एम.जे.अकबर यांच्याविरोधात युवक कॉंग्रेस आक्रमक
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 15, 2018 23:36 IST2018-10-15T23:35:37+5:302018-10-15T23:36:31+5:30
केंद्रीय परराष्ट्र राज्यमंत्री एम.जे.अकबर यांच्याविरोधात युवक कॉंग्रेसने सोमवारी आक्रमक पवित्रा घेतला. ‘मी टू’ अंतर्गत अकबर यांच्यावर अनेक महिलांनी लैंगिक अत्याचाराचा आरोप लावला आहे. याविरोधात सक्करदरा चौक येथे युवक कॉंग्रेसने निदर्शने केली व त्यांचा पुतळा जाळला.

एम.जे.अकबर यांच्याविरोधात युवक कॉंग्रेस आक्रमक
लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : केंद्रीय परराष्ट्र राज्यमंत्री एम.जे.अकबर यांच्याविरोधात युवक कॉंग्रेसने सोमवारी आक्रमक पवित्रा घेतला. ‘मी टू’ अंतर्गत अकबर यांच्यावर अनेक महिलांनी लैंगिक अत्याचाराचा आरोप लावला आहे. याविरोधात सक्करदरा चौक येथे युवक कॉंग्रेसने निदर्शने केली व त्यांचा पुतळा जाळला.
एकीकडे भाजपकडून ‘बेटी बचाओ’चे नारे देण्यात येतात व दुसरीकडे त्यांच्या मंत्र्यांवर असे आरोप होत आहेत. अकबर यांचा भाजपाने राजिनामा घ्यायला हवा, अशी मागणी कार्यकर्त्यांनी केली. युवक कॉंग्रेसचे प्रदेश उपाध्यक्ष कुणाल राऊत, प्रदेश सचिव निलेश खोरगडे, प्रशांत घोटे, अजित सिंह, धीरज पांडे, आकाश गुजर, मंगेश शातलवार, कुणाल पूरी, सूरज थापा, अनोश नियोगी, अभिजीत पाटिल, सुभम तल्लार, विपुल गजभिये, इत्यादी कार्यकर्ते उपस्थित होते.