० हजार रुपयाची खंडणी मागितली. पैसै न दिल्यास जीवे मारण्याची धमकी दिली. तसेच आरोपींनी यापूर्वीसुद्धा त्याला धमकावून पानटपरीवरची त्यांची १००० व १२०० रुपयांची उधारी चुकती करण्यास सांगितले. फिर्यादीच्या तक्रारीवरून आरोपींविरुद्ध अपहरण, मारहाणीचा गुन्हा दाखल करण्यात आला.खंडणीसाठी बारमध्ये हल्लासक्करदऱ्यातील आशीर्वादनगर येथील बारमध्ये रविवारी रात्री तलवारी घेऊन गुन्हेगारांनी हल्ला करीत १० हजार रुपयाची खंडणी मागितली.रमजान, अक्षय ऊर्फ दादू बालबुद्धे आणि त्याचे दोन साथीदार, अशी आरोपींची नावे आहेत. रविवारी रात्री ८.४५ वाजताच्या सुमारास बार संचालक संदीप लखनलाल बनोदे (४९) हे बारमध्ये असताना आरोपी हातात तलवारी घेऊन आत आले. त्यांनी बनोदे यांना परिसरात बार चालविण्यासाठी १० हजाराची खंडणी मागितली. नकार दिल्यावर तलवारीने बारमध्ये तोडफोड केली तसेच बनोदे यांच्यावरही हल्ल्याचा प्रयत्न केला. सक्करदरा पोलिसांनी आरोपींविरुद्ध हत्येचा प्रयत्न, खंडणी वसुली, तोडफोड आदी गुन्हे दाखल केले आहेत.
नागपुरात १० हजारासाठी युवकाचे अपहरण
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 15, 2018 23:48 IST
यासीन प्लॉट सक्करदरा परिसरात एका २० वर्षीय युवकाचे अपहरण करून १० हजार रुपयाची खंडणी मागितल्याचा प्रकार उघडकीस आला आहे.
नागपुरात १० हजारासाठी युवकाचे अपहरण
ठळक मुद्देयासीन प्लॉट सक्करदरा भागातील घटना